एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
बारावीचा निकाल आज, दुपारी 1 वा वेबसाईटवर निकाल!
बारावीचा निकाल आज 30 मे 2018 रोजी दुपारी 1 वा जाहीर होणार आहे.
![बारावीचा निकाल आज, दुपारी 1 वा वेबसाईटवर निकाल! Maharashtra HSC Result 2018 Date and Time Announced on mahresult.nic.in, Board confirms बारावीचा निकाल आज, दुपारी 1 वा वेबसाईटवर निकाल!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/06160108/SSC-HSC-exams.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
फाईल फोटो
मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. बारावीचा निकाल आज 30 मे 2018 रोजी दुपारी 1 वा जाहीर होणार आहे. बोर्डाच्या www.mahresult.nic.in वेबसाईटवर हा निकाल जाहीर होईल.
बोर्ड 5 वेबसाईटवर हा निकाल उपलब्ध करुन देणार आहे. शिवाय SMS द्वारे मोबाईलवरही निकाल मिळू शकेल.
www.mahresult.nic.in
www.result.mkcl.org
www.maharashtraeducation.com
www.knowyourresult.com
www.hscresult.mkcl.org
आज वेबसाईटवर निकाल पाहता येईल तसंच गुणपत्रिका डाऊनलोडही करता येईल.
बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?
विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण वेबसाईटवर उपलब्ध होतील आणि त्याची प्रिंट आऊट घेता येईल.ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येईल.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर या विभागात बारावीच्या लाखो विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
बारावी निकालाबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अफवांचं पीक आलं आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मनात गोंधळाचं वातावरण होतं. मात्र, आता बोर्डाने निकालाची तारीख जाहीर केली आहे.
मोबाईलवर निकाल कसा मिळवाल?
एसएमएस सेवेद्वारे मोबाईलवर बीएसएनएल धारकांना निकाल मिळवता येईल.
MHHSC <space> <seat no> हा मेसेज टाईप करुन 57766 या क्रमांकावर पाठवायचा आहे.
14 लाख विद्यार्थी
राज्यात 14 लाख 85 हजार 132 विद्यार्थ्यांनी बारावीची परिक्षा दिली. यामध्ये 8 लाख 34 हजार 134 विदयार्थी तर 6 लाख 50 हजार 898 विद्यर्थिनी होत्या. विद्यार्थ्यांची शाखानिहाय आकडेवारी याप्रमाणे-
विज्ञान शाखा- 5 ,लाख 80 हजार 820 विद्यार्थी
कला- 4 लाख 79 हजार 863 विद्यार्थी
वाणिज्य- 3 लाख 66 हजार 756 विद्यार्थी
व्यावसायिक अभ्यासक्रम- 57 हजार 693 विद्यार्थी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
मुंबई
निवडणूक
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)