Maharashtra Breaking News 10 August 2022 : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, आता थेट 22 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत...
Maharashtra Cabinet Expansion : कोणी एकदा, तर कोणी तीनदा पक्ष बदलला! शिंदे-फडणवीस सरकारमधील 6 मंत्र्यांची फिरती राजकीय निष्ठा न्यारीच!
Maharashtra Cabinet Expansion : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यापासून फक्त 2 जणांवर कारभार चाललेल्या राज्यातील शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. त्यामुळे तब्बल 40 दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर राज्याला किमान 20 जणांचे मंत्रिमंडळ मिळाले आहे.
आज राजभवनात शपथविधी पार पडला. यामध्ये भाजपकडून पहिली शपथ काँग्रेसमधून भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा या क्रमाने 18 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
18 पैकी 6 मंत्र्यांच्या या पक्षातून त्या पक्षात उड्या
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेनेतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून राळ उडवून दिली तेच भाजपमध्ये नेते सामील झाले आहेत. त्यामुळे या नेत्यांच्या चौकशीचे पुढे भाजपमध्ये जाऊन काय होते? याचे उत्तर कधीच मिळत नाही. केंद्रीय तपास यंत्रणांनी सुद्धा भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांची चौकशी सुरुच ठेवली का? याचेही कधीच प्रामाणिक उत्तर दिलेलं नाही.
राधाकृष्ण विखे पाटील यांचा काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस ते भाजप असा प्रवास
विखे पाटील घराण्याला मोठा सहकार आणि राजकीय वारसा आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आज त्यांना पहिल्यांदा शपथ देण्यात आली. त्यांचा काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस ते भाजप असा त्यांचा प्रवास राहिला आहे. जवळपास सहा मुख्यमंत्र्यांसमवेत त्यांनी काम केलं आहे. त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून सक्षम जबाबदारी पार पाडण्याऐवजी 2014 मध्ये भाजपत प्रवेश केला होता.
मनोधैर्य योजनेकडे शासनाचं दुर्लक्ष, मदत निधी मिळवणाऱ्या पीडित महिलांची संख्या कमी, चित्रा वाघ यांचे आरोप
बलात्कार पीडित महिला तसेच लैंगिक छळाच्या प्रकरणातील अल्पवयीन मुलींना त्यांच्यासोबत घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर पुन्हा जीवनात उभारी घेता यावी, या उद्दिष्टाने महाराष्ट्र सरकार गेले अनेक वर्षांपासून मनोधैर्य योजना राबवीत आहे. मात्र गेल्या काही वर्षात मनोधैर्य योजनेकडे सरकारचा दुर्लक्ष होत आहे का अशी शंका निर्माण झाल्याचे सांगत भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी यासंदर्भात आघाडी सरकारवर आरोप केले आहे. काय म्हणाल्या चित्रा वाघ?
शासन पातळीवर निधी मिळत नव्हते
एका बाजूला बलात्कार तसेच लैंगिक छळाच्या घटना वाढत असताना वर्षागणिक मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून मदत निधी मिळवणाऱ्या पीडित महिलांची आणि मुलींची संख्या सातत्याने कमी होत आहे. गेल्या काही वर्षात मनोधैर्य योजनेमध्ये मदत मिळवून नव्याने जीवन सुरू करणाऱ्या महिलांची संख्या लक्षात घेतली तर सातत्याने निधी मिळवणाऱ्या पीडितांची संख्या खाली घसरत असल्याचे दिसून येते. वर्ष 2014-15 मध्ये मनोधैर्य योजनेत निधी मिळवणाऱ्या महिलांची संख्या 2 हजार 502 होती. ती वर्ष 2019-20 पर्यंत 462 पर्यंत खाली आली आहे. असं सांगत चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
बीडी पिण्याच्या सवईने घेतला,माय लेकरांसह बापाचा जीव
कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या सवईमुळे पूर्ण कुटुंबच संपल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडलीय,ज्यात बीडी पितांना, आग पेटीची काडी पीक फवारणीच्या पेट्रोल टॅंक मध्ये पडून एकाच घरातील तिघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडलीय.दरम्यान या घटनेत पेट्रोलचा भडका उडाल्याने एकाच घरातील आई, वडील व मुलगा यांचा जळून मृत्यू झाला. ही घटना सात ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडलीय. उपचारा दरम्यान या तिघांचाही नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात आज मृत्यू झालाय.याप्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवलीत दोन महिन्यात स्वाईन फ्ल्यूचे ४८ रुग्ण ,दोन जणांचा मृत्यू ..
ल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सर्दी खोकला तापाचे रुग्ण वाढत आहेत .तर स्वाईन फ्ल्यूची रूग्नसंख्या वाढत असून जूनपासून आजमितीला स्वाईन फ्ल्यूचे ४८ रुग्ण आढळले असून ८५ वर्षीय पुरुष व ५२ वर्षीय महिला या २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे दोन्ही रुग्ण सहव्याधिग्रत होते. ४८ मधील २४ रुग्ण बरे होवून घरी परतले असून २२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीने जनजागृती मोहीम हाती घेतली असून सर्दी, खोकला, घसादुखी, ताप अशी लक्षणे आढळून आल्यास स्वतःला आयसोलेट करावे, गर्दीत जाऊ नये तसेच मास्कचा वापर करावा व ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.
मध्यप्रदेश राज्याचा संपर्क तुटला...बावनथडी नदी ओवर फ्लो झाल्याने महाराष्ट्र - मध्यप्रदेश यांच्या बपेरा जवळ संपर्क तुटला.
महाराष्ट्र -मध्यप्रदेश राज्याचा संपर्क तुटला.अखेर तुमसर तालुक्यातुन वाहनारी बावणथड़ी नदी ओवर फ्लो झाल्याने तुमसर तालुक्यातिल बपेरा येथे महाराष्ट्र - मध्यप्रदेश जोड़नाऱ्याला पुलावरुन पाणी वाहु लागले आहे।त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता हा मार्ग जिल्हा प्रशासनने बंद केल्याने महाराष्ट्र - मध्यप्रदेश राज्याचा संपर्क तुटला आहे।त्यामुळे भंडारा वरुण बपेरा मार्ग मध्यप्रदेशाच्या जाणाऱ्या विचार करीत असाल तर पाण्याची स्थिति लक्षात घेता प्रवास करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मातोश्री वर उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट
मोहरम विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवल्याने गुन्हा दाखल
अहमदनगर येथे मोहरम विसर्जन मिरवणुकीत विनापरवाना जास्त आवाजात डीजे वाजवल्याने डीजे मालक आणि जामा मस्जिद यंग पार्टी मंडळाचे अध्यक्षावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय...जामा मस्जिद यंग पार्टी मंडळाचे अध्यक्ष आवेज निसारअहमद शेख आणि डिजेचे मालक विवेक सुभाष खोमणे यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय...अहमदनगर शहरातील जुन्या कोर्टाच्या मागे जामा मस्जिद यंग पार्टी मंडळच्या अध्यक्षांनी शरबत वाटपाची परवानगी मागितली होती..त्यावेळी डीजे लावण्यात आला होता...डीजेच्या डेसिबलवर निर्बंध असताना मोठ्या आवाजात डीजे लावण्याने डीजे मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय...याबाबत कोतवाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी योगेश खामकर यांनी फिर्याद दिलीये.