एक्स्प्लोर

Maharashtra Headlines 9th June : राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर, वाचा दुपारच्या बातम्या

राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील. 

शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी; ट्विटर हँडलरवर कारवाई करा, सुप्रिया सुळेंची मागणी 

 राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना ट्विटरच्या माध्यमातून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.   खासदार सुप्रिया सुळे  यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळासह भेट घेतली.   जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलवर कारवाई करावी या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी  मागणी केली आहे (वाचा सविस्तर)

 पवारांना धमकी आलेल्या ट्विटर हॅण्डलची शहानिशा करुन कारवाई करा, फडणवीसांचे पोलीस आयुक्तांना आदेश 

"राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना ज्या ट्विटर हॅण्डलवरुन धमकी आली, त्याची शहानिशा करुन कारवाई करा," असा आदेश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner) विवेक फणसाळकर (Vivek Phansalkar) यांना दिला आहे. शरद पवार यांना धमकी आल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासास्थानी जाऊन भेट घेतली. (वाचा सविस्तर)

मिरारोड प्रकरणातील आरोपी HIV पॉझिटिव्ह; चौकशीतून धक्कादायक खुलासा, पोलीस म्हणतात... 

मृत्यूलाही भीती वाटावी, कुणाच्याही काळजाचा थरकाप उडावा, अशी घटना मुंबईला लागून असलेल्या बुधवारी रात्री मिरारोडमध्ये (Mira Road Crime) घडली. मिरारोडच्या घटनेचा खुलासा झाल्यानंतर अवघा देश हादरला.  मनोजनं तो HIV पॉझिटिव्ह असल्याची माहिती पोलिसांना दिली. यामुळेच त्याच्यात आणि सरस्वतीमध्ये तणाव होता, असंही तो म्हणाला. परंतु, पोलिसांचं म्हणणं आहे की... (वाचा सविस्तर)

दिलासादायक! पुढील तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता, वाचा कोणत्या भागात पडणार पाऊस?

 केरळमध्ये मान्सूनचे (Monsoon) आगमन झाले आहे.  त्यामुळं आता महाराष्ट्रात मान्सूनचे (Maharashtra Monsoon) कधी आगमन होणार? याची वाट शेतकरी बघत आहेत. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया चालली आहेत. अशातच एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आजपासून पुढील तीन दिवस राज्यातील काही भागात मध्यम पावसाची शक्यता  आहे. (वाचा सविस्तर)

कोल्हापुरात इंटरनेट सेवा पूर्ववत, खोळंबलेले व्यवहार पूर्वपदावर येण्यास सुरुवात 

 कोल्हापुरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या राड्यानंतर आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. कोल्हापुरातील इंटरनेट सेवा (Internet Service) आता पूर्ववत झाली आहे. शिवराज्याभिषेक दिनाला कोल्हापूर शहरातील तरुणांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला टिपू सुलतान आणि औरंगजेबाचे फोटो ठेवल्याने मोठा राडा  (Kolhapur Violence) झाला होता. (वाचा सविस्तर)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
Vidhan Sabha Election 2024: निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
मोठी बातमी : निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
Income Tax Raid : माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
Satej Patil : कोल्हापूरचा आत्मा गद्दारीचा नाही, एकदा ठरलं की, करेक्ट कार्यक्रम करायचा म्हटलं की करायचा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
कोल्हापूरचा आत्मा गद्दारीचा नाही, एकदा ठरलं की, करेक्ट कार्यक्रम करायचा म्हटलं की करायचा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 9 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSanjay Raut : 'वर्षा'वरून गुंडांना मदत करण्याचे आदेश - संजय राऊतABP Majha Headlines :  10 AM : 9 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPM Narendra Modi :राहुल गांधींकडून 15 मिनिटं सावरकरांची प्रशंसा करून दाखवावी ; उद्धव ठाकरेंना चॅलेंज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
Vidhan Sabha Election 2024: निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
मोठी बातमी : निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
Income Tax Raid : माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
Satej Patil : कोल्हापूरचा आत्मा गद्दारीचा नाही, एकदा ठरलं की, करेक्ट कार्यक्रम करायचा म्हटलं की करायचा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
कोल्हापूरचा आत्मा गद्दारीचा नाही, एकदा ठरलं की, करेक्ट कार्यक्रम करायचा म्हटलं की करायचा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
हिंगोलीत सुभाष वानखेडेंची ठाकरे गटातून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवायांमुळे कारवाई
हिंगोलीत सुभाष वानखेडेंची ठाकरे गटातून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवायांमुळे कारवाई
BJP Manifesto : भाजपाचं ठरलं! अमित शाहांच्या हाताने जाहीरनामा करणार प्रसिद्ध; मविआच्या पंचसूत्रीनंतर BJP च्या पेटाऱ्यात नेमकं काय?
भाजपाचं ठरलं! अमित शाहांच्या हाताने जाहीरनामा करणार प्रसिद्ध; मविआच्या पंचसूत्रीनंतर BJP च्या पेटाऱ्यात नेमकं काय?
Maharashtra Assembly Elections 2024 : देवळालीत नवा ट्विस्ट, सरोज अहिरे, योगेश घोलपांना निवडणूक आयोगाची नोटीस, नेमकं काय आहे कारण?
देवळालीत नवा ट्विस्ट, सरोज अहिरे, योगेश घोलपांना निवडणूक आयोगाची नोटीस, नेमकं काय आहे कारण?
गंगापूर खुलाताबादचे उमेदवार प्रशांत बंब यांच्या सभेत मोठा गोंधळ; रेल्वेबाबत तरुणांनी प्रश्न विचारल्यामुळे गदारोळ
गंगापूर खुलाताबादचे उमेदवार प्रशांत बंब यांच्या सभेत मोठा गोंधळ; रेल्वेबाबत तरुणांनी प्रश्न विचारल्यामुळे गदारोळ
Embed widget