Maharashtra Breaking News 05 June 2022 : मंत्रिमंडळाची उद्या बैठक, कोरोनाच्या वाढत्या संख्येच्या अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..
नवी मुंबईत झाडांची कत्तल रोखण्यासाठी जितेंद्र आव्हाडांचं चिपको आंदोलन
वाशी अरेंजा सर्कल ते कोपरी असा 2 किलोमीटरचा उड्डाणपूल होणार आहे. उड्डाणपुलासाठी 400 झाडे काढण्यात येणार आहेत. याला विरोध करण्यासाठी जितेंद्र आव्हाड 'चिपको' आंदोलन करणार आहेत. सकाळी 10.30 वाजता याच ठिकाणी भाजपा आमदार गणेश नाईक या झाडांच्या संरक्षणाबरोबरच नवी मुंबईतील विविध प्रश्नांबाबत जनजागृती लाँगमार्च काढणार आहेत.
राज्यसभेसाठी राजकीय पक्षांचं हॉटेल मॅनेजमेंट
राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्यामुळे ही निवडणूक मोठी रंगतदार होणार आहे. शिवसेना आमदार आणि समर्थक लहान पक्ष तसेच अपक्ष आमदारांची फोडाफोडी टाळण्यासाठी शिवसेनेनं येत्या 6 जून रोजी संध्याकाळी शिवसेनेच्या सर्व आमदारांची आणि समर्थक लहान पक्ष तसेच आमदारांची वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलवली आहे. त्याच बरोबर येत्या 8 ते 10 जून पर्यंत सर्व आमदारांच्या सुरक्षेसाठी ट्रायडंट हाँटेलमध्ये राहण्याची व्यवस्था शिवसेनेकडून करण्यात आली होती. मात्र भाजपनेही ट्रायडंट हाँटेलमध्येच त्यांच्या आमदारांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे, कोणताही धोका किंवा गोंधळ टाळण्यासाठी आता शिवसेनेनंही हॉटेल बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसच्या सलग तीन चिंतन शिबीरांमधून काय साध्य होणार?
उदयपूर, शिर्डी आणि त्यानंतर आता पनवेल अशा तीन ठिकाणी काँग्रेसचे चिंतन शिबीर होतंय. महाविकास आघाडीत अस्वस्थ असलेली कॉंग्रेस मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरही अस्वस्थच आहे. वॉर्ड आरक्षणामुळे 21 नगरसेवकांचे वॉर्ड खालसा झालेत. अल्पसंख्यांक नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षण प्रक्रियेत ठरवून अडचणीत आणले गेले असा कॉंग्रेसचा आरोप आहे.
पंतप्रधान मोदी ‘मिट्टी बचाओ’ अभियानावर आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान मोदी ‘मिट्टी बचाओ’ अभियानावर आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सायकल रॅली
पर्यावरण दिनानिमित्त केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.
प्रवाशांच्या सामानाला ग्रीन टॅग लावणार
तिरुअनंतपुरम येथे पर्यावरण दिनानिमित्त विमानतळावर प्रवाशांच्या सामानाला ग्रीन टॅग लावण्यात येणार आहे. या टॅगमध्ये भाजांच्या बिया, जडी- बुटी आणि फुलं दिली जाणार आहेत.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधे आयोजित दोन दिवसीय साखर परिषदेचा दुसरा दिवस
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधे आयोजित दोन दिवसीय साखर परिषदेचा दुसरा दिवस. यात जयंत पाटील 9:30 वाजता, वळसे पाटील दोन वाजता सहभागी होणार आहे. तर दुपारी 3 ते 5 या कालावधीत राज्य स्तरीय पुरस्कारांचे शरद पवार यांच्या हस्ते वितरण होणार आहे- मिकी
योगी आदित्यनाथ यांच्या वाढदिवसानिमित्त ब्रृजभूषण सिंग यांनी 51 क्विंटलचा लाडू तयार केला आहे.
ओडिसाच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा काल राजीनामा घेण्यात आला होता. त्यानंतर आज नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे
5 जून : जागतिक पर्यावरण दिन
....तर राज्यसभेसाठी अखेरच्या पाच मिनिटात मतदान करू ! - राज्यमंत्री बच्चू कडू..
....तर राज्यसभेसाठी अखेरच्या पाच मिनिटात मतदान करू ! - राज्यमंत्री बच्चू कडू..
धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाची व्यवस्था केंद्र व राज्य सरकारने करावी अन्यथा त्याचे परिणाम राज्यसभेच्या मतदानावर दिसतील..
सध्या धान आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या वाढत चालल्या आहेत. केंद्र सरकारने जे खरेदीचे लक्षांक दिले ते कमी आहेत..
संपूर्ण महाराष्ट्रात एक लाख हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे.पण आता केंद्र सरकारने खरेदीसाठी हात वर केले..
धान उत्पादक शेतकरी देखील 4 ते 5 लाख असून केंद्र सरकार धान खरेदी बंद करत आहे.
केंद्राने खरेदी सुरू करावी याकरिता मुख्यमंत्री आणि शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली पाहिजे..
खरेदी होत नसेल तर किमान चार हजार रुपये प्रति एकर मदत हरभरा आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना दिली पाहिजे..
असे न झाल्यास आम्ही राज्यसभेसाठी शेवटच्या पाच मिनिटांत मतदान करू. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा..
आमचं मतदान भाजपला जाणार नाही मात्र आघाडीला देखील शेवटच्या पाच मिनिटांत मतदान करु..
उद्धव ठाकरेंचा सगळ्यात मोठा कलेक्शन एजंट हा अनिल परब - किरीट सोमय्या
उद्धव ठाकरेंचा सगळ्यात मोठा कलेक्शन एजंट हा अनिल परब - किरीट सोमय्या
Sstara News Update : साताऱ्यातील कोरेगावमधील जवानाला विरमरण
सियाचीन येथे ऑपरेशन मेघदुतमध्ये शत्रुशी लढताना जखमी झालेले विपुल दिलीप इंगवले यांचे उपचारादरम्यान निधन झाले. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. परंतु, घरी त्रास झाल्यामुळे त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. विपुल यांचे गाव सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामधील भोसे हे आहे. त्यांचे पार्थिव उद्या सकाळी दहा वाजता गावात पोहोचणार आहे.
Beed News Update : अवैध गर्भपात करताना अति रक्तस्रावाने मातेचा मृत्यू, बीडमधील धक्कादायक घटना
तीन मुलींनंतर चौथ्यांदा गर्भवती असलेल्या महिलेचा गर्भपात करताना अतिरक्तस्रावाने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आली. या घटनेमुळे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे रॅकेट सक्रिय आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बीड तालुक्यातील बकरवाडी गावातील शितल गाडे असं मयत गर्भवती महिलेचे नाव आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या सदस्य एडवोकेट संगीता चव्हाण यांनी केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक आणि पोलीस अधीक्षक यांना सूचना दिल्या आहेत.
मंत्रिमंडळाची उद्या बैठक, कोरोनाच्या वाढत्या संख्येच्या अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता
सोमवारी चार वाजता मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत कोरोनाच्या वाढत्या संख्येच्या अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता आहे. बैठकीत राज्यसभेच्या अनुषंगाने देखील चर्चा होणार
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संध्याकाळी 6 वाजता वर्षा निवास्थानी अपक्ष आमदारांसोबत बैठक घेणार असल्याची सुत्राची माहिती.