Maharashtra Live Updates: कर्जाचे पुनर्गठन नाही, संपूर्ण कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Maharashtra Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
LIVE

Background
Maharashtra Live Blog Updates: शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आज रस्त्यावर उतरणार आहे. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा कढण्यात येणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून या 'हंबरडा' मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. शहरातील क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात होईल, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी ठाम मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं लावून धरली आहे. तसंच पूरग्रस्तांना भरीव मदत देण्याची मागणीदेखील उद्धव ठाकरेंनी केलीय. त्यामुळे आजच्या मोर्चातून उद्धव ठाकरे सरकारवर काय निशाणा साधणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
Silver Rate: चांदीच्या दराने गाठला नवा उच्चांक
बुलढाणा : चांदीच्या दराने आज नवा उच्चांक गाठला असून खामगावच्या प्रसिद्ध बाजारपेठेत प्रति किलो दर 1,75,500 रुपये इतका झाला आहे. गेल्या एका महिन्यात तब्बल 55,000 रुपये प्रति किलो दरवाढ झाली आहे. चांदी खरेदीदारांमध्ये घबराट तर गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
DK Rao : गँगस्टर DK रावला 3 दिवसांची पोलिस कोठडी
DK Rao: खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या गँगस्टर DK राव याला 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र DK राव गँगस्टर असल्यानेच खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे.























