Maharashtra Breaking News LIVE Updates : देश-विदेशातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 May 2022 08:28 PM
Osmanabad: उस्मानाबादेत दोन दुकानांना भिषण आग, लाखो रुपयांचे नुकसान

उस्मानाबाद शहरातील प्रेरणा नगर परिसरात दोन दुकानं भिषण आग लागली आहे. यात एक फर्निचर आणि एक सर्व्हिसिंग सेंटर, असे दोन्ही दुकाने जळून खाक झाली आहेत. दोन अग्निशामक दलाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र दोन्ही गाड्यांना अपयश आले त्यानंतर आणखी दोन अग्निशमन दलाच्या गाड्या आणि दोन पाणी टँकर बोलावून आग आटोक्यात आणण्यात आली. यासाठी तब्बल अडीच तासापेक्षा अधिक वेळ आग तेवत होती, यात दोन्ही दुकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले

Swaraj Express : स्वराज एक्स्प्रेसमध्ये तरुणीचा मृतदेह; धावत्या रेल्वेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा संशय 

स्वराज एक्स्प्रेसच्या टॉयलेटमध्ये तरुणीचा मृतदेह सापडला आहे. धावत्या रेल्वेमध्ये या तरुणीनं गळफास घेतल्याचा शंयश व्यक्त करण्यात येत आहे. आरती कुमारी मिथिलेश पाल ( वय 20)  असे मृत तरुणीचे नाव असून ती बिहार मधील रहिवाशी असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य प्रवक्ते सुमित ठाकूर यांनी दिली. 

Navneet Kaur Rana : राणा दाम्पत्य उद्या दिल्लीला जाणार, राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांविरोधात लोकसभा अध्यांकडे करणार तक्रार? 

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा उद्या सकाळी दिल्लीसाठी जाणार आहेत. नवनीत राणा यांना आजच लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दिल्ली येथे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि काही केंद्रीय मंत्र्यांना भेटून राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांविरोधात राणा यांच्याकडून तक्रार करण्यात येणार  असल्याची माहिती मिळत आहे. 

Parbhani News Update : परभणीत उष्माघाताचा पहिला बळी, सोनपेठ तालुक्यातील वृद्धाचा मृत्यू

राज्यात उन्हाचा कडाका प्रचंड वाढलाय. त्यातच परभणी जिल्ह्याचे तापमान जवळपास महिना भरापासून 40 अंशाच्या वरती आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उष्णता वाढली असून आज उष्माघाताने सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा येथील 82 वर्षीय दत्ता पोमा जाधव या वृद्धाचा मृत्यू झालाय. जाधव हे शेतात गेले होते, यावेळी त्यांना ऊन लागल्याने अंबाजोगाई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

Ahmednagar News Update : शेततळ्यात बुडून बहिण भावाचा मृत्यू 

शेततळ्यात बुडून बहिण भावाचा मृत्यू  झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मोधळवाडीच्या घाणेवस्ती येथे घी घटना घडली. जयश्री बबन शिंदे (वय 21 ) आणि आयुष बबन शिंदे (वय 7 ) अशी मृत बहिण भावाची नावे आहेत. शेततळ्यातून पाणी काढताना पाय घसरल्याने आयुष शेततळ्यात पडला. भावाला वाचवण्यासाठी बहिण जयश्रीने शेततळ्यात ऊडी घेतली. परंतु, दुर्देवाने यात दोघांचाही मृत्यू झाला.  

Pune News : वसंत मोरे राज ठाकरेंच्या भेटीला, वसंत मोरे यांनी राज ठाकरेंची पुण्यातील निवासस्थानी राजमहल येथे घेतली भेट

Pune News : वसंत मोरे राज ठाकरेंच्या भेटीला, वसंत मोरे यांनी राज ठाकरेंची पुण्यातील निवासस्थानी राजमहल येथे घेतली भेट ..

राज ठाकरेंकडून वसंत मोरे यांनी आयोजित केलेल्या आरतीचे कौतुक 

आरतीचे नियोजन केल्याबद्दल देखील राज ठाकरेंकडून विचारपूस

पुढील आठवड्यात वसंत मोरे यांना मुंबईला भेटीसाठी बोलावले आहे..

Solapur News : मंत्री,आमदारांच्या थकीत वीजबिलासाठी 'भीक मागो आंदोलन' 

Solapur News :  राज्यातील अनेक लोकप्रतिनिधचे महावितरणकडे वीजबिल थकीत असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. मंत्री, आमदारांच्या या थकीत बिलावरून सोलापुरातील एका शेतकऱ्याने अनोखे आंदोलन केले आहे. लोकप्रतिनिधींचे हे बिल भरण्यासाठी लोकांकडे भीक मागत असल्याचे म्हणत आंदोलन सुरु करण्यात आले आहे. अनिल पाटील असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सोलापुरातील रुपाभवानी मातेच दर्शन घेऊन त्यांनी भीक मागायला सुरुवात केली आहे. राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात दोन दिवस भीक मागणार असून मिळालेली रक्कम संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करणार असल्याची प्रतिक्रिया अनिल पाटील यांनी दिली. या शेतकऱ्याने सुरु केलेल्या या आंदोलनाने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

Ashadhi Wari : आषाढी वारीची घोषणा, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला पंढरीकडे प्रस्थान

अखंड वारकरी सांप्रदाय ज्याची आस लावून होता त्या आषाढी वारीची घोषणा झालीये. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. देहू संस्थांनने या सोहळ्याची आज घोषणा केलीये. त्यामुळे वारकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या पालखी सोहळ्यात एकूण 329 दिंड्या सहभागी होतात. यंदा ही पालखी पुणे आणि इंदापूर मध्ये दोन दिवसांच्या मुक्कामी असेल. पायी प्रवास पूर्ण करून पालखी 9 जुलैला पंढरपूरमध्ये पोहचेल. तर 10 जुलैला आषाढी एकादशी साजरी होईल. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आळंदी येथून 21 जूनला प्रस्थान करणार आहे. 

 बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती झाली असली तरी महाराष्ट्राला उकाड्यापासून दिलासा नाही,  उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा

 बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती झाली असली तरी महाराष्ट्राला उकाड्यापासून दिलासा नाही, 

*उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा *

आज आणि उद्या उत्तर महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा अंदाज 

आज धुळे, जळगाव आणि अहमदनगरमध्ये उष्णतेची लाट, कमाल तापमानात वाढ दिसणार तर उद्या धुळे, जळगाव, अहमदनगर आणि नाशिकात उष्णतेच्या लाटेचा अंदाज, अंगाची काहिली होणार 

विदर्भात उद्यापासून १२ मे पर्यंत उष्णतेच्या लाटेचा अंदाज 

नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी तापमान अधिक असणार, उष्णतेच्या लाटेचा अंदाज, काही ठिकाणी तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता 

नागपुरात पुढील ४ दिवस उष्णतेच्या लाटेमुळे तापमान ४५ अंश सेल्सिअस असण्याची शक्यता 

तळकोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात ११ आणि १२ मे रोजी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

Navneet Rana Discharge : खासदार नवनीत राणा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून औक्षण

Navneet Rana Discharge : खासदार नवनीत राणा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून औक्षण 

शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान 14 मे रोजी, सायंकाळी 7 वाजता बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभा

शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान 14 मे रोजी, सायंकाळी 7 वाजता बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभा

Subhash Desai In Nagpur IIM Program : राज्य शासनाकडून जे जे सहकार्य लागेल ते देऊ - सुभाष देसाई

Subhash Desai In Nagpur IIM Program : बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासाचे जे स्वप्न पाहिले होते, त्याकडे आज एक पाऊल पडत आहे.. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांची भागीदारी आयआयएम नागपूर सोबत असल्याने चांगले परिणाम आयआयएम नागपूर देईल असा विश्वास आहे... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर आयआयएमसाठी राज्य शासनाकडून जे जे सहकार्य लागेल ते देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे - सुभाष देसाई

Nagpur IIM Program Devendra Fadnavis : पंतप्रधानांनी भूमिपूजन केले आणि आज राष्ट्रपती त्याचे उद्घाटन करत आहेत- देवेंद्र फडणवीस

Nagpur IIM Program Devendra Fadnavis : नरेंद्र मोदी यांनी 7 वर्षांपूर्वी देशात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मनुष्य बळ तयार करण्यासाठी आयआयएमची संख्या वाढविण्याचे निर्णय घेतले... महाराष्ट्रात आयआयएम नागपुरात करण्याचे ठरले... काहींनी वाद निर्माण केले की प्रस्ताव औरंगाबाद आणि नाशिकचे होते, मात्र प्रस्ताव फक्त नागपूरचा होता.  लगेच कामाला सुरुवात झाली.. 150 एकर जागा उपलब्ध करून दिली.. पंतप्रधानांनी भूमिपूजन केले आणि आज राष्ट्रपती त्याचे उद्घाटन करत आहेत- देवेंद्र फडणवीस

ठरलं! 10 जून, संजय राऊतांनी सांगितला आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचा मुहूर्त

Maharashtra News : कणकवलीतील नरडवे धरणाच्या कामास धरणग्रस्तांचा विरोध, पाटबंधारे विभागाने पोलिस बंदोबस्तामध्ये काम सुरू केलेला प्रयत्न असफल

Maharashtra News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीतील नरडवे-महंमदवाडी येथील धरण प्रकल्पाचे काम सुरू करण्यास धरणग्रस्तांनी आज पुन्हा विरोध केला आहे. पाटबंधारे विभागाने पोलिस बंदोबस्तामध्ये काम सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रकल्पग्रस्तांनी प्रलंबित प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत प्रकल्पाचे काम सुरू होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले. या प्रश्नावर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंतानी प्रकल्पग्रस्तांशी चर्चा सुरू ठेवली होती. मात्र तोडगा निघाला नाही. नरडवे धरण प्रकल्पाचे काम 90 टक्के पूर्ण असून यंदा घळभरणी पूर्ण झाल्यानंतर धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा केला जाणार आहे. मात्र अजूनही अनेक धरणग्रस्तांच भूखंडाचे वाटप झालेली नाही. त्यामुळेच नरडवे धरणाच्या कामास धरणग्रस्तांचा विरोध आहे. मात्र पाटबंधारे विभागाने पोलिस बंदोबस्तामध्ये काम सुरू केलेला प्रयत्न केला होता तो प्रयत्न धरणग्रस्तांनी हाणून पाडला आहे.

#BREAKING : Raigad Accident : रायगडच्या घोणसे घाटात भीषण अपघात, बस पुलावरुन कोसळली, तिघांचा मृत्यू

#BREAKING : Raigad Accident : रायगडच्या घोणसे घाटात भीषण अपघात, बस पुलावरुन कोसळली, तिघांचा मृत्यू,  मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता,  ठाणे येथून श्रीवर्धन येथील गावी एका कार्यक्रमासाठी निघाले असताना बसचा अपघात 

Mumbai Drugs Case : एनसीबीची धडक कारवाई, हायड्रोपोनिक विड, कोकेन आणि 2 लाखांची रोकड जप्त

Mumbai Drugs Case : मुंबईत (Mumbai NCB) पुन्हा एनसीबीनं धाड टाकर एक ड्रग्ज रॅकेट उध्वस्त केलं आहे. मुंबईतील अंमली पदार्थ पुरवठादार आणि पेडलर्स विरुद्ध नार्कोटिक कंट्रोल ब्युरो (Narcotics Control Bureau) मुंबई सतत लढत आहे. NCB मुंबईने 06 मे आणि 07 मे रोजी दोन ऑपरेशनमध्ये मुंबईतील विविध ठिकाणी छप्पा टाकून 445 ग्रॅम हायड्रोपोनिक वीड (गांजा), अल्प प्रमाणात कोकेन आणि  2 लाख 96 हजारांची रोकड जप्त केली आहे.

सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

NEET PG 2022 : NEET PG परीक्षा पुढे ढकललेली नाही; बनावट नोटीस व्हायरल झाल्यानंतर NBE चं स्पष्टीकरण

NEET PG 2022 : सध्या सोशल मीडियावर NEET परीक्षा (NEET Exam) पुढे ढकलल्याबद्दल अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. नीट परीक्षेसंदर्भात व्हायरल होणाऱ्या एका पत्रामुळे नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. अशातच NBE नं सोशल मीडियावर व्हायरल होणारं पत्र खोटं असून परीक्षा ठरलेल्या तारखेलाच होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, NEET परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून सातत्यानं केली जात आहे. अशातच नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसनं (NBEMS Feke Notice) नोटीस जारी करत सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बनावट नोटीसबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 

सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यपालांनी राष्ट्रपतींना विमानतळावर रिसीव्ह केले, मात्र तिथून राज्यपाल राजभवनला परत

राज्यपालांनी राष्ट्रपतींना विमानतळावर रिसीव्ह केले, मात्र तिथून राज्यपाल राजभवनला परत गेले. राज्यपालांची तब्येत बरी नाही, म्हणून ते राष्ट्रपती यांना विमानतळावर रिसिव्ह करून राजभवनात परतल्याचे कारण प्रशासनिक सूत्रांनी सांगितले आहे 

पुणे : अंकुश काकडे लिखित 'हॅशटॅग पुणे' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : अंकुश काकडे लिखित 'हॅशटॅग पुणे' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार पुस्तकाचे प्रकाशन

नाना पाटेकर, खासदार श्रीनिवास  पाटील,  गिरीश बापट, वंदना चव्हाण, उल्हास पवार यांच्या उपस्थितीत होणार प्रकाशन

बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आलाय कार्यक्रम...

IIM Campus Nagpur :  IIM मध्ये उद्घाटन कार्यक्रमात राष्ट्रपतीसोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित

IIM Campus Nagpur :  IIM मध्ये उद्घाटन कार्यक्रमात राष्ट्रपतीसोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, महाराष्ट्र राज्याचे मंत्री नितीन राऊत, मंत्री सुभाष देसाई यांच्यासह विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे उपस्थित आहेत.. 

IIM Campus Nagpur : 132 एकरवर साकारले आयआयएम नागपूरचे नवे कॅम्पस, आज राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण, राष्ट्रपती कोविंद पोहोचले

IIM Campus Nagpur : 132 एकरवर साकारले आयआयएम नागपूरचे नवे कॅम्पस, आज राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण, राष्ट्रपती कोविंद पोहोचले

'खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला, यायलाच पाहिजे'; उद्धव ठाकरेंच्या सभेचं पहिलं पोस्टर

'खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला,  यायलाच पाहिजे'; उद्धव ठाकरेंच्या सभेचं पहिलं पोस्टर

Hingoli News : मुलबाळ होत नसल्याने मांत्रिकाकडून  अघोरी कृत्य , महिलेच्या तक्रारीवरून पतीसह सासू, दीर आणि ननंदेवर गुन्हा दाखल

Hingoli News : मुलबाळ होत नसल्याने मांत्रिकाकडून  अघोरी कृत्य , महिलेच्या तक्रारीवरून पतीसह सासू, दीर आणि ननंदेवर गुन्हा दाखल

आज आयपीएलमध्ये दोन सामने होणार

आज आयपीएलमध्ये (IPL 2022) दोन सामने पार पडणार आहेत. यातील पहिला सामना हा सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (Sunrisers Hyderabad vs Royal challengers bangalore) या दोन संघात होणार आहे. हा सामना दुपारी 3 वाजता होणार आहे. गुणतालिकेचा विचार करता हैदराबादने 10 पैकी 5 सामने जिंकत 10 गुण खिशात घातले आहेत. ते सध्या सहाव्या स्थानावर आहे. तर बंगळुरु संघाने 11 पैकी 6 सामने जिंकत 12 गुणांसह चौथं स्थान मिळवलं आहे. दोन्ही संघाना पुढील फेरीत पोहचण्यासाठी आजचा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यात दोघांचा फॉर्म यंदा समसमान असल्यान आजचा सामना नक्कीच चुरशीचा होईल.

सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (Chennai Super Kings vs Delhi Capitals) एकमेकांशी भिडणार आहेत. यंदाच्या हंगाम चेन्नईच्या संघासाठी खराब ठरला आहे. चेन्नईच्या संघाला केवळ तीन सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर, दिल्लीनं यंदाच्या हंगामात दहा सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामन्यात विजय तर, पाच सामन्यात पराभव स्वीकारला आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत दिल्लीचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी दिल्लीचा संघ चेन्नईविरुद्ध मैदानात उतरणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. 

बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळाची चिन्हं

बंगालच्या उपसागरातील वादळाचे आज चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बंगालच्या उपसागरातील वादळ हे आज संध्याकाळी 75 किमी प्रति तास वेगाने येत वाहत असून त्याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. हे वादळ आंध्र आणि ओडिशाच्या किनारपट्टीच्या दिशेने वाहत असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. या वादळाचे चक्रीवादळात रुपांतर झाल्यास त्याला ‘असानी’ असं नाव देण्यात येईल. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान नागपुरात

मराठी दैनिक लोकमतच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल तसेच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे आज नागपुरात येत आहेत. महानगरपालिकेच्या भट सभागृहामध्ये दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होणार आहे. 

राष्ट्रपती आज नागपुरात, IIM च्या कँपसचे लोकार्पण करणार 

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या कँपसच्या लोकार्पण समारंभासाठी नागपुरात येत आहेत. मिहान परिसरात आयएआयमच्या सभागृहात सकाळी 10 वाजता हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.  या सोहळ्यात राज्याचे राज्यपाल, नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे.   

भारतीय पुरातत्व विभागाच्या पथकाकडून पंढरपुरच्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची पाहणी

भारतीय पुरातत्व विभागाचे पथक विठ्ठल मंदिरात दाखल झालं असून ते विट्ठल रुक्मिणी मूर्ती झीज प्रकरणी पाहणी करणार आहे. ‘माझा’च्या बातमीनंतर शासन सक्रिय झालं. पुरातत्व विभागाच्या पथकाकडून पंढरपुरातील विठ्ठल मंदिराची आज पहाटे 3 वाजता पाहणी करण्यात येणार आहे. चार जणांचे भारतीय पुरातत्व पथक पंढरपूरमध्ये शनिवारी दाखल झालं आहे.  

विठ्ठल रुक्मिणी यांच्या चरणांची झीज झाल्याने दोन वर्षापूर्वी वज्रलेप केला होता. पण खूप कमी कालावधीत हा लेप निघाल्याचे दिसून आले. पहाटे पुरातत्व विभागाचे चार जणांचे पथक वज्र लेप निघालेल्या ठिकाणची पाहणी करणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.

शरद पवार आणि अजित पवार दोन दिवसाच्या सातारा दौऱ्यावर

दिनांक 9 मे रोजी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साताऱ्यामध्ये जाणार आहेत. शरद पवार उद्या दुपारी साताऱ्यात पोहोचणार आहेत. सोमवारी सकाळी 7 वाजता ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमामध्ये ते भाग घेतील. 

अयोध्या दौऱ्याबाबत कार्यकर्त्यांनी बोलू नये, राज ठाकरेंची सूचना

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांसाठी राज ठाकरेंनी सूचना केली आहे. अयोध्या दौऱ्याबाबत कुणीही प्रसार माध्यमांशी बोलू नये, पक्षाने नेमलेल्या प्रवक्त्यांनीच माध्यमांशी बोलावं, प्रवक्त्यांनीही जबाबदारीनं बोलावं आणि भाषेचं भान राखावं अशा सूचना राज ठाकरेनी कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. 

खासदार नवनीत राणा आज 11 वाजता माध्यमांशी संवाद साधणार

स्पॉन्डॅलिसिसच्या त्रासामुळे उपचार घेत असलेल्या खासदान नवनीत राणा यांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. त्यानंतर त्या सकाळी 11 वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत. डिस्चार्ज मिळाल्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

खासदार नवनीत राणा आज 11 वाजता माध्यमांशी संवाद साधणार
स्पॉन्डॅलिसिसच्या त्रासामुळे उपचार घेत असलेल्या खासदान नवनीत राणा यांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. त्यानंतर त्या सकाळी 11 वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत. डिस्चार्ज मिळाल्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा वाद वाढल्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोघांनाही 12 दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागला. त्या ठिकाणाहून सुटका झाल्यानंतर खासदार नवनीत राणा यांना स्पॉन्डॅलिसिसचा त्रास सुरू झाला आणि त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शनिवारी त्यांच्या भेटीसाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार गेले होते. आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर नवनीत राणा काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

अयोध्या दौऱ्याबाबत कार्यकर्त्यांनी बोलू नये, राज ठाकरेंची सूचना
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांसाठी राज ठाकरेंनी सूचना केली आहे. अयोध्या दौऱ्याबाबत कुणीही प्रसार माध्यमांशी बोलू नये, पक्षाने नेमलेल्या प्रवक्त्यांनीच माध्यमांशी बोलावं, प्रवक्त्यांनीही जबाबदारीनं बोलावं आणि भाषेचं भान राखावं अशा सूचना राज ठाकरेनी कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. 

शरद पवार आणि अजित पवार दोन दिवसाच्या सातारा दौऱ्यावर
दिनांक 9 मे रोजी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साताऱ्यामध्ये जाणार आहेत. शरद पवार उद्या दुपारी साताऱ्यात पोहोचणार आहेत. सोमवारी सकाळी 7 वाजता ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमामध्ये ते भाग घेतील. 

भारतीय पुरातत्व विभागाच्या पथकाकडून पंढरपुरच्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची पाहणी
भारतीय पुरातत्व विभागाचे पथक विठ्ठल मंदिरात दाखल झालं असून ते विट्ठल रुक्मिणी मूर्ती झीज प्रकरणी पाहणी करणार आहे. ‘माझा’च्या बातमीनंतर शासन सक्रिय झालं. पुरातत्व विभागाच्या पथकाकडून पंढरपुरातील विठ्ठल मंदिराची आज पहाटे 3 वाजता पाहणी करण्यात येणार आहे. चार जणांचे भारतीय पुरातत्व पथक पंढरपूरमध्ये शनिवारी दाखल झालं आहे.  

विठ्ठल रुक्मिणी यांच्या चरणांची झीज झाल्याने दोन वर्षापूर्वी वज्रलेप केला होता. पण खूप कमी कालावधीत हा लेप निघाल्याचे दिसून आले. पहाटे पुरातत्व विभागाचे चार जणांचे पथक वज्र लेप निघालेल्या ठिकाणची पाहणी करणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.

राष्ट्रपती आज नागपुरात, IIM च्या कँपसचे लोकार्पण करणार 
देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या कँपसच्या लोकार्पण समारंभासाठी नागपुरात येत आहेत. मिहान परिसरात आयएआयमच्या सभागृहात सकाळी 10 वाजता हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.  या सोहळ्यात राज्याचे राज्यपाल, नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे.   
 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान नागपुरात
मराठी दैनिक लोकमतच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल तसेच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे आज नागपुरात येत आहेत. महानगरपालिकेच्या भट सभागृहामध्ये दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होणार आहे. 

बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळाची चिन्हं
बंगालच्या उपसागरातील वादळाचे आज चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बंगालच्या उपसागरातील वादळ हे आज संध्याकाळी 75 किमी प्रति तास वेगाने येत वाहत असून त्याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. हे वादळ आंध्र आणि ओडिशाच्या किनारपट्टीच्या दिशेने वाहत असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. या वादळाचे चक्रीवादळात रुपांतर झाल्यास त्याला ‘असानी’ असं नाव देण्यात येईल. 

आज आयपीएलमध्ये दोन सामने होणार
आज आयपीएलमध्ये (IPL 2022) दोन सामने पार पडणार आहेत. यातील पहिला सामना हा सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (Sunrisers Hyderabad vs Royal challengers bangalore) या दोन संघात होणार आहे. हा सामना दुपारी 3 वाजता होणार आहे. गुणतालिकेचा विचार करता हैदराबादने 10 पैकी 5 सामने जिंकत 10 गुण खिशात घातले आहेत. ते सध्या सहाव्या स्थानावर आहे. तर बंगळुरु संघाने 11 पैकी 6 सामने जिंकत 12 गुणांसह चौथं स्थान मिळवलं आहे. दोन्ही संघाना पुढील फेरीत पोहचण्यासाठी आजचा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यात दोघांचा फॉर्म यंदा समसमान असल्यान आजचा सामना नक्कीच चुरशीचा होईल.

सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (Chennai Super Kings vs Delhi Capitals) एकमेकांशी भिडणार आहेत. यंदाच्या हंगाम चेन्नईच्या संघासाठी खराब ठरला आहे. चेन्नईच्या संघाला केवळ तीन सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर, दिल्लीनं यंदाच्या हंगामात दहा सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामन्यात विजय तर, पाच सामन्यात पराभव स्वीकारला आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत दिल्लीचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी दिल्लीचा संघ चेन्नईविरुद्ध मैदानात उतरणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.