Maharashtra Breaking News LIVE Updates : देश-विदेशातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
खासदार नवनीत राणा आज 11 वाजता माध्यमांशी संवाद साधणार
स्पॉन्डॅलिसिसच्या त्रासामुळे उपचार घेत असलेल्या खासदान नवनीत राणा यांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. त्यानंतर त्या सकाळी 11 वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत. डिस्चार्ज मिळाल्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा वाद वाढल्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोघांनाही 12 दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागला. त्या ठिकाणाहून सुटका झाल्यानंतर खासदार नवनीत राणा यांना स्पॉन्डॅलिसिसचा त्रास सुरू झाला आणि त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शनिवारी त्यांच्या भेटीसाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार गेले होते. आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर नवनीत राणा काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अयोध्या दौऱ्याबाबत कार्यकर्त्यांनी बोलू नये, राज ठाकरेंची सूचना
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांसाठी राज ठाकरेंनी सूचना केली आहे. अयोध्या दौऱ्याबाबत कुणीही प्रसार माध्यमांशी बोलू नये, पक्षाने नेमलेल्या प्रवक्त्यांनीच माध्यमांशी बोलावं, प्रवक्त्यांनीही जबाबदारीनं बोलावं आणि भाषेचं भान राखावं अशा सूचना राज ठाकरेनी कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत.
शरद पवार आणि अजित पवार दोन दिवसाच्या सातारा दौऱ्यावर
दिनांक 9 मे रोजी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साताऱ्यामध्ये जाणार आहेत. शरद पवार उद्या दुपारी साताऱ्यात पोहोचणार आहेत. सोमवारी सकाळी 7 वाजता ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमामध्ये ते भाग घेतील.
भारतीय पुरातत्व विभागाच्या पथकाकडून पंढरपुरच्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची पाहणी
भारतीय पुरातत्व विभागाचे पथक विठ्ठल मंदिरात दाखल झालं असून ते विट्ठल रुक्मिणी मूर्ती झीज प्रकरणी पाहणी करणार आहे. ‘माझा’च्या बातमीनंतर शासन सक्रिय झालं. पुरातत्व विभागाच्या पथकाकडून पंढरपुरातील विठ्ठल मंदिराची आज पहाटे 3 वाजता पाहणी करण्यात येणार आहे. चार जणांचे भारतीय पुरातत्व पथक पंढरपूरमध्ये शनिवारी दाखल झालं आहे.
विठ्ठल रुक्मिणी यांच्या चरणांची झीज झाल्याने दोन वर्षापूर्वी वज्रलेप केला होता. पण खूप कमी कालावधीत हा लेप निघाल्याचे दिसून आले. पहाटे पुरातत्व विभागाचे चार जणांचे पथक वज्र लेप निघालेल्या ठिकाणची पाहणी करणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.
राष्ट्रपती आज नागपुरात, IIM च्या कँपसचे लोकार्पण करणार
देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या कँपसच्या लोकार्पण समारंभासाठी नागपुरात येत आहेत. मिहान परिसरात आयएआयमच्या सभागृहात सकाळी 10 वाजता हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात राज्याचे राज्यपाल, नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान नागपुरात
मराठी दैनिक लोकमतच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल तसेच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे आज नागपुरात येत आहेत. महानगरपालिकेच्या भट सभागृहामध्ये दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळाची चिन्हं
बंगालच्या उपसागरातील वादळाचे आज चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बंगालच्या उपसागरातील वादळ हे आज संध्याकाळी 75 किमी प्रति तास वेगाने येत वाहत असून त्याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. हे वादळ आंध्र आणि ओडिशाच्या किनारपट्टीच्या दिशेने वाहत असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. या वादळाचे चक्रीवादळात रुपांतर झाल्यास त्याला ‘असानी’ असं नाव देण्यात येईल.
आज आयपीएलमध्ये दोन सामने होणार
आज आयपीएलमध्ये (IPL 2022) दोन सामने पार पडणार आहेत. यातील पहिला सामना हा सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (Sunrisers Hyderabad vs Royal challengers bangalore) या दोन संघात होणार आहे. हा सामना दुपारी 3 वाजता होणार आहे. गुणतालिकेचा विचार करता हैदराबादने 10 पैकी 5 सामने जिंकत 10 गुण खिशात घातले आहेत. ते सध्या सहाव्या स्थानावर आहे. तर बंगळुरु संघाने 11 पैकी 6 सामने जिंकत 12 गुणांसह चौथं स्थान मिळवलं आहे. दोन्ही संघाना पुढील फेरीत पोहचण्यासाठी आजचा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यात दोघांचा फॉर्म यंदा समसमान असल्यान आजचा सामना नक्कीच चुरशीचा होईल.
सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (Chennai Super Kings vs Delhi Capitals) एकमेकांशी भिडणार आहेत. यंदाच्या हंगाम चेन्नईच्या संघासाठी खराब ठरला आहे. चेन्नईच्या संघाला केवळ तीन सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर, दिल्लीनं यंदाच्या हंगामात दहा सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामन्यात विजय तर, पाच सामन्यात पराभव स्वीकारला आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत दिल्लीचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी दिल्लीचा संघ चेन्नईविरुद्ध मैदानात उतरणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे
Osmanabad: उस्मानाबादेत दोन दुकानांना भिषण आग, लाखो रुपयांचे नुकसान
उस्मानाबाद शहरातील प्रेरणा नगर परिसरात दोन दुकानं भिषण आग लागली आहे. यात एक फर्निचर आणि एक सर्व्हिसिंग सेंटर, असे दोन्ही दुकाने जळून खाक झाली आहेत. दोन अग्निशामक दलाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र दोन्ही गाड्यांना अपयश आले त्यानंतर आणखी दोन अग्निशमन दलाच्या गाड्या आणि दोन पाणी टँकर बोलावून आग आटोक्यात आणण्यात आली. यासाठी तब्बल अडीच तासापेक्षा अधिक वेळ आग तेवत होती, यात दोन्ही दुकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले
Swaraj Express : स्वराज एक्स्प्रेसमध्ये तरुणीचा मृतदेह; धावत्या रेल्वेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा संशय
स्वराज एक्स्प्रेसच्या टॉयलेटमध्ये तरुणीचा मृतदेह सापडला आहे. धावत्या रेल्वेमध्ये या तरुणीनं गळफास घेतल्याचा शंयश व्यक्त करण्यात येत आहे. आरती कुमारी मिथिलेश पाल ( वय 20) असे मृत तरुणीचे नाव असून ती बिहार मधील रहिवाशी असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य प्रवक्ते सुमित ठाकूर यांनी दिली.
Navneet Kaur Rana : राणा दाम्पत्य उद्या दिल्लीला जाणार, राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांविरोधात लोकसभा अध्यांकडे करणार तक्रार?
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा उद्या सकाळी दिल्लीसाठी जाणार आहेत. नवनीत राणा यांना आजच लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दिल्ली येथे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि काही केंद्रीय मंत्र्यांना भेटून राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांविरोधात राणा यांच्याकडून तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
Parbhani News Update : परभणीत उष्माघाताचा पहिला बळी, सोनपेठ तालुक्यातील वृद्धाचा मृत्यू
राज्यात उन्हाचा कडाका प्रचंड वाढलाय. त्यातच परभणी जिल्ह्याचे तापमान जवळपास महिना भरापासून 40 अंशाच्या वरती आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उष्णता वाढली असून आज उष्माघाताने सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा येथील 82 वर्षीय दत्ता पोमा जाधव या वृद्धाचा मृत्यू झालाय. जाधव हे शेतात गेले होते, यावेळी त्यांना ऊन लागल्याने अंबाजोगाई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
Ahmednagar News Update : शेततळ्यात बुडून बहिण भावाचा मृत्यू
शेततळ्यात बुडून बहिण भावाचा मृत्यू झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मोधळवाडीच्या घाणेवस्ती येथे घी घटना घडली. जयश्री बबन शिंदे (वय 21 ) आणि आयुष बबन शिंदे (वय 7 ) अशी मृत बहिण भावाची नावे आहेत. शेततळ्यातून पाणी काढताना पाय घसरल्याने आयुष शेततळ्यात पडला. भावाला वाचवण्यासाठी बहिण जयश्रीने शेततळ्यात ऊडी घेतली. परंतु, दुर्देवाने यात दोघांचाही मृत्यू झाला.