(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Breaking News LIVE Updates : देश-विदेशातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
राज ठाकरेंवर अटकेची टांगती तलवार
लाऊडस्पीकरवरून अल्टिमेटम देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. एकीकडे सांगली न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. तर दुसरीकडे औरंगाबादमध्येही त्यांच्यासह सभेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल केला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी 4 मे पासून मशिदींवर लावलेले भोंगे खाली उतरवण्यासाठी राज्य सरकारला अल्टिमेटम दिले आहे. यानंतर मंगळवारी औरंगाबाद पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. सिटी चौक पोलिसांनी राज ठाकरे यांच्यावर आयपीसी कलम 153 (दंगल घडवण्यासाठी प्रवृत्त करणे), 116 (तुरुंगवासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणे) आणि 117 (सार्वजनिक किंवा 10 पेक्षा जास्त व्यक्तींना गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणे) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अशी माहिती सिटी चौक पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली. याबाबत माहिती देताना महाराष्ट्राचे डीजीपी रजनीश सेठ यांनी सांगितले की, औरंगाबादचे पोलीस आयुक्त राज ठाकरे यांनी मशिदींतील लाऊडस्पीकरबाबत केलेल्या भाषणाबद्दल योग्य कायदेशीर कारवाई करतील.
राज ठाकरे अटकपूर्व जामीन याचिका दाखल करणार?
औरंगाबादमध्ये नोंदवलेल्या एफआयआर प्रकरणी राज ठाकरे हे आपल्या वकिलांची टीमशी चर्चा करतील आणि त्यानंतर अटकपूर्व जामीन याचिका दाखल करायची की नाही याचा निर्णय घेऊ शकतात.
राज ठाकरे यांच्याविरोधात 14 वर्षे जुन्या प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी
महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील एका न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध 14 वर्षे जुन्या एका प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. 2008 मध्ये, प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यावर आयपीसीच्या कलम 109 आणि 117 (गुन्हाला प्रोत्साहन) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 6 एप्रिल रोजी अजामीनपात्र वॉरंट जारी करून सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना मनसे प्रमुखाला अटक करून न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले होते. सहाय्यक सरकारी वकील ज्योती पाटील यांनी सांगितले की, न्यायमूर्तींनी राज ठाकरे आणि दुसरे मनसे नेते शिरीष पारकर यांच्याविरुद्ध अनुक्रमे मुंबई पोलिस आयुक्त आणि खेरवाडी पोलिस ठाण्यात वॉरंट जारी केले होते. कारण ते खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर राहिले नाही. पाटील यांच्या म्हणण्यानुसार, न्यायालयाने पोलिसांना 8 जूनपूर्वी वॉरंट बजावण्याचे आणि दोन्ही नेत्यांना त्यांच्यासमोर हजर करण्याचे निर्देश दिले आहेत.
पालिकेची टीम आज राणा दाम्पत्याच्या खार येथील घराची पाहणी करणार
हनुमान चालिसा वादात अटक करण्यात आलेल्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांना बीएमसीने नोटीस बजावली आहे. बीएमसीने दिलेल्या नोटीसनुसार, मुंबई बीएमसी खारच्या इमारतीत असलेल्या रवी राणा यांच्या घराची पाहणी करणार आहे. प्रत्यक्षात घराच्या आराखड्यात छेडछाड करून बेकायदा बांधकाम केल्याचा बीएमसीला संशय आहे. अशा स्थितीत अति बांधकाम आणि काही नियमांचे उल्लंघन केल्याच्या तक्रारीवरून बीएमसीने ही तपासणी नोटीस दिली आहे.
आरसीबी-चेन्नईकडे हरवण्याचा पर्यायच नाही
आयपीएल 2022 मध्ये बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी भिडणार आहे. चेन्नई सुपर किंग्जला आपल्या कमकुवत गोलंदाजीत सुधारणा करावी लागणार आहे. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजय मिळवायचा असेल तर त्याला आपल्या खराब फलंदाजीत सुधारणा करावी लागेल. दोन्ही संघ खराब फॉर्मशी झुंजत आहेत. चेन्नईच्या प्लेऑफच्या आशा काहीशा अबाधित आहेत. त्यांना कायम ठेवण्यासाठी संघाला हा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावाच लागेल. त्याचबरोबर फाफ डू प्लेसिसच्या (Faf du Plessis) नेतृत्वाखालील आरसीबीसाठीही हा सामना खूप महत्त्वाचा आहे.
Nagpur : इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग, लाखोंचे साहित्य जळून खाक
Nagpur : नागपूरच्या कॉटन मार्केट परिसरातील महात्मा फुले मार्केटच्या पहिल्या मजल्यावरील इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग लागली आहे. अचानक लागलेल्या आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. या आगीत इलेक्ट्रॉनिक वस्तू साऊंड सिस्टमसारख्या अनेक गोष्टी जळून खाक झाल्या आहेत.
Bacchu Kadu: येती निवडणूक आपण भोंग्याशिवाय लढणार : राज्यमंत्री बच्चू कडू
सुप्रीम कोर्टाने ओबीसी संदर्भात दिलेल्या निर्णयावर राज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर हा निर्णय अन्यायकारक असल्याचं ही ते म्हणाले आहेत. यामुळे राजकीय अस्तित्व संपणार असल्याची ही भीती त्यांनी व्यक्त केली आहे. कोर्टाने यावर पुनर्विचार करून केंद्र आणि राज्यसरकारने यात लक्ष देण्याची विनंतीही त्यांनी केलीय. ते अकोल्यात आढावाबैठीकीनंतर माध्यमांशी बोलत होते. तर येणारी निवड आपण भोंग्या शिवाय लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
Amravati Breaking: युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना कार्यलयात केली तोडफोड; पराग गुडधे यांचा आरोप
अमरावती शहरातील राजापेठ चौकात असलेल्या शिवसेना महानगर प्रमुख पराग गुडधे यांच्या कार्यालयातील खुर्च्यांची फेकाफेक झाल्याची बातमीस समोर येत आहे. त्यांच्या कार्यालयात आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची केली फेकाफेक केल्याचा आरोप पराग गुडधे यांनी केला आहे. खुर्च्या फेकाफेक करणारे युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते असल्याचा आरोप आहे.
मनसे अंधेरी पूर्व विधानसभाचे विभाग अध्यक्ष रोहन सावंत यांना अटक
मुंबईच्या मनसे अंधेरी पूर्व विधानसभाचे विभाग अध्यक्ष रोहन सावंत यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आज दुपारी मरोळ विजयनगर येथे मशिदीमध्ये अजाणचे भोंगे सुरू असताना रोहन सावंत यांनी मशिदीच्यासमोर भोंग्यातून हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न केला होता याच दरम्यान एमआयडीसी पोलिसांनी काही मनसे कार्यकर्त्यांच्या सोबत रोहन सावं ला अटक केली आहे,
Hingoli: हळदीसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
आज हिंगोली जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे, तर ग्रामीण भागात काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला आहे. सायंकाळी चार ते पाच वाजताच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्याने उकाड्यापासून त्रस्त असलेले सर्व जिल्हावासीयांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणचे विजेचे खांब पडले आहेत. त्याचबरोबर शेतातील पॉलिश करत असलेली हळद भिजली आहे आणि शेतात उभ्या असलेल्या केळीच्या पिकाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.