(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra News LIVE Updates : वसंत मोरेना पंतप्रधान व्हायचंय, अमित ठाकरेंचा टोला
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
वसंत मोरेना पंतप्रधान व्हायचंय, ते सोशल मीडियाच्या आहारी गेलेत : अमित ठाकरे
अमित ठाकरे
वसंत मोरेना पंतप्रधान व्हायचंय. ते सोशल मीडियाच्या आहारी गेलेत. त्यांनी मनसेकडून पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा राज साहेबांचा आदेश पाळावा. महायुतीच्या प्रचारात सहभागी व्हावे असे मत मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी व्यक्त केलं.
महाविकास आघाडी/ उद्धव ठाकरे यांना मुंबईत एकही जागा मिळणार नाही
त्यांच्या विरोधात वातावरण आहे. अमोल किर्तीकर यांचा खिचडी घोटाळा समोर आलाय
देशात पुन्हा मोदी सरकार येणार. 300 च्या आसपास जागा मिळतील
राज साहेबांनी कार्यकर्त्यांचा विचार करूनच बिनशर्थ पाठिंब्याचा निर्णय घेतला असणार
लोकसभा निवडणुकीत मनसेचे जे पदाधिकारी महायुती विरोधात प्रचार करतील त्यांच्यावर कारवाई होणार
शिरूर लोकसभा मतदारसंघात नारायणगाव येथे प्रचारादरम्यान दोन्ही उमेदवार एकाच व्यासपीठावर
शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ अमोल कोल्हे यांचा आज जुन्नर विधानसभा मतदारसंघात दौरा असून प्रचारा दरम्यान पिंपळगाव येथे रामनवमी उत्सवाच्या कार्यक्रमाला दोन्ही उमेदवार एकाच व्यासपीठावर आले. ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला. मात्र यावेळी दोघांनी एकमेकांकडे पाहणेही टाळले आणि कार्यक्रम उरकून पुढील प्रचारासाठी निघून गेले.
महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ 20 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची परभणीत सभा
परभणीतील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ 20 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परभणीत सभा होणार आहे.शहरातील पाथरी रोड लगत असलेल्या लक्ष्मी नगरी येथे पंतप्रधान मोदींची सभा नियोजित आहे.आज रामनवमी निमित्त या सभा मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यासहित महायुतीतील सर्वच घटक पक्षांचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
मनसेनं पाठिंबा दिल्याबद्दल मुरलीधर मोहोळ यांनी मानले आभार
पुण्यात मनसेनं पाठिंबा दिला त्याबद्दल भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी मानले आभार
मनसेचे एकावेळी पुण्यात 29 नगरसेवक असताना होते,त्यामुळे मनसेची संपूर्ण शहरात चांगली ताकद आहे.त्याचा फायदा होणार आहे.
एमआयएम ने उमेदवार दिला त्याचा तो निर्णय आहे
राज ठाकरे यांच्या बॅनरवर फोटो लावण्यात येईल काही ठिकाणी दिसत नव्हता.
काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा यांच्या निवासस्थानी फडणवीसांसह बावनकुळे दाखल
काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पोहोचले. ही राजकीय नव्हे तर खासगी भेट असल्याची माहिती. मात्र निवडणुकीच्या पूर्वी अशी भेट सर्वांच्या भुवया उंचावणारी आहे.