Maharashtra Live blog Updates: केंद्र सरकारकडून दिवाळी धमाका; आता जीएसटीचे दोनच स्लॅब, सर्व घडामोडी, एका क्लिकवर
Maharashtra Live blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
LIVE

Background
Maharashtra Live blog Updates: सणासुदीच्या काळात, दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय आहे. आधी असलेल्या जीएसटीच्या चार स्लॅबपैकी 12 टक्के आणि 28 टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्यात आला. त्यामुळे देशात आता फक्त 5 टक्के आणि 18 टक्के असेल दोनच जीएसटी स्लॅब असतील. सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यपदार्थ, साबण, कपडे, पादत्राणे यासह रोजच्या वापराच्या गोष्टी स्वस्त होणार आहेत. तर आरोग्य विमा आणि जीवन विम्यात पूर्ण सूट मिळण्याची शक्यता आहेत. सरकारचा हा निर्णय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. तर महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाबाबत सरकारने जीआर काढल्याने ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. या राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
GR मुळे ओबीसी वर अन्याय होणार एस वाटत असेल तर दोन महिने वेळ आहे ,आम्ही तपासून पाहू :पंकजा मुंडे
मराठा आरक्षणाच्या GR वर मंत्री पंकजा मुंडे यांच महत्वच विधान
मला हे वाटत ते आधी ही वाटत आले आहे आणि पुढे ही तेच वाटत राहील त्यात बदल होणार नाही.
आर्थिक मागासलेपण आणि सामाजिक मागासलेपण हा वेगळा विषय आहे.
मराठा समाजासाठी GR काढला तर ओबीसीवर अन्याय होऊ नये यासाठी समिती ही काढली आहे.
राज्य सरकार यावरून सुवर्ण मध्य काढला जाईल ही प्रार्थना केली आहे
सगळे समाज आनंदात नांदावे ही इच्छा व्यक्त करते
सामाजिक मागासलेपण असलेल्या ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही अशी भूमिका सरकार घेईल असा विश्वास आहे
GR मुळे ओबीसी वर अन्याय होणार एस वाटत असेल तर दोन महिने वेळ आहे . आम्ही तपासून पाहू .
ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही हा शब्द आमचा ओबीसीना आहे
अकोल्यात OBC कार्यकर्ते आक्रमक....ओबीसीच्या शिष्टमंडळात गेलेल्या माजी आमदारांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांची धक्काबुक्की
Akola Flash :
अकोल्यात OBC कार्यकर्ते आक्रमक.... अकोल्यात आज ओबीसीच्या शिष्टमंडळात गेलेल्या माजी आमदारांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांची धक्काबुक्की....
ओबीसी कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आले होते जिल्हाधिकारी कार्यालयात....
2 सप्टेंबर रोजी मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात सहभागी करून घेण्याचा घेतलेला निर्णय रद्द करण्याच्या विरोधात निवेदन देण्यासाठी आले होते OBC कार्यकर्ते. जिल्हाधिकारी यांची मिटिंग सुरु असल्याने कार्यकर्त्यांना थांबावं लागलं.... त्यामुळे आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना अडवण्यासाठी गेले असता त्यांना लोटालोटी तथा धक्काबुक्की झाली आहे....
धक्काबुक्की झाल्याचा आरोप या ठिकाणी माजी आमदार तथा ओबीसी नेते हरिदास भदे यांनी केला आहे....
बाईट : हरिदास भदे ( माजी आमदार तथा ओबीसी नेते )























