बुलढाणा: ग्रामपंचायत पोटनिवडणुकीला हिंसाचाराचे गालबोट, दोन गटाच्या हाणामारीत 4 गंभीर जखमी
Maharashtra Local Body Election : बुलढाण्यातील जलंब ग्रामपंचायत पोटनिवडणुकीला हिंसाचाराचे गालबोट लागले आहे.
Maharashtra Local Body Election : राज्यात आज नगरपंचायतीच्या निवडणुकींसह ग्रामपंचायतीच्याही पोटनिवडणुका होत आहे. राज्यात शांततेत मतदान सुरू असताना बुलढाण्यातील मतदानाला मात्र, हिंसाचाराचे गालबोट लागले आहे. जलंब ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीत चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील जलंब ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत असताना दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर शेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जलंब येथे आज सकाळपासून ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी मतदान सुरू होते. त्यानंतर दोन गटात सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर अचानक एका गटाने दुसऱ्या गटावर हल्ला केल्याने तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये चार जण जखमी झाले असून एका महिलेचा समावेश आहे.
या घटनेनंतर तणाव निर्माण झाला असून गावात पोलीसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून मतदान सुरळीत सुरू असल्याची माहिती आहे.
बीड: वडवणीत मतदानावरून भाजप - राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
बीडमधील वडवणीत मतदानावरून भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने, मतदान केंद्रावर दोन्ही गट भिडले, पोलिसांचा सौम्य लाठीमार. मतदानाच्या सुरुवातीलाच राडा झाल्यानं वडवणीतं तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या वादानंतर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
दरम्यान, राज्यात आज 32 जिल्ह्यातील 105 नगरपंचायत निवडणुकांसाठी आज मतदान सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय ही निवडणूक पार पडत आहे. मागील काही दिवसांपासून निवडणूक प्रचाराचा धुरळा उडाला होता. सोमवारी प्रचार संपल्यानंतर आज मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Local Body Election : सिंधुदुर्ग नगरपंचायत निवडणूक; थंडीमुळे मतदानाला सकाळच्या सत्रात अल्प प्रतिसाद
- नागपुरात नायलॉन मांजाने कापला गळा, प्राध्यापक गंभीर जखमी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha