Maharashtra Live blog Updates: लक्ष्मण हाके वांगदरीत दाखल, भरत कराड यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट
Maharashtra Live blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
LIVE

Background
Maharashtra Live blog Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मे 2023 मध्ये मेईतेई आणि कुकी जमातींमध्ये झालेल्या हिंसाचारानंतरचा पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच मणिपूर दौरा असेल. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे 7 हजार 300 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. त्यांच्या दौऱ्यापूर्वी भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे हे मणिपूरमध्ये आयोजनाच्या दृष्टीने गेले आहेत. पंतप्रधान मोदी प्रथम चुराचंदपूरला पोहोचतील, जिथे ते विस्थापित लोकांची भेट घेणार आहेत. दरम्य़ान, मणिपूर फेब्रुवारी 2025 पासून राष्ट्रपती राजवटीखाली आहे.
साताऱ्यात पुन्हा पावसाची दमदार बॅटिंग; जनजीवन विस्कळीत
सातारा : जिल्ह्यात पावसाची पुन्हा एकदा दमदार बॅटिंग सुरू झाली आहे. शहर परिसरासह ग्रामीण भागात पावसाच्या सरी धोधो कोसळत असून, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रस्त्यांवर पाणी साचलं आहे, तर शेतकऱ्यांची खरीप हंगामातील काढणीची कामं अडथळ्यात आली आहेत. कोसळधार पावसाचा खेळ जिल्ह्यात सुरूच असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
श्रीवर्धन किनाऱ्यावर लाखो रुपयांचे चरस आढळल्याने खळबळ
रायगड : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या मनेरी नानवली समुद्र किनारी पुन्हा एकदा अंमली पदार्थांचा मोठा साठा सापडला आहे. हा अमली पदार्थांचा साठा दिघी सागरी पोलिसांकडून जप्त करण्यात आलाय. हा सापडलेला अमली पदार्थांचा साठा समुद्रकिनारी वाहून माहिती समोर आली आहे. एकूण 11 किलो 966 ग्रॅम वजनाचा ‘चरस’ हा अंमली पदार्थ असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या अंमली पदार्थांची किंमत तब्बल 59 लाख 83 हजार रुपये इतकी असल्याचे समजते. या प्रकरणाचे अधिक चौकशी दिघी सागरी पोलीस करत आहेत.

















