Maharashtra Breaking News 14 September 2022 : महाविकास आघाडी सरकारने नियुक्त केलेल्या नियुक्त्या रद्द
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...
संजय राऊतांच्या (Sanjay Raut) जामीन याचिकेवर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी
संजय राऊतांच्या जामीन याचिकेवर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. संजय राऊतांच्या याचिकेवर ईडी आपलं उत्तर सादर करणार आहे
महाराष्ट्रात आज चांगल्या पावसाचा अंदाज (Maharashtra Rain Update)
कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेशकडे सरकले असले तरी महाराष्ट्रात पुढील आज चांगल्या पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे मुंबईसोबतच उपनगरात जोरदार पावसाची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्री रेणुकाजी सिंह शिरूर लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर
केंद्रीय मंत्री रेणुका सिंह या शिरूर लोकसभा मतदार संघाचा दौरा करणार आहेत. 14 ते 16 सप्टेंबर दरम्यान संघटनात्मक व सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ईडी (ED) कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) गेल्या अनेक दिवसांपासून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. आता दिल्ली पोलिसांकडून जॅकलीनला मनी लाँड्रिंग प्रकरणी समन्स बजावण्यात आला आहे. 14 सप्टेंबरला जॅकलीन सकाळी 11 वाजता चौकशीला उपस्थित राहणार आहे
हर्षा इंजिनिअर या कंपनीचा आज आयपीओ (IPO) येणार
बेअरिंग केज बनवणाऱ्या हर्षा इंजिनिअर या कंपनीचा आयपीओ येणार आहे. कंपनी आयपीओच्या (IPO) माध्यमातून शेअर बाजारात लिस्ट होणार असून या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 755 कोटी रुपये उभारणार आहे. कंपनीने 314 ते 330 रुपयांच्या दरम्यान प्राइस बँड निश्चित केला आहे.
आज हिंदी दिवस
हिंदी भाषेचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जातो. आजच्या दिवशी हिंदी भाषा भारताच्या अधिकृत भाषांपैकी एक म्हणून घोषित करण्यात आली.
महाविकास आघाडी सरकारने नियुक्त केलेल्या नियुक्त्या रद्द
महाविकास आघाडी सरकारने नियुक्त केलेल्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यातील ग्राम, तालुका, नगरपालिका, महानगरपालिका व जिल्हास्ततावर स्थापन करण्यात आलेल्या दक्षता समित्यावरील अशासकिय सदस्याच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.
जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणावर देखरेख रहावा यासाठी या दक्षता समित्या नेमल्या जातात. सत्तांतर झाल्यानंतर या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Mumbai Metro : घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो सेवा विस्कळीत
Mumbai Metro : घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो सेवा विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे मेट्रोला 15 मिनिटे विलंब झाला आहे.
Service update | #MumbaiMetroOne services delayed due to a technical fault. Efforts are on to resume services at the earliest. Appreciate your patience and support. #HaveANiceDay
— Mumbai Metro (@mumbaimetro01) September 14, 2022
Raigad : नागोठणे ते रोहा दरम्यान गुरे चोरणाऱ्या टोळीचा पाठलाग; आरोपी फरार
Raigad : नागोठणे ते रोहा दरम्यान गुरे चोरणाऱ्या टोळीचा पाठलाग करण्यात आला आहे. पण आरोपी फरार झाले आहेत. आरोपींच्या गाडीने पोलीसांच्या गाडीला ठोकर दिली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास आरोपींचा पाठलाग करण्यात आला होता.
लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे वयाच्या 90व्या वर्षी पुणे येथे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन
मूळच्या संगमनेरच्या असलेल्या ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे वयाच्या 90व्या वर्षी पुणे येथे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.
Aaditya Thackeray : फॉक्सकॉनबाबत व्हॉटसअॅपवर खोटे मेसेज : आदित्य ठाकरे
Aaditya Thackeray : फॉक्सकॉनबाबत व्हॉटसअॅपवर खोटे मेसेज पसरवले जात आहे. 40 गद्दारांनी सरकार पाडलं म्हणून प्रकल्प मागे राहिला. जेव्हा हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला तेव्हा मुख्यमंत्री देवदर्शनात व्यस्त होते असं आदित्य ठाकरे म्हणाले.