Maharashtra Live blog Updates: नंदुरबारमध्ये खळबळजनक हत्या प्रकरणानंतर अघोषित संचारबंदी; शहरात भीतीचं वातावरण
Maharashtra Live blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
LIVE

Background
Maharashtra Live blog Updates: संपूर्ण राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झालाय. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर पहायला मिळत आहे. दरम्यान आणखी काही दिवस मुंबईत हलक्या सरी बरसण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मुंबईसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच त्रिभाषा सूत्र म्हणजेच हिंदी सक्तीवरुन महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजकीय वाद रंगल्याचं आपण पाहिलं होतं..दरम्यान यासंदर्भात सरकारकडून त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीची बैठक पार पडली..या बैठकीत समिती कशी कामकाज करेल यासंदर्भात चर्चा झाली.. त्रिभाषा संदर्भात वेबसाईट तयार करण्याचा निर्णय समितीने घेतला असल्याची माहिती अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी दिली..या वेबसाईटवर जनतेला त्रिभाष सूत्रासंदर्भात मत मांडता येणार आहे.. तर त्रिभाषा सूत्र लागू करायचं की नाही याचा आढावा घेण्यासाठी समिती महाराष्ट्र दौरा करणार आहे..त्यानंतर 5 डिसेंबरला समिती शासनाला अहवाल सादर करणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी दिली. या राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
जयंत पाटील यांच्यावर गोपीचंद पडळकर यांची खालच्या भाषेत टीका
जत चा माजी आमदार जयंतच्या सांगण्यावरून कंत्राटदार आत्महत्या प्रकरणात मला खेचू पाहत आहे. जयंत बिनडोक माणूस आहे. याला अक्कल नाही. मुळात कंत्राटदाराकडे आमदारच काम काय असतं. केवळ मला बदनाम करण्याच षडयंत्र इतक्या माजी आमदाराला सोबत घेऊन करत आहे. असे खूप प्रकार अंगावर घेतले. यांच्या खोट्या केसेस मुळे २-२ महिने जेल मधे काढले. मला वाटतय जयंत पाटील हा राजारामबापू पाटील यांची औवलाद वाटतं नाही, काही तर गडबड आहे ?
जळगाव जिल्ह्यात पाचोर्याच्या सातगाव डोंगरी परिसरात धरण फुटल्याची अफवा; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण !
जळगाव जिल्ह्यात पाचोर्याच्या सातगाव डोंगरी परिसरात धरण फुटल्याची अफवा; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण !
सुज्ञ तरुणाने प्रत्यक्ष धरणावर जाऊन चित्रीकरण करत अफवेला दिला पूर्णविराम !
Ancr: जळगावच्या पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ढगफुटीसदृश्य मुसळधार पावसामुळे परिस्थिती निर्माण झाली होती. घाटनांद्रा व जोगेश्वरी खोऱ्यातून आलेल्या पुरामुळे स्थानिक ग्रामस्थ आधीच संकटात असताना, आज अचानक सातगाव डोंगरी परिसरात धरण फुटल्याची अफवा पसरली. या अफवेचा परिणाम असा झाला की परिसरातील ग्रामस्थांनी जीव वाचवण्यासाठी घरं सोडली, काहींनी डोंगरकडे धाव घेतली, तर काही गाव सोडून बाहेर पळाले. या अफवेने संपूर्ण परिसरातील गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र एका जागरूक तरुणाने धाडस करून प्रत्यक्ष धरणावर जाऊन चित्रीकरण केलं आणि कोणतंही धरण फुटलेलं नाही, असे सांगणारा व्हिडिओ व्हायरल केला. त्यामुळे काही तासांनी ग्रामस्थांना दिलासा मिळाला असला, तरी या अफवेने मोठी खळबळ उडवून दिली होती.
Byte ग्रामस्थ


















