एक्स्प्लोर

विधानपरिषद निकाल: शिवसेना 2, भाजप 2, काँग्रेसला धक्का

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक निकाल 2018: स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या 6 पैकी 5 जागांचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये शिवसेना 2, भाजप 2 आणि राष्ट्रवादीने एका जागेवर बाजी मारली आहे.

विधानपरिषद निवडणूक निकाल लाईव्ह: मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या 6 पैकी 5 जागांचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये शिवसेने 2, भाजपने 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर बाजी मारली आहे. महत्त्वाचं म्हणजे अमरावतीत काँग्रेसला जबर धक्का मिळाला. कारण अमरावतीत काँग्रेसची स्वत:ची 128 मतं असताना काँग्रेस उमेदवाराला केवळ 17 मतं मिळाली. त्यामुळे भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी 458 मतं मिळवत मोठा विजय मिळवला. दुसरीकडे नाशिकमध्ये शिवसेनेने बाजी मारली.  पालघरचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या भाजपला हा मोठा दणका आहे. शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी जवळपास 200 मतांनी विजय मिळवला. दराडेंना 412 मतं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवाजी सहाणे यांना 219 मतं मिळाली. इकडे रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांनी विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेच्या राजीव साबळे  यांचा पराभव केला. तटकरेंना तब्बल 620 तर साबळेंना 306 मतं मिळाली. परभणी-हिंगोली मतदारसंघात शिवसेनेच्या विप्लव बाजोरिया यांनी विजय मिळवला. त्यांना 256 मतं मिळाली. तर काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुरेश देशमुख यांच्या पदरात 221 मतं पडली. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या जागेवर भाजपच्या रामदास आंबटकर यांनी विजय मिळवला. रामदास आंबटकर यांना 528 मतं मिळाली. तर काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफ हे 491 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक,  परभणी-हिंगोली, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या जागांचा निकाल आज जाहीर झाला. तर लातूर-बीड-उस्मानाबाद या मतदारसंघाचा निकाल हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने राखून ठेवला आहे. त्यामुळे या जागेची मतमोजणी लांबणीवर पडली आहे. या सर्व मतदारसंघात सोमवारी 21 मे रोजी मतदान झालं होतं.

विधानपरिषद निवडणूक 2018 संपूर्ण निकाल

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था शिवसेना - नरेंद्र दराडे (412 मतं) राष्ट्रवादी - शिवाजी सहाणे (219 मतं)  शिवसेना 193 मतांनी विजयी कोकण स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादी - अनिकेत तटकरे (620 मतं) शिवसेना - राजीव साबळे (306 मतं) राष्ट्रवादी 314 मतांनी विजयी परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था शिवसेना - विप्लव बाजोरिया (256 मतं) काँग्रेस - सुरेश देशमुख (221 मतं)  शिवसेना 35 मतांनी विजयी अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था भाजपा - प्रविण पोटे-पाटील (458 मतं) काँग्रेस - अनिल मधोगरिया (17 मतं)  भाजप 441 मतांनी विजयी वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था भाजपा - रामदास आंबटकर (528 मतं) काँग्रेस - इंद्रकुमार सराफ (491 मतं) भाजप 37 मतांनी विजयी

LIVE UPDATE

 नाशिक- राष्ट्रवादी-भाजपला धक्का, शिवसेनेचे नरेंद्र दराडे विजयी, दराडेंना 412 तर राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे यांना 219 मतं

परभणी-हिंगोली - शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी (256 मतं), काँग्रेसच्या सुरेश देशमुख यांचा पराभव (221) रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग   -  राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरे यांना निर्णायक आघाडी चंद्रपूर - भाजपचे रामदास आंबटकर विजयी - आंबटकर यांना 550 मतं, काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफ यांना 462  मतं. अमरावतीभाजपाचे प्रविण पोटे विजयी (458  मतं), काँग्रेसच्या अनिल मधोगरिया (17) यांचा पराभव - 9.00 अमरावती: मतमोजणी सुरु होण्यापूर्वीच भाजपाचे उमेदवारी प्रवीण पोटे यांचे विजयांचे बॅनर लागले. 8.00 AM विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात 7.55 AM थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात आज निकाल दरम्यान, आज सुरुवातीला नोटा आणि अवैध मतं बाजूला काढली जातील, त्यानंतर वैध मतांचा कोटा ठरवून मतमोजणीला सुरुवात होईल. नाशकात शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राष्ट्रवादीकडून शिवाजी सहाणे अशी लढत पहायला मिळाली. इथं भाजपनं राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेत दुपारी चार वाजेपर्यंत 99.57 टक्के मतदानाची नोंद झाली. 940 पैकी 938 जणांनी मतदान केलं. कर्जत आणि पनवेलमधील प्रत्येकी एका मतदाराची मतदानासाठी अनुपस्थिती होती. दोन्ही शेकापचे लोकप्रतिनिधी आहेत. नाशिकमध्ये 644 जणांनी मतदानाचा हक्क बजवल्यामुळे 100 टक्के मतदान झालं. उस्मानाबाद बीड लातूर मतदारसंघात 99.9 % मतदान झालं. एक हजार पाच मतदारापैकी एक हजार चार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. उस्मानाबाद (291) आणि लातूर (353) मध्ये शंभर टक्के मतदान झालं असून बीडमध्ये (360) एका मतदाराने आपला हक्क बजावला नाही. परभणी हिंगोलीतील 501 पैकी 499 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदाराची आकडेवारी 99.60 टक्के झाली आहे. अमरावतीत 489 पैकी 488 सदस्यांनी मतदान केलं. अमरावतीत मतदानाची आतापर्यंतची आकडेवारी 99.80 टक्के इतकी आहे. वर्धा-गडचिरोली-चंद्रपूरमधील जागेसाठी 99.72 % मतदान झालं. 1059 मतदारांपैकी 1056 जणांनी मताधिकार बजावला. बीडमध्ये प्रतिष्ठेची लढत लातूर-उस्मानाबाद-बीडच्या जागेसाठीची निवडणूक सर्वात चुरशीची मानली जात आहे. कारण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली आहे. या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत होत आहे. राष्ट्रवादीने रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादीची आणि पर्यायाने धनंजय मुंडेंची चांगलीच पंचाईत झाली. त्यामुळे राष्ट्रवादीला ऐनवेळी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अशोक जगदाळे  यांना पाठिंबा द्यावा लागला. नाशिक नाशिकमध्येही विधानपरिषद निवडणुकीत रंगत वाढली आहे. इथे  शिवसेनेचे नरेंद्र दराडे  विरुद्ध राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे यांच्यात सामना होत आहे. मात्र पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतला वचपा काढण्यासाठी इथे भाजप थेट राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय. कोकणात राणेंचा तटकरेंना पाठिंबा कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसने सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे यांना,  तर शिवसेनेने राजीव साबळे यांना उमेदवारी दिली आहे. नारायण राणे यांनी शिवसेनेला विरोध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. अमरावती अमरावतीत भाजपचे प्रवीण पोटे आणि काँग्रेसचे अनिल मधोगरिया यांच्यात सरळ लढत होत आहे. त्याकडेही सर्वांचं लक्ष आहे. विधानपरिषद निवडणूक 2018 : कोणाविरुद्ध कोण? रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग   -  अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)  विरुद्ध राजीव साबळे  (शिवसेना) नाशिक - नरेंद्र दराडे (शिवसेना) विरुद्ध  शिवाजी सहाणे (राष्ट्रवादी) परभणी-हिंगोली -  विप्लव बजोरिया (शिवसेना) विरुद्ध सुरेश देशमुख (काँग्रेस) उस्मानाबाद-लातूर-बीड - सुरेश धस (भाजप) विरुद्ध  अशोक जगदाळे (अपक्ष) - राष्ट्रवादीचा पाठिंबा अमरावती -  प्रवीण पोटे (भाजप) विरुद्ध  अनिल मधोगरिया  (काँग्रेस) वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली - इंद्रकुमार सराफ (काँग्रेस)  विरुद्ध रामदास अंबटकर (भाजप)   या आमदारांचा कार्यकाळ संपणार राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग) राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत जाधव (नाशिक) राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा जानी दुर्राणी (परभणी-हिंगोली) काँग्रेसचे दिलीपराव देशमुख (उस्मानाबाद-लातूर-बीड) भाजपचे प्रवीण पोटे (अमरावती) भाजपचे मितेश भांगडिया (वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली) संबंधित बातम्या  उस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषद : मतमोजणी पुढे ढकलली!    पाच दिवसात राष्ट्रवादी का सोडली? रमेश कराड म्हणतात...     शंभर ते दीडशे मतांच्या फरकाने निवडून येणार : सुरेश धस    बीड-उस्मानाबाद-लातूरमध्ये एका मताची किंमत पाच लाख रुपये?   विधानपरिषद निवडणुकीचं राज्यातलं चित्र, कुणाचं संख्याबळ किती?  
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi On Amit Shah Sabha : राहुल गांधींचा मोदी-शाहांवर गंभीर आरोप; धारावीच्या जमिनीसाठी..Who is Sajjad Nomani : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेले सज्जाद नोमानी कोण आहेत? #abpमाझाDhananjay Munde Parli : बहीण-भाऊ स्टार प्रचारक, तरीही मोठी सभा का नाही? परळीत काय घडतंय?Piyush Goyal Mumbai : मविआवर सडकून टीका ते भाजपचा पुढील प्लॅन; पियूष गोयल यांच्यासोबत बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
×
Embed widget