Jalgaon : 'सुषमा अंधारे या तीन महिन्याचं बाळ, त्यांची ठाकरे कुटुंबावरील टीका सहन करणार नाही' - मंत्री गुलाबराव पाटील
Jalgaon Political News : "बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली टीका तसेच हिंदू देवतांवर त्या काय काय बोलल्या आहेत. त्याच्याही क्लिपा दाखवाव्यात. गुलाबराव पाटलांनी कडक शब्दात टीका केलीय
Jalgaon Political News : शिवसेनेच्या (Shivsena) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी टीका केली आहे. सुषमा अंधारे तीन महिन्यापूर्वीच पक्षात आल्या असून ते तीन महिन्यांचे बाळ असल्याचा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. चोपडा मतदार संघातील धानोरा गावात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा योजनेचा भूमीपूजन सोहळा पार पडला. कार्यक्रमानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा ते बोलत होते.
सुषमा अंधारेंची गुलाबराव पाटलांच्या होमटाऊनमध्ये सभा
शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे या जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून त्यांची पहिलीच सभा मंत्री गुलाबराव पाटील यांचे होमटाऊन असलेल्या धरणगाव शहरात होत आहे. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता सुषमा अंधारे या तीन महिन्यापूर्वीच उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेत आल्या आहेत. ते तीन महिन्याचं बाळ आहे, सुषमा अंधारे यांना बाई म्हणत, या बाईने बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांच्यावर केलेली टीका तसेच हिंदू देवतांवर त्या काय काय बोलल्या आहेत. त्याच्याही क्लिपा दाखवाव्यात, अन्यथा आम्ही आमच्यावर केलेल्या टीका आम्ही सहन करणार नाही असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अंधारे यांना दिला आहे.
आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा हे दोघेही मित्र - पाटील
रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावेत, असे मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले होते, त्यानुसार रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे, यावरही मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यासह ते आमदार होते त्यांच्या भावना मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे. आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा हे दोघेही मित्र आहेत. त्यांनी समजून घेतलं पाहिजे हीच आपली भावना होती, नेत्याच्या बैठकीत त्यांनी समजून घेतलं आणि निर्णय घेतला. यातून लोकांचा सभ्रम दूर करण्याचा प्रयत्न दोघानाही केला असल्याचं मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं. या कार्यक्रमाला शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी उपस्थिती होती.
इतर महत्वाच्या बातम्या
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, काय निर्णय होणार? राज्यात उत्सुकता