Maharashtra Live Updates: मद्यातून महसुल वाढीसाठी राज्य सरकारतर्फे समिती गठीत, लाडकी बहीणसह इतर योजनांमुळे राज्याच्या तिजोरीत मोठया प्रमाणावर खडखडाट
Maharashtra live blog updates in Marathi:महाराष्ट्र, देश-विदेशातील ताज्या घडामोडी, बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा...

Background
Maharashtra live blog updates in Marathi: राज्यात सध्या थंडीचा कडाका पुन्हा वाढताना दिसतोय. तर दुसरीकडे बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरुन वातावरण तापलंय. भाजपच्या सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीच्या बैठकांचं सत्र देखील सुरु आहे. विधानसभेच्या पराभवानंतर पक्षाची आगामी निवडणुकांसाठीची रणनीती ठरवली जातेय. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा...
Dombivli Crime: डोंबिवलीत गुंडांच्या टोळीची दहशत, तोडफोड आणि दगडफेक
Dombivli Crime: डोंबिवलीत गुंडांच्या टोळीची दहशत
जागेच्या वादातून रात्री 10 ते 12 जणाच्या टोळी कडून तोडफोड आणि दगडफेक....
घटना सीसीटिव्हीत कैद..परिसरातील दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण
Prakash Solanke: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोलंके सध्या उपचारासाठी मुंबई मधील ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल
Prakash Solanke: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोलंके सध्या उपचारासाठी मुंबई मधील ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल आहेत
पाठीच्या मणक्याचा त्रास होऊ लागल्यामुळे रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आल होत
त्यांच्या मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे
गेल्या ५ दिवसांपासून प्रकाश सोळंके हे ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल आहेत























