ICC Men ODI Team of the Year 2024 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) वर्ष 2024 साठी पुरुष एकदिवसीय संघ निवडला आहे. आयसीसीच्या या 11 सदस्यीय संघात एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या प्रत्येकी तीन खेळाडूंना स्थान मिळाले आहे. या संघात श्रीलंकेच्या सर्वाधिक चार खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत वेस्ट इंडिजच्या एका खेळाडूचाही समावेश आहे.


भारतीय खेळाडूंना स्थान का मिळाले नाही?


11 सदस्यीय संघात ज्या पाकिस्तानी खेळाडूंना स्थान मिळाले आहे त्यात सॅम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी आणि हरिस रौफ यांचा समावेश आहे. श्रीलंकेचा खेळाडू चारिथ असलंकाला संघाचा कॅप्टन करण्यात आला आहे. भारताशिवाय विश्वविजेता ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका या देशांचे खेळाडू या आयसीसी संघात स्थान मिळवू शकले नाहीत. गेल्या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमधील खेळाडू आणि संघांची कामगिरी हाच निवडीचा निकष असल्याचे मानले जाते. भारतीय संघाने गेल्यावर्षी फक्त तीन एकदिवसीय सामने खेळले होते जे श्रीलंकेविरुद्ध होते. या तीनपैकी दोनमध्ये भारताचा पराभव झाला होता. तर एक सामना बरोबरीत सुटला होता. म्हणजेच भारतीय खेळाडूंना या संघात स्थान मिळणे कठीण होते.






पाकिस्तानी संघाने 2024 मध्ये एकूण 9 एकदिवसीय सामने खेळले


अफगाणिस्तानने गेल्यावर्षी एकदिवसीय सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली होती आणि 14 पैकी 8 सामने जिंकले होते. पाकिस्तानी संघाने 2024 मध्ये एकूण 9 एकदिवसीय सामने खेळले आणि सात जिंकले. या काळात पाकिस्तानी संघाने ऑस्ट्रेलियन आणि दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर एकदिवसीय मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला. सलामीवीर सॅम अयुब व्यतिरिक्त, वेगवान गोलंदाज हरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी यांनी या काळात पाकिस्तानसाठी चमकदार कामगिरी केली होती. 2024 मध्ये श्रीलंका संघाची कामगिरीही उत्कृष्ट होती आणि 18 पैकी 12 एकदिवसीय सामने जिंकले.


ICC पुरुषांचा एकदिवसीय संघ 2024


1.सॅम अयुब, पाकिस्तान
2. रहमानउल्ला गुरबाज, अफगाणिस्तान
3. पथुम निसांका, श्रीलंका
4. कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), श्रीलंका
5. चारिथ असलंका (कर्णधार), श्रीलंका
6. शेरफेन रदरफोर्ड, वेस्ट इंडिज
7. अजमतुल्ला ओमरझाई, अफगाणिस्तान
8. वानिंदू हसरंगा, श्रीलंका
9. शाहीन शाह आफ्रिदी, पाकिस्तान
10. हरिस रौफ, पाकिस्तान
11. अल्लाह गझनफर, अफगाणिस्तान


इतर महत्वाच्या बातम्या