Maharashtra Live Updates: संजय राऊतांकडून हर्षवर्धन सपकाळांची काँग्रेस हायकमांडकडे तक्रार
Maharashtra Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
LIVE

Background
Maharashtra Live Updates: दिवाळी अगदी चार दिवसांवर येऊन ठेपलेली असताना परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा धडकी भरलीय. हवामान विभागानं आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगर,जळगाव, पुणे, सातारा, अहिल्यानगरसह 15 जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा दिला आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
राज्यातील तीन महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर
* राज्यातील तीन महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर
* उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा
* मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना ३१ हजार रुपये बेस्ट कर्मचाऱ्यांना ३१ हजार रुपये बोनस जाहीर
* ठाणे मनपा कर्मचाऱ्यांना २४ हजार ५०० रुपये बोनस देण्याचा निर्णय
* नवी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना ३४ हजार ५०० रुपये बोनस देण्याचा निर्णय
* उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सबंधित मनपा आयुक्तांना हे बोनस कर्मचाऱ्यांना त्वरित देण्याचे निर्देश
दिवाळी दोन दिवसांवर, शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार .. आमदार अभिजीत पाटील यांनी डागली शासनावर तोफ
V/O -- कालच मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पॅकेजचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याचे सांग दिवाळीपूर्वी पूरग्रस्तांना पैसे मिळतील असे आश्वासन दिले होते मात्र दिवाळीला केवळ दोन दिवस उरले असताना अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नसल्याने शेतकऱ्यांनी दिवाळी करायची की नाही असा संतप्त सवाल माढ्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांनी केला आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची बत्तीस हजार कोटीची घोषणा हवेतच आहे का असा सवालही आमदार पाटील यांनी उपस्थित केला. आता केवळ दोन दिवस कामाचे दिवस उरले असताना अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत मग शेतकऱ्यांनी कशाची दिवाळी करायची असा सवाल त्यांनी केला.
महापुराचा सर्वात मोठा फटका सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्याला बसला होता महापुरातून लोक सावरत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवकचे अध्यक्ष सुरज भैय्या देशमुख आणि रावसाहेब देशमुख यांनी जवळपास 20 लाख रुपयांची औषधाचा साठा आज माढा आरोग्य केंद्राला खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते दिला. यामध्ये पूरग्रस्त जनतेच्या आरोग्यासाठी लागणारी सर्व प्रकारची औषधे मोठ्या प्रमाणात देण्यात आली आहेत.
या कार्यक्रमानंतर बोलताना आमदार अभिजीत पाटील यांनी सरकार आणि प्रशासन या दोन्हींवर सडकून टीका केली. एका बाजूला मुख्यमंत्री सरसकट पंचनामे करायची घोषणा करतात तर दुसऱ्या बाजूला प्रशासन मात्र पंचनामे करताना नको त्या अटी लावत असल्याचा आरोप त्यांनी केला. विहिरीतील गाळ तीस हजारात कसा निघायचा आणि जनावरांना केवळ 37 हजार हा कुठला न्याय असा संतप्त सवाल त्यांनी केला. आजही मदतीसाठी निघालेल्या जीआर मध्ये पूर्वीचेच दर असून मग मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली वाढीव मदत शेतकऱ्यांना मिळणार की नाही असे विचारत मोडून पडलेल्या शेतकऱ्याला उभं करणे हे सध्याचे सर्वात महत्त्वाचे काम असून शासनाने तातडीने जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना दिल्यास पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करता येईल असे आमदार पाटील यांनी सांगितले.























