Jalna News : आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने भर पावसात रस्त्यावर महिलेची प्रसूती, घटनेचा Video समोर.
Jalna News : आरोग्य केंद्रात डॉक्टरच नसल्याने बाहेर दीड तास ही महिला प्रसुतीच्या वेदनेने व्हिवळत होती.
Jalna News : एकीकडे महाराष्ट्रात (Maharashtra) राजकारण आणि सत्ताकारण शिखरावर असताना दुसरीकडे मात्र सर्वसामान्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरुच आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर डॉक्टर नसल्यानें एका महिलेची प्रसूती करण्याची वेळ नातेवाईकांवर आली. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
जालना जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरची घटना
रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास रुपाली हारे या 26 वर्षीय महिलेला प्रसूती वेदनेमुळे वडीगोद्रीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आलं, मात्र तिथे डॉक्टरच नसल्याने बाहेर दीड तास ही महिला व्हिवळत होती, दरम्यान या गरोदर महिलेसोबत असलेल्या नातेवाईक महिलांनी आरोग्य केंद्रातील नर्सला बोलावून आणले. आणि भर पावसात गरोदर महिलेची प्रसूती केली, सुदैवाने बाळ आणि त्याची आई सुखरूप असून नंतर एका खाजगी डॉक्टरच्या मदतीने त्यांच्यावर उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आली. मात्र उभ्या महाराष्ट्रात राजकारण्यांनी पेटवलेल्या राजकारणात सामान्य माणसं दुर्लक्षामुळे कशी होरपळून चालली आहेत? हे सर्व या उदाहरणावरून स्पष्ट होतंय.