Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील देश विदेशातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील राजकीय, क्रीडा, गुन्हेगारी जगतातील ताज्या घडामोडी आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील राजकीय, क्रीडा, गुन्हेगारी जगतातील ताज्या घडामोडी आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर
NEET परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय कडून FIR दाखल
NEET परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय कडून FIR दाखल
केंद्र सरकारने काल रात्री NEET परीक्षेतील गैरव्यवहाराचे प्रकरण सीबीआय ला तपास करण्यासाठी दिले होते
नुकताच सीबीआय कडून FIR दाखल करण्यात आला आहे
अकोल्यात पठार नदीला पूर, पनोरी आणि जणोरी गावाचा संपर्क तुटला
अकोल्यात पनोरी आणि जणोरी गावाचा संपर्क तुटलाय. अकोल्यातील अकोट तालुक्यातल्या पठार नदीच्या पाण्यात अचानक पणे पहाटेपासून वाढ झालीय, त्यामुळ नदीला काहिसा पुर आला आहे, त्यात पणोरी आणि जणोरी गावाच्या रस्त्यावरील पठार नदीवर पुलाचं बांधकाम सुरूये. म्हणून गावकऱ्यांना पर्यायी वाहतूकीसाठी पर्यायी रस्त्या बांधन्यात आला, पण सातपुडा पर्वतरांगात सुरू असलेल्या पावसामुळे पठार नदीला पूर आला, आणि हा पर्यायी रस्ता वाहून गेला. सद्यस्थितीत दोन्ही गावांचा संपर्क तुटला असून गावकऱ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास सुरू आहे... याचेच काहीसे व्हिडिओ समोर आले आहे.