Maharashtra News LIVE Updates : संतोष बांगर यांच्याविरोधात फेसबुक पोस्ट भोवली, ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांच्यावर गुन्हा दाखल
Maharashtra News LIVE Updates : राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा वाचा एका क्लीकवर..

Background
सध्या देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. या वेळीही आमचाच विजय होणार, असा दावा सत्ताधारी भाजपकडून केला जातोय. तर दुसरीकडे यावेळी सत्तांतर होणार, असा विश्वास विरोधकांकडून व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी मनुस्मृतीचे दहन करत महाडमध्ये राज्य सरकारविरोधात आंदोलनक केले. या आंदोलनादरम्यान आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याचा दावा भाजपकडून केला जातोय. या प्रकरणी त्यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या प्रकरणावरूनही आज महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दुसरीकडे महाराष्ट्राला मान्सूनची चाहूल लागली आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयारी चालू केली आहे.
या घडामोडींसह राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा संपूर्ण आढावा वाचा एका क्लीकवर!
Ayodhya Pol : ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांच्यावर गुन्हा दाखल
ठाकरे गटाच्या हिंगोलीच्या नेत्या अयोध्या पोळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या घरासमोर गोळीबार झाल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Hasan Mushrif On Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांना अद्दल घडवण्याची गरज, हसन मुश्रीफ यांची टीका
हसन मुश्रीफ यांची आव्हाड यांच्यावर टीका
मनुस्मृतीचे दहन करायचे होते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यावर फोटो छापण्याची गरज काय?
त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जनतेचा अपमान केला आहे
केवळ माफी मागून होणार नाही
जितेंद्र आव्हाड यांना अद्दल घडवण्याची गरज
























