कुस्तीच्या फडात लाथ अन् बुक्क्या, महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ; पंचांच्या निर्णयानंतर नेमकं काय घडलं?
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. कारण या स्पर्धेत पैलवान शिवराज राक्षेने पंचाला थेट लाथ मारली आहे.

Maharashtra Kesari 2025 : अहिल्यानगर येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागलं आहे. या स्पर्धेतील उपांत्य सामन्यात चांगलाच गोंधळ झाला. नांदेडचा कुस्तीपटू शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) याने पंचाला थेट लाथ मारल्यामुळे कुस्तीच्या फडातच मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे कुस्तीच्या फडात लाथ आणि बुक्क्यांचाच खेळ पाहायला मिळाला. दरम्यान, हा गोंधळ नेमका कशामुळे झाला? असे विचारले जात आहे.
कुस्ती चालू असताना नेमकं काय घडलं?
अहिल्यानगर येथे चालू असलेल्या स्पर्धेतील उपांत्य लढत चालू होती. या लढतीत नांदेडचा पैलवान शिवराज राक्षे आणि पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांच्यात सामना चालू होता. याच सामन्यादरम्यान मोठा वाद झाला. शिवराज राक्षे खाली पडल्यानंतर पंचाने थेट पृथ्वीराज मोहोळ विजय असल्याचं घोषित केलं. त्यानंतर या निर्णयाला शिवराजने विरोध केला. या विरोधानंतर कुस्तीच्या फडात मोठा गोंधळ उडाला. रागाच्या भरात शिवराजने पंचांना थेट लाथ मारली. तर उत्तरादाखल मैदानावर आलेल्या एका व्यक्तीने शिवराच्या कानशीलात लगावली. समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये हा गोंधळ स्पष्टपणे दिसत आहे.
नेमका आक्षेप काय?
शिवराजने पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. मी पराभूत झालेलोच नाही. तरीदेखील कोणताही विचार न करता पंचांनी मी चीत झाल्याचं घोषित केलं, असा दावा शिवराजने केला आहे. विशेष म्हणजे या निर्णयाविरोधात शिवराजने तक्रारही केली आहे. त्यामुळे आता त्याच्या तक्रारीवर नेमका काय निर्णय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
शिवराच्या कोचचे नेमके मत काय?
हे काका पवारचे पठ्ठा आहे. हा ट्रिपल महाराष्ट्र केसरीचा दावेदार होता. त्याने दोन्ही खांदे टेकले असते तर समोरच्याच्या विजय घोषित करण्यासाठी शंभर टक्के स्वत: हात वर करण्यासाठी आलो असतो. त्याने दोन्ही खांदे टेकले असते तर हा पराभूत झाला असता असे आम्ही मान्य केले असते. मी जर अपील टाकलं तर अगोदर माझं अपील चेक करणे आणि नंतर निर्णय देणे, असा नियम आहे. पण पंचांनी न बघता निर्णय देऊन टाकला. समोरच्याचा विजय घोषित केला. शिवराज पूर्ण चीत झाला नव्हता, असे शिवराजच्या कोचचे मत आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
