एक्स्प्लोर

Maharashtra Coronavirus : गुरुवारी राज्यात 550 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तीन जणांचा मृत्यू

Coronavirus Cases Today : आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी राज्यात 550 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. 

Maharashtra Coronavirus Cases Today : मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्येमध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी राज्यात 550 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर तीन जणांचा (Coronavirus death toll) कोरोनामुळे मृत्यू झालाय. 

आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार,  गुरुवारी राज्यात 740 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 79,65,395 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.13 टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात 550 नवीन रुग्णांचे निदान (Coronavirus Cases Today) झाले आहे. राज्यात आज तीन करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. पाहूयात मागील आठ दिवसांतील कोरोना रुग्णांची आकडेवारी - 

22 सप्टेंबर (गुरुवार) - 
550 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
तीन जणांचा मृत्यू

21 सप्टेंबर (बुधवार) - 
640 नव्या कोरोना रुग्णांची नोंद 
पाच जणांचा मृत्यू 

20 सप्टेंबर (मंगळवार) - 
550 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
दोन जणांचा मृत्यू 

19 सप्टेंबर (सोमवार) - 
292 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
दोन जणांचा मृत्यू 

18 सप्टेंबर (रविवार) - 
602 नव्या कोरोना रुग्णांची नोंद 
तीन जणांचा मृत्यू 

17 सप्टेंबर (शनिवार) - 
631 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
तीन जणांचा मृत्यू 

16 सप्टेंबर (शुक्रवार) -
697 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

15 सप्टेंबर (गुरुवार) -
755 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

पुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण - 
आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या तीन हजार 857 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्णाचे प्रमाण मुंबई, ठाणे आणि पुण्यात आहे. मुंबईमध्ये सध्या 805 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात एक हजार 1194 सक्रिय रुग्ण आहेत. ठाण्यामध्ये 511 सक्रीय रुग्ण आहेत. त्याशइवाय रायगड 214, नाशिक 124 आणि नागपूरमध्ये 147 सक्रिय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी 100 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत. परभणीमध्ये सर्वात कमी दोन सक्रिय रुग्ण आहेत. 

आज कुठे किती रुग्ण आढळले?
राज्यात आज 550 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत आज 98 नवे रुग्ण आढळले आहेत. तर पुणे मनपामध्ये 97 रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, मुंबई सर्कलमध्ये आज 218 नवे रुग्ण आढळले आहेत. नाशिक सर्कलमध्ये 42, पुणे सर्कलमध्ये 177, कोल्हापूर सर्कल 28, औरंगाबाद सर्कल सात, लातूर सर्कल 23, अकोला सर्कल 22 आणि नागपूर सर्कलमध्ये 33 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP MajhaPandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हानTop 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 Sep 2024ABP Majha Headlines : 08 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
Embed widget