Maharashtra Breaking News LIVE Updates : सह्याद्री अतिथीगृह येथे चहापानाचा कार्यक्रम पार, मुख्यमंत्र्यांची दांडी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Mumbai School Reopen : आजपासून मुंबईतील सर्व शाळा पूर्णवेळ पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. तब्बल दोन वर्षांनी पूर्व प्राथमिक ते बारावीच्या मुंबई क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी मुंबई महानगरपालिकेनं सर्व शाळा पूर्ण क्षमतेनं सुरु करण्यास परवानगी दिली आहे. आजपासून म्हणजेच, 2 मार्चपासून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा कोविड-19 पूर्वीच्या वेळापत्रकानुसार पूर्णवेळ आणि पूर्णक्षमतेने ऑफलाईन पद्धतीनं सुरु होणार आहेत. यासंदर्भातील परिपत्रक काही दिवसांपूर्वी बीएमसीकडून जारी करण्यात आलं आहे.
परिपत्रकात पालिकेनं म्हटलं आहे की, सर्व बोर्डच्या, सर्व माध्यमांच्या नगरबाह्य विभागाच्या सर्व शाळा तसेच विशेष आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्व शाळा, मैदानी खेळ आणि शाळेचे विविध शैक्षणिक उपक्रम यासह पूर्णवेळ आणि पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतच्या सर्व शाळा पूर्ण वेळ आणि पूर्ण क्षमतेने ऑफलाईन पद्धतीनं सुरु करण्यात याव्यात.
मैदानी खेळ, शारीरिक कवायतींसाठी मास्क बंधनकारक नाही
Beed News : बीडच्या खजाना विहिरीजवळ भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
भाजपचे जेष्ठ नेते शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित
माजी राज्यमंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित झाला असून आज नाईक यांनी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली.
Budget 2022: सह्याद्री अतिथीगृह येथे चहापानाचा कार्यक्रम पार, मुख्यमंत्र्यांची दांडी
राज्य विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे चहापान पार पडला. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी दांडी मारली आहे तर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे.
आयुक्त शाईफेक प्रकरणी, आमदार रवी राणा यांच्या अटकपूर्व जामीनावर उद्या अंतिम सुनावणीची शक्यता
Amravati News : अमरावती मनपा आयुक्त शाईफेक प्रकरणी आमदार रवी राणा यांच्या अटकपूर्व जामीनावर उद्या अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे. आज न्यायालयात जमिनावर पूर्ण युक्तीवाद झाला. उद्या सरकारी वकील आणि पोलीस जवाब सादर करणार आहेत. आमदार रवी राणा यांचे वकील दीप मिश्रा यांनी ही माहिती दिली.
Maharashtra News : नवाब मलिकांना ईडीच्या कारवाईतून कोणताही तातडीचा दिलासा नाही
Maharashtra News : नवाब मलिकांना ईडीच्या कारवाईतून कोणताही तातडीचा दिलासा नाही. मलिकांच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी ईडीनं वेळ मागितला आहे. नवाब मलिकांच्या याचिकेवर हायकोर्टात सोमवारी सुनावणी होणार आहे.