Maharashtra News Live Update : सत्ताधाऱ्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडलं, शेतकरी आत्महत्या करत आहेत, नाना पटोलेंची विरोधकांवर टीका
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील राजकीय, क्रीडा, गुन्हेगारी जगतातील ताज्या घडामोडी आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर"
LIVE
Background
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देश तसेच राज्यातील राजकीय स्थिती बदलली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याचा दावा केला जातोय. तर दुसरीकडे निवडणुकीतील खराब कामगिरीमुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर आज महायुतीच्या घटकपक्षांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हेदेखील आज दिल्लीमध्ये असून ते भाजपच्या केंद्रीय नेत्यांची भेट घेणार आहेत. या सर्व घडामोडींसह इतरही महत्त्वाच्या घटनांची संपूर्ण माहिती मिळवा एका क्लीकवर...
सत्ताधाऱ्यांनी जनतेला वाऱ्यावर टाकलं, शेतकरी आत्महत्या करत आहेत, नाना पटोलेंची विरोधकांवर टीका
नाना पटोले
आमच्या 14 खासदारांचं मी अभिनंदन करतो
सगळ्यांनी ज्यांनी निवडून आणण्यात मदत केली त्यांचे आभार
सोनिया गांधी, राहुल गांधी यांचेदेखील आभार व्यक्त करतो
महाराष्ट्र मधील तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांचा हा विजय आहे
महाराष्ट्रच्या जनतेचंदेखील मी आभार व्यक्त करतो
भारत जोडो न्याय यात्रा राहुल गांधी यांनी काढली
त्यामुळे ही निवडणूक राहुल गांधीमुळे घराघरात पोहोचली
एक सक्षम विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका म्हणून काँग्रेस पक्ष उभा राहिला
आज देशाचं संविधान बदलण्याचं काम सुरू होतं ते आपण थांबवलं आहे
या वेळेस सगळे काँग्रेसच्या बाजूने उभे राहिले
सामूहिक विजयाचा हा उत्सव आहे
या सगळ्याचं श्रेय जातं राहुल गांधी यांना
आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे
जनतेला वाऱ्यावर टाकलं गेलं, शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकारला कशाचं पडलेलं नाही.
महाराष्ट्रात खूप भयानक परिस्थिती आहे
अजूनही आचारसंहिता सुरू आहे
या अडचणीच्या परिस्थितीत काँग्रेसने ही लढाई हिमतीने लढली
या विश्वासाला तडा आम्ही जाऊ देणार नाही
मुंबई मेट्रो 2 आणि 7 ने रचला नवा विक्रम, एका दिवसात 2 लाख 60 हजार 471 प्रवाशांनी केला प्रवास
मुंबई मेट्रो 2 आणि 7 ने रचला नवा विक्रम,
मार्गिका सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या एका दिवसात सर्वाधिक प्रवासी वाहतूक
काल एका दिवसात तब्बल 2 लाख 60 हजार471 प्रवाशांनी केला प्रवास
मुंबईकर प्रवाशांची मेट्रो प्रवासाला पसंती
अंधेरी पूर्व गुंदवली ते अंधेरी पश्चिम नगर दरम्यान मेट्रो दोन आणि मेट्रो सात सेवा सुरू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 जानेवारी 2023 मध्ये मार्गांचे झाले होते लोकार्पण...
मुंबई मेट्रो 2 आणि 7 ने रचला नवा विक्रम, एका दिवसात 2 लाख 60 हजार 471 प्रवाशांनी केला प्रवास
मुंबई मेट्रो 2 आणि 7 ने रचला नवा विक्रम,
मार्गिका सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या एका दिवसात सर्वाधिक प्रवासी वाहतूक
काल एका दिवसात तब्बल 2 लाख 60 हजार471 प्रवाशांनी केला प्रवास
मुंबईकर प्रवाशांची मेट्रो प्रवासाला पसंती
अंधेरी पूर्व गुंदवली ते अंधेरी पश्चिम नगर दरम्यान मेट्रो दोन आणि मेट्रो सात सेवा सुरू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 जानेवारी 2023 मध्ये मार्गांचे झाले होते लोकार्पण...
Narendra Modi Oath Ceremony : राष्ट्रपती भवनात होणार मोदींचा शपथविधी, मंच उभारणीचे काम चालू!
एनडीएनने नरेंद्र मोदी यांची नेतेपदी एकमताने निवड केली आहे. आता राष्ट्रपती भवनात मोदी यांच्या शपथविधीची तयारी केली जात आहे. मान्यवरांसाठी आसने, शपथविधीसाठी मंच उभारणीचे काम चालू आहे.
Narendra Modi On Election Result : विजय कसा पचवायचा असतो हे आम्ही 4 जून रोजी दाखवलं- नरेंद्र मोदी
आमच्या विजयाला लपवून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण असे प्रयत्न टिकत नाहीत. चार जून रोजी निकाल आल्यानंतर आमच्या वागण्यातून विजय कसा पचवायचा असतो हे दिसून आले.