Gram Panchayat Election Results 2021 | वाशिम जिल्ह्यातील श्रीमंत ग्रामपंचायतींवर कोणाचं वर्चस्व?
Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : वाशिम जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. आज या मतदानाचे निकाल हाती येणार आहेत. बिनविरोध झालेल्या 11 ग्रामपंचायतींसह इतर 41 ग्रामपंचायतींमधील एकूण 252 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी रोजी मतदान प्रकिया पार पडली असून आज मतदानाचे निकाल हाती येणार आहेत. सर्व आमदार खासदार यांनी या निवडणुकीकडे तसं दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे. मात्र मोठ्या ग्रामपंचायतीच्या गावांकडे बारीक लक्ष असल्याचं चित्र आहे. वाशिम जिल्ह्यातील कामारगाव, अनसिंग, शिरपूर जैन, शेलुबाजार या ग्रामपंचायती श्रीमंत असल्याने येथील निवडणूक महत्त्वाची असणार आहे.
सर्व आमदार खासदार यांनी या निवडणुकीकडे तसं दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे. मात्र मोठ्या ग्रामपंचायतीच्या गावांकडे बारीक लक्ष असल्याचं चित्र आहे. वाशिम जिल्ह्यातील कामारगाव, अनसिंग, शिरपूर जैन, शेलुबाजार या ग्रामपंचायती श्रीमंत असल्याने येथील निवडणूक महत्त्वाची असणार आहे.
या ग्रामपंचायत निवडणुकीवर सर्व राजकीय पक्षाने दावे केले असले, तरी मात्र गाव गाड्याची निवडणूक ही स्थानिक मुद्दे आणि गटातटाच असल्यानं कोणत्याच पक्षानं जातीनं लक्ष घातलेलं नाही. मात्र प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी ही निवडणूक महत्वाची असल्याने त्यांचं अस्तित्व सिद्ध करणारी आहे.
बिनविरोध झालेल्या 11 ग्रामपंचायतींसह इतर 41 ग्रामपंचायतींमधील एकूण 252 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरीत 152 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका झाल्या आहेत. जिल्ह्यातील 486 प्रभागांतील 1233 जागांसाठी 539 मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रिया पार पडल्या आहेत. या निवडणुकीत नशीब आजमावत असलेल्या 3192 उमेदवारांच्या राजकीय भविष्याचा फैसला आज लागणाऱ्या निकालानंतर होणार आहे.
तालुक्यातील एकूण ग्रामपंचायतींची संख्या आणि एकूण मतदान केंद्र :
तालुका | ग्रामपंचायतींची संख्या | मतदान केंद्र |
मालेगाव | 28 | 107 |
रिसोड | 32 | 111 |
वाशिम | 19 | 76 |
मंगरूळपीर | 25 | 75 |
कारंजा | 27 | 95 |
मानोरा | 21 | 75 |
एकूण | 152 | 539 |
महत्त्वाच्या इतर बातम्या :
पाहा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीचे कल फक्त एका क्लिकवर 'एबीपी माझा'वर, Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 Live Updates या लाईव्ह ब्लॉगमध्ये, तसेच इतर अपडेट्ससाठी 'एबीपी माझा'च्या फेसबुक पेजला आणि ट्विटर हँडलला भेट द्या.