Maharashtra Breaking News LIVE Updates : पुण्यातील कोविड सेंटरचं कंत्राट मुंबईतील चहावाल्याला!
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
राष्ट्रपतींचा आज रत्नागिरी दौरा; आंबडवे गावाला भेट देणार
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते मंडणगड तालुक्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे या गावाला भेट देणार आहेत. राष्ट्रपती यांचा दौरा हा ऐतिासिक आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता आजची राष्ट्रपतींची आंबडवे गावाला भेट ही अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. मंडणगड शहराशिवाय आंबडवे गावच्या परिसराला छावणीचे स्वरूप आल्याचे चित्र आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्भूमीवर याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राष्ट्रपतीच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.
माघी एकादशीनिमित्त कोरोनाच्या सावटानंतर पहिल्यांदाच गजबजली पंढरी; चार लाख भाविक दाखल
आज माघ शुद्ध अर्थात जया एकादशी. कोरोनाच्या महामारीनंतर जवळपास सहा महत्वाच्या वाऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. आजची माघी वारी कोरोना नंतरची पहिली वारी आहे ज्या वारीला वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यामुळं वारकऱ्यांमध्ये देखील चैतन्याचं वातावरण आहे. दरम्यान माघीच्या निमित्तानं विठुरायाची महापूजा मंदिर समितीचे सदस्य अतुल महाराज भगरे यांच्या हस्ते तर रुक्मिणी मातेची महापूजा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते पार पडली. एसटीचा संप असूनही जवळपास चार लाख भाविक या सोहळ्यासाठी पंढरीत दाखल झाल्याने पंढरी नगरी हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून निघाली आहे. विठुरायाच्या प्रमुख यात्रांपैकी माघी यात्रा ओळखली जाते. आज या सोहळ्यानिमित्त विठुरायाची महापूजा भगरे गुरुजी यांनी सपत्नीक केली. रुक्मिणी मातेची महापूजा प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सपत्नीक केली.
मुंबई महापालिकेत उंदीर मारण्याचा घोटाळा; भाजप मनपा गटनेते प्रभाकर शिंदेंचा स्थायी समितीत आरोप
मुंबई महापालिकेत उंदीर मारण्याचा घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपनं स्थायी समितीत केला आहे. मुंबईकरांचा त्रास दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या किटक नाशक विभागाच्या माध्यमातून उंदरांचा नायनाट करण्यात येतो. उंदिर मारण्याबाबतचा 2 कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी आला होता. त्यात ए ते टी विभागात म्हणजेच मुंबई शहर आणि पूर्व उपनगरात 1 कोटी रुपये खर्च करून उंदिर मारण्यात आल्याचे म्हटले आहे, अशी माहिती भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली आहे. प्रभाकर शिंदे यांनी म्हटलं आहे की, एक उंदिर मारण्यासाठी 20 रुपये तर ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा अधिक उंदिर मारल्यास प्रत्येक उंदिर मारण्यास 22 रुपये या दराने उंदिर मारण्यात आल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे. पालिकेने केवळ 5 वॉर्डमध्ये 1 कोटी रुपये खर्च करून उंदीर मारले आहेत. मात्र किती उंदिर मारले याचा आकडा पालिकेने दिलेला नाही, प्रभाकर शिंदे यांनी म्हटलं आहे. उंदरांच्या उत्पतीची कारणे कोणती ती सुद्धा प्रस्तावात दिलेली नाहीत. यामुळे नक्कीच उंदिर मारले गेले का यावर शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला.
नागपूर अमरावती महामार्गावर भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू
कोंढाळी परिसरात कारचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून एक महिला दोन पुरुषांचा समावेश आहे. नागपूर -अमरावती राष्ट्रीय मार्गावरील कोंढाळी नजिकच्या निर्मल सूतगिरणी समोर दुपारी12 वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात घडला आहे. अमरावती कडून नागपूरच्या दिशेने येत असलेल्या जाणारी एमपी 20 - सीएच 3041 क्रमांकाची कारचा टायर फुटल्याने कारचालकाचे वाहावरून नियंत्रण सुटल्याने गाडी दुभाजकावर फेकल्या गेल्याने रोडच्या दुसऱ्या बाजूला जाऊन गाडीने पलटी खालली. त्यामुळे गाडीत बसलेल्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये एक महीला दोन पुरूष जागीच ठार झाले. अपघात इतका भयंकर होता की मृतदेह काढण्यासाठी सुद्धा अडचण गेली. घटनेची माहित मिळताच कोंढाळीचे ठाणेदार चंद्रकांत काळे आणि महामार्ग सुरक्षा पोलीस सहघटना स्थळी वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.
चंद्रपूर : वाघिणीला जेरबंद करण्यात यश..
चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोंडेगाव-सीतारामपेठ भागात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात यश... जेरबंद करण्यात आलेल्या वाघिणीचे वय अंदाजे २२ महिने असून ती सोनम या वाघिणीपासून म्हणजे आपल्या आई पासून अलीकडेच वेगळी झाली होती. मात्र ही वाघीण वारंवार पाळीव प्राण्यांवर हल्ले करत होती, सोबतच या वाघिणीच्या हल्ल्यात २ गुराखी जखमी झाले होते तर नमू धांडे (५७) या ग्रामस्थाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे वनविभागाने आज दुपारी या वाघिणीला डार्ट मारून बेशुध्द केले, सध्या या वाघिणीला चंद्रपूरच्या ट्रान्सीट ट्रीटमेंट सेंटर मध्ये ठेवण्यात आले आहे.
अश्या धमक्या रोज येत राहतात, मी माझं काम करत राहीन - एकनाथ शिंदे
नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व गेल्या अनेक महिन्यांपासून एकनाथ शिंदे करत आहेत. यामध्ये अनेक नक्षलवाद्यांवर कारवायादेखील करण्यात आल्या. यामुळेच नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदे याना वारंवार धमकीचे फोन आणि पत्र येत आहेत. त्यात आज गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी ट्विट करून एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे तरी सुरक्षेत वाढ करावी अशा सूचना केल्या आहेत. परंतु अशा बऱ्याच धमक्या येत असतात, मी माझं काम करत राहीन, असे एकनाथ शिंदे म्हणाले. गडचिरोली जिल्हा नक्षलवादी जिल्हा आहे त्या भागाचे नक्कीच सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री आणि सरकार करत आहे. आणि मीही करिन आणि सुक्षेत वाढ करावी कि नाही हे गृह खात ठरवत. सर्वस्वी निर्णय त्यांचा आहे परंतु अश्या धमक्यांचा मला कधीच फरक पडला नाही असे एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर सांगितले.
दहा मार्च नंतर महाविकास आघाडी सरकार जाणार असा दावा पुन्हा एकदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय
चंद्रकांत पाटील पिंपरी-चिंचवडमधे आले असता पत्रकारांनी काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या अशा प्रकारच्या दाव्याबाबत विचारले असता पाच राज्यातील निवडणूका झाल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जाणार आहे असं ते म्हणाले. महाविकास आघाडीतील मंत्री एकामागोमाग एक घोटाळ्यात अडकत असल्याने महाविकास आघाडीचे सरकार जाईल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलय. मागील आठवड्यात चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील मांजरी भागातील एका सभेत बोलताना दहा मार्चनंतर महाविकास आघाडीचे सरकार जाईल असं म्हटलं होतं. मात्र सभेनंतर त्या वक्तव्याबद्दल विचारले असता कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आपण दहा मार्चची तारीख दिल्याच चंद्रकांत पाटील यांनी म्हटल होत. मात्र आता पुन्हा एकदा त्यांनी दहा मार्चनंतर महाविकास आघाडी सरकार जाईल नमस्कार असं विधान केलय.