एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News 17 June 2022 : जाणून घ्या राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News 17 June 2022 : जाणून घ्या राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..

आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.

आज दहावीचा निकाल,  दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल लागणार

दहावीच्या परीक्षेला 16,38, 964  विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 8,89, 506  मुलं असून मुलींची संख्या 7, 49, 458  एवढी आहे. आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या वेबसाईटवरही विद्यार्थ्यांना जलद निकाल पाहता येणार आहे. 

नुपूर शर्मा, जिंदालविरोधात वंचितचा अमन मोर्चा स्थगित

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना अटक करा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मदनपुरा ते आझाद मैदान असा अमन मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, रात्री वंचितची गृहमंत्री वळसे पाटलांसोबत बैठक झाली. त्यानंतर हा मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय झालाय. मोहम्मद पैगंबर आणि इतर धर्मगुरूंचा अनादर करणाऱ्याविरोधात कारवाई करण्यासाठी कायदा पारित करावा आणि या दोघांवर कारवाई करावी अशी मागणी आंबेडकरांनी केली. पोलिसांकडून आंबेडकरांना अटकेचं आश्वासन दिलंय. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आलंय.

आज देशभर काँग्रेसचं जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

राहुल गांधी यांची ईडी चौकशी आणि काँग्रेस मुख्यालयात दिल्ली पोलिसांनी शिरून पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केलेल्या मारहाणीविरोधात आज देशभर जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी काँग्रेसचं आंदोलन होणार आहे. महाराष्ट्रातही मुंबई, पुणे कोल्हापूर, औरंगाबाद , नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली येथे काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी दिलेल्या वागणुकीबाबत काँग्रेसचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींची भेट घेणार आहे

देशमुख आणि मलिकांच्या मतदानाचा निर्णय आज येणार

आगामी विधान परिषद निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या दोन मतांचं भवितव्य आजच्या निकालावर अवलंबून आहे. कोणत्याही कैद्याला मतदानाचा अधिकार नाही, असा दावा करत ईडीतर्फे एएसजी अनिल सिंह यांनी देशमुख आणि मलिकांच्या मागणीला जोरदार विरोध केला आहे. आज दुपारी 2.30  वाजता मुंबई उच्च न्यायालयात निकाल येणार आहे.

20:21 PM (IST)  •  17 Jun 2022

Aurangabad : नवऱ्या मुलाकडील लोकांचा दारू पिऊन धुडगूस, चिडलेल्या मुलींकडील नातेवाईकांकडून वऱ्हाडाला चोप

औरंगाबाद जिल्ह्यातील गांधेली गावांमध्ये एका लग्नात नवर्‍या मुलाकडील लोकांनी दारू पिऊन गोंधळ घातल्यामुळे चिडलेल्या वधूकडील मंडळींनी नवरदेवाकडील मुंबईच्या वऱ्हाडाची धुलाई केल्याचा प्रकार समोर आलाय. 15 तारखेला झालेल्या या लग्नाचा व्हिडीओ समोर आला असून यात मुलीकडील लोकांनी नवरा मुलाकडच्या लोकांवर तसेच वऱ्हाडाच्या गाडीवर दगडफेक केल्याच पाहायला मिळतेय.

20:03 PM (IST)  •  17 Jun 2022

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा अपघात होता होता थोडक्यात वाचला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारचा ताफा राजभवन येथून वर्षा निवास्थानी जात असताना एका व्यक्तीने त्याची कार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुरक्षाकडे कडे तोडून मध्ये घुसवली. हा अपघात थोडक्यात वाचला, मुख्यमंत्र्यांचा ताफा जेव्हा जातो तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा पोलीसांचा बंदोबंस्त असतो तसेच ताफा जात असताना सहजासहजी कोणी गाडी आडवी घालत नाही पण या मलबार हिलच्या रोडवर मुख्यमंत्र्यांचा ताफा राजभवनकडे जात असताना हा अज्ञात व्यक्ती ताफा येत असल्याचं त्यानं पाहिलं गाडी त्यानं थांबवली पण अचानक काय झालं माहिती नाही या इसमानं गाडी बंगल्याच्या बाहेर घेत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा आडवं जात टर्न घेतला आणि निधून गेला. या प्रकरणामुळे मुख्यमंत्री कार्यालयानं संताप व्यक्त केला आहे तसेच पोलीसांच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे 
18:15 PM (IST)  •  17 Jun 2022

आषाढी वारीवर चिंतेचे ढग, पावसाने ओढ दिल्यानं वारकरी प्रस्थानाला मुकणार?

कोरोनामुळं दोन वर्षे पायी वारीत खंड पडला. मात्र यंदा पायी वारी निघणार असल्यानं वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळतोय. परंतु या उत्साहावर पाऊस पाणी फेरताना दिसतोय. वारकरी अर्थात शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्याने प्रस्थानाला वारकरी मुकण्याची शक्यता आहे. याबाबत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील चोपदारांशी संवाद साधलाय नाजिम मुल्ला यांनी.

16:55 PM (IST)  •  17 Jun 2022

पूर्व विदर्भातील चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचे दोन मोबाईल चोरीला 

पूर्व विदर्भातील चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचे रेल्वे प्रवासादरम्यान दोन मोबईल चोरीला गेले आहेत. पंचायतराजचा दौरा आटोपून पंढरपूरवरून मुंबईला परत येत असताना त्यांचे दोन महागडे मोबईल चोरीला गेले. त्यांनी मुंबईत पोहोचल्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून रेल्वेमंत्र्यांनाही पत्र लिहिले आहे. 

आमदार जोरगेवार पंचायत राजच्या दोऱ्यावर सोलापूरला गेले होते. त्यांच्या दौऱ्यातील शेवटचे गाव पंढरपूर होते. तेथील काम आटोपून ते कुर्डुवाडी स्थानकावरून मुंबईसाठीला येण्यासाठी सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये बसले. रात्री त्यांनी फोन चार्जिंगला लावले. पहाटे त्यांना जाग आली असता, दोन्ही फोन चोरीला गेले होते.  त्यांनी लगेच सहप्रवाशांच्या फोनवरून स्वतःचे नंबर डायल केले. परंतु, दोन्ही मोबाईल बंद होते. 

14:37 PM (IST)  •  17 Jun 2022

महाविकास आघाडीची चिंता वाढली, अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना मतदानाचा परवानगी नाहीच; हायकोर्टाचा निकाल

महाविकास आघाडीची चिंता वाढली, अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना मतदानाचा परवानगी नाहीच; हायकोर्टाचा निकाल

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सVidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया कशी असेल?TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaChhatrapati Sambhajinagar Election : संभाजीनगरात व्होटर आयडी जमा करून 1500 रूपये देण्याचा प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Embed widget