Maharashtra Breaking News LIVE Updates : चंद्रपूर जिल्ह्यात ट्रक-दुचाकीची धडक, अपघातात तीन युवकांचा मृत्यू

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Feb 2022 03:10 PM
ट्रक-दुचाकीच्या धडकेत तीन युवकांचा मृत्यू
Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यात ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 3 युवकांचा मृत्यू झाला आहे. सिंदेवाही-मूल मार्गावरील मुरमाडी येथील ही घटना असून राकेश मेश्राम, विवेक नान्हे आणि रोशन मेश्राम अशी मृत तरुणांची नावे आहेत. मृत तरूण सरडपार येथून दुचाकीने सिंदेवाहीकडे निघाले होते. मात्र विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला मुरमाडी येथील मातोश्री राईस मिल समोर धडक दिली. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर जखमी अवस्थेत तिसऱ्या तरूणाला उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले. उपचारा दरम्यान त्याचाही मृत्यू झाला.
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून 10 वकिलांची नियुक्ती करण्याची शिफारस

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून 10 वकिलांची नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. 

Aurangabad: एका गाडीत महिला आणि पुरुषाचा मृतदेह आढळला

औरंगाबाद गांधेलीनी परिसरातील एका गाडीमध्ये 35 ते 40 वर्षीय महिला आणि पुरुष याचा मृतदेह आढळला आहे. गाडी आतून जळालेली असून एसी चालू असताना स्फोट झाल्याची पोलिसांनी शंका व्यक्त केली आहे. अद्याप गाडीतील व्यक्तींची ओळख पटली नाही.

20 हजार रुपयांची लाच घेताना सरपंचाला अटक

पालघरमधील चिंचणी ग्रामपंचायतीच्या लाचखोर सरपंचाला वीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाचा हा सरपंच असून पालघर लाच लुचपत विभागाने त्याला अटक केली आहे. खाजगी विकासकाकडून घरपट्टी आणि नाहरकत दाखला देण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती. 

येस बँकेच संस्थापक आणि घोटाळ्यातील मुख्य आरोपी राणा कपूर यांना दिलासा 

Yes Bank : येस बँकेच संस्थापक आणि घोटाळ्यातील मुख्य आरोपी राणा कपूर यांना दिलासा मिळाला असून मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टाकडून त्यांना जामीन मंजूर झाला आहे. राणा कपूर यांना कठोर अटीशर्तींवर जामीन मंजूर झाला असून देशाबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसंच पासपोर्ट जमा करण्याचे आणि तपासयंत्रणेला पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश त्यांना यावेळी देण्यात आले आहेत.

Yavatmal News Update : यवतमाळ येथील बहुचर्चित डॉ. अशोक पाल खून प्रकरणातील आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल

Yavatmal News Update :  यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयमध्ये घडलेल्या बहुचर्चित डॉ. अशोक पाल खून प्रकरणातील आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 


विधी संघर्षग्रस्त असलेल्या बालक आरोपी विरुद्धचा खटला विशेष सेशन न्यायालयात चालवण्यात येणार आहे. या प्रकरणी पोलिसांनी 60 दिवसांत तपास पूर्ण केला आहे.

ईडीच्या चौकशीला घाबरून नारायण राणे भाजपमध्ये गेले ; शिवसेना नेते विनायक राऊत यांचा आरोप

wardha news update : वर्धा जिल्ह्यात सर्व माध्यमांच्या शाळा पूर्ण वेळ सुरु ठेवण्यास परवानगी

wardha news update : वर्धा जिल्ह्यात सर्व माध्यमांच्या शाळा पूर्ण वेळ सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. आदेशात कोरोना नियमांचे पालन बंधनकारक आहे.  

Satara news update : साताऱ्यातील नागेवाडी जवळ पुणे-बंगळुरू महामार्गावर अपघात, दोन ठार 

Satara news update : साताऱ्यातील नागेवाडी जवळ पुणे-बंगळुरू महामार्गावर पिकअप गाडीला स्कोडा कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सातारा तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

Satara news update : साताऱ्यातील नागेवाडी जवळ पुणे-बंगळुरू महामार्गावर अपघात, दोन ठार 

Satara news update : साताऱ्यातील नागेवाडी जवळ पुणे-बंगळुरू महामार्गावर पिकअप गाडीला स्कोडा कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सातारा तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

Maharashtra Baramati News : बारामती तालुक्यातील सोनगावचे सुपुत्र वीर जवान अशोक इंगवले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
बारामती तालुक्यातील सोनगाव गावातील सीआरपीएफ जवान अशोक इंगवले यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं.. पंजाबमधील भटिंडा येथे मंगळवारी अशोक इंगवले यांचे निधन झालं. त्यांचं पार्थिवावर सोनगाव या त्या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले...  इंगवले हे मागील नऊ वर्षापासून सीआरपीएफ जवान म्हणून सेवा बजावत होते. सध्या ते रांची या ठिकाणी कार्यरत होते. निवडणुकांमध्ये ते पंजाबमध्ये बंदोबस्तावर असताना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना वीरमरण प्राप्त झाले... अशोक इंगवले यंच्या निधनाने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला असून  वीर जवान अमर रहे ! अशोक इंगवले अमर रहे अशा घोषणा देत त्यांच्यावर ती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे आई ,वडील, पत्नी, दीड वर्षाचा मुलगा आणि दोन महिन्यांची मुलगी असा परिवार आहे.

 
Maharashtra Ahemadnagar karjat Update : कर्जत नगरपंचायत नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उषा राऊत तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या रोहिणी घुले

Maharashtra Ahemadnagar karjat Update :   : अहमदनगरच्या कर्जत नगरपंचायत नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उषा राऊत यांची निवड झालीये. तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या रोहिणी घुले यांची निवड झालीये. राष्ट्रवादीकडून एकमेव अर्ज आल्याने उषा राऊत यांची बिनविरोध निवड झालीये. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकलाय...कर्जत नगरपंचायतमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवली यात राष्ट्रवादीला 12 तर काँग्रेसला 3 जागा मिळाल्या आणि नगरपंचायतच्या 17 पैकी 15 जागांवर आघाडीला विजय मिळाला. या निवडणुकीच्या आधी भाजपमधून राष्ट्रवादीच्या गोटात सामील झालेल्या नामदेव राऊत यांची भूमिका सत्ता मिळवण्यासाठी महत्वाची ठरली...त्यामुळे त्यांच्याच घरात नगराध्यक्ष पद गेलंय. 

Maharashtra Ahemadnagar Parner Update : पारनेर नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी विजय औटी यांची तर उपनगराध्यक्षपदी सुरेखा भालेकर 

Maharashtra Ahemadnagar Parner Update : पारनेर नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी विजय औटी यांची तर उपनगराध्यक्षपदी सुरेखा भालेकर 
 पारनेर, अहमदनगर : पारनेर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक आज पार पडली...राष्ट्रवादीच्या विजय औटी यांची नगराध्यक्षपदी तर उपनगराध्यक्षपदी सुरेखा भालेकर यांची निवड झाली...या निवडणुकीला पीठासीन अधिकारी म्हणून पारनेर-श्रीगोंद्याचे प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी काम पाहिले... नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले... राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विजय औटी तर शिवसेनेतर्फे नवनाथ सोबले यांनी अर्ज दाखल केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत असल्याने विजय औटी यांची निवड झाली...पारनेर नगरपंचायतवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकल्याने आमदार निलेश लंके यांची पारनेरमध्ये आणखी ताकद वाढली आहे....

विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या कालच्या बैठकीत झालेल्या निर्णयावर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करणार

विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या कालच्या बैठकीत झालेल्या निर्णयावर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करणार


राज्यपालांच्या अभिभाषणाच्या प्रारुपाला ही आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता मिळणार

संत रविदास महाराज जयंती दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई, .: संत रविदास महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार सरोज अहिरे, आमदार संजय दौंड, आमदार यशवंत माने, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव इंद्रा मालो आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संत रविदास महाराजांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Maharashtra Beed News Updates : बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राडा, दोन गटात तुंबळ हाणामारी

Maharashtra Beed News Updates : बीडमधील  छत्रपती शिवाजी महाराज चौकात राडा झाल्याचं पाहायला मिळालं. दोन गटात तुंबळ हाणामारी झाली.  अचानक दोन गट आमनेसामने आल्याने थोडा काळ तणाव झाला, शिवाय वाहतूक देखील बऱ्याच काळ खोळंबून राहिली. तब्बल पंधरा मिनिटानंतर दोन्ही गटातील वाद शांत झाला.


 

संजय राऊत यांचं सूचक ट्वीट- म्हणाले...

संजय राऊत यांचं सूचक ट्वीट- म्हणाले बाप बेटे जेल मधे जाणार! Wait and watch! कोठडीचे sanitization सुरू आहे.. जय महाराष्ट्र!





प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांचं निधन

Maharashtra Sangli jath update : सांगली :  जतमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून तणाव, जमावबंदी आदेश लागू..जत शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

Maharashtra Sangli jath update : सांगली :  जतमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून तणाव, जमावबंदी आदेश लागू..जत शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात,


2 दिवसांपूर्वीच बऱ्याच वादानंतर सांगलीहुन हा पुतळा जत मध्ये  नेण्यात आला होता, पण पुतळा बसवण्यास प्रशासनाने परवानगी दिली नव्हती


जिल्हाधिकाऱ्यांनी पुतळा बसविण्यासाठी आवश्यक परवानगी घेतल्याशिवाय हा पुतळा चबुतरावर उभा करता येणार नाही असा निर्णय दिलाय


पुतळा समितीने जुन्या ठिकाणीच पुतळा बसविण्यात येणार असून जीर्णोद्धार करत असल्याने परवानगीची आवश्यकता नाही असा दावा केलाय


यामुळे जत मधील वातावरण तणावपूर्ण बनले असून काल सायंकाळी पोलिसांचे शहरातून संचलन


 संभाजी भिडे यांनी सुद्धा जाऊन काल जत मध्ये जात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेत पुतळा समितीच्या सदस्याची घेतली  भेट 

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

संजय राऊतांचा सोमय्या पिता-पुत्रांवर हल्लाबोल; आरोपांवर आज सोमय्या दिल्लीत प्रत्युत्तर देणार



Kirit Somaiya Press Conference On Sanjay Raut :  संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा उल्लेख मुलुंडचा दलाल असा केला. मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेऊन सांगतो, ईडीच्या (ED) धाडी पडणार, असंही राऊत म्हणाले आहेत. तर मुख्यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सोमय्यांनी ते 19 बंगले दाखवावं नाही तर शिवसैनिक जोड्यानं मारतील असा इशारा दिला आहे. अशातच आज सकाळी राऊतांच्या आरोपांना उत्तरं देण्यासाठी साडेनऊ वाजता किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेणार आहेत. सध्या किरीट सोमय्या दिल्लीत असून दिल्लीतून पत्रकार परिषद येणार आहेत. 


शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून केलेल्या आरोपानंतर भाजप नेते किरीट सोमय्या हे दिल्लीमध्ये गेले. त्या ठिकाणी त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी सांगितली आहे. संजय राऊतांच्या आरोपांवर आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या उत्तर देणार आहेत. 



ABG Bank Fraud : काही राज्यांनी CBIच्या तपासाची संमती काढून घेतल्याने अनेक अडचणी: सीबीआयचा राज्य सरकारांवर गंभीर आरोप
 
ABG Bank Fraud Case: बँक इतिहासातील सर्वात मोठा घोटाळ्याप्रकरणी (22842 कोटी रुपये) आठ आरोपींच्या विरोधात सीबीआयने लूक आऊट नोटीस जारी केली आहे मात्र काही राज्यांनी CBIच्या तपासाला दिलेली सर्वसाधारण संमती काढून घेतल्याने अनेक अडचणी येत असल्याचा गंभीर आरोप सीबीआयनं काही राज्य सरकारांवर केला आहे. एबीजी शिपयार्डप्रकरणी सीबीआयकडून सविस्तर प्रेस रिलीज जारी करण्यात आली आहे. या प्रकरणी संचालक ऋषी अग्रवाल आणि 8 आरोपींविरोधात लुकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आली असून सर्व आरोपी भारतातच असल्याची माहिती आहे.


12 फेब्रुवारी रोजी 12 ठिकाणी सीबीआयकडून धाडसत्र टाकण्यात आले. यात कंपनी खात्यांची पुस्तके, खरेदी-विक्रीचा तपशील, विविध कराराच्या फाइल्ससोबतच अन्य महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.


एबीजी शिपयार्ड कंपनीकडून अनेक नियमबाह्य कामं, बॅंकांची कर्ज परदेशात वळवत तिथे मोठी गुंतवणूक, काही जणांच्या नावे मोठी मालमत्ता खरेदी करण्यासाठी निधी वळवण्यात आल्याचा आरोप  आहे. सीबीआयला सुरुवातीच्या तपासात असं लक्षात आलं की 2005 ते 2012 हा कालावधी गंभीर असून मोठी आर्थिक अनियमितता आहे.


सीबीआयने पत्रकात असंही म्हटलंय की,  त्यांना अनेक महत्त्वाच्या प्रकरणांची नोंद करण्यात अडचण येत आहे. कारण काही राज्यांनी सीबीआयच्या चौकशीतून सर्वसाधारण संमती (जनरल कंसेन्ट) काढून घेतली आहे.  काही राज्यांनी सीबीआयच्या तपासाला दिलेली सर्वसाधारण संमती काढून घेतल्याने अनेक अडचणी येत आहेत असा  गंभीर आरोप सीबीआयनं राज्य सरकारांवर केला आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.