Ichalkaranji Accident : इचलकरंजीतील विद्यार्थ्यांच्या बसचा बारामतीत अपघात, 24 मुली किरकोळ, तर 3 मुली गंभीर जखमी
Ichalkaranji Accident : घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांचे पालक बारामतीकडे रवाना झाले आहेत.
Ichalkaranji Accident : इचलकरंजीतील विद्यार्थ्यांच्या बसचा (Picnic Bus Accident) बारामती तालुक्यात (Baramati) अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. हा अपघात पहाटेच्या सुमारास घडला. या अपघातातील जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.
इचलकरंजी विद्यार्थ्यांचे पालक बारामतीकडे रवाना
मिळालेल्या माहितीनुसार, इचलकरंजी येथील सागर क्लासेसच्या आठवी ते दहावीच्या मुलींची शिर्डी-औरंगाबाद अशी सहल काढण्यात आली होती. शिर्डीहून इचलकरंजीकडे परत जाताना पाहुणेवाडीतील पूलावरुन ही बस कोसळली. या अपघातात 24 मुली किरकोळ, तर 3 मुली गंभीर जखमी झाल्याचे समजते. यामध्ये 48 मुली, पाच शिक्षक आणि कर्मचारी सहलीत सहभागी झाले होते. घटनेची माहिती मिळताच सागर क्लासेसच्या बाहेर मोठी गर्दी पालकांनी केली आहे. तर इचलकरंजी विद्यार्थ्यांचे पालक बारामतीकडे रवाना झाले आहेत.
आमदार रोहित पवारांची भेट
अपघाताची माहिती मिळताच आमदार रोहित पवार यांनी जखमींची भेट घेऊन विचारपूस केल्याचे समजते. रोहित पवार यांनी सांगितले की, बसचा अपघात झाल्याने जखमी विद्यार्थीनींवर बारामतीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या विद्यार्थीनींची भेट घेऊन विचारपूस केली आणि डॉक्टरांशी चर्चा केली. या विद्यार्थिनींना चांगले उपचार देण्याच्या सूचना अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही दिल्या आहेत. या सर्व विद्यार्थिनींची तब्येत चांगली असून काळजी नसावी! असं म्हटलंय.
काही दिवसांपूर्वी देखील अशीच एक दुर्घटना
12 डिसेंबरला देखील अशीच एक दुर्घटना घडली होती. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर बोरघाटात खासगी बसचा अपघात झाला होता. अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून ३५ जण जखमी झाले आहेत. मुंबईतील चेंबूर येथील एका खासगी क्लासची सहल मावळ येथे जात असताना हा अपघात झाला होता. अपघातातील जखमींवर कामोठे येथील एमजीएम आणि खोपोलीच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, बसचालक चैतू ठाकूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याचं बसचालकानं सांगितलं होतं.
स्कूलबसचा अपघात
नागपुरात देखील नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात स्कूलबसचा अपघात झाला होता. ज्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता, बसचालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याचे सांगण्यात आले होते. या अपघातात 14 वर्षाचा आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता, तर सम्यक कळंबे असे मयत विद्यार्थ्याचे नाव असल्याची माहिती मिळाली होती.
इतर बातम्या
31 December Headlines : सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत, मंदिरं, पर्यटनस्थळांवर गर्दी, आज दिवसभरात