एक्स्प्लोर

Maharashtra Gram Panchayat Election Results | मनसेची विजयी पताका, 'या' ग्रामपंचायती ताब्यात

Maharashtra Gram Panchayat Election Results : ग्रामपंचायत निवडणुकीत काही ठिकाणी सत्तांतर तर अनेक ठिकाणी स्थानिक युती-आघाड्यांनी वर्चस्व कायम ठेवलं. या सगळ्या धामधुमीत मनसेनेही आपलं अस्तित्त्व दाखवून दिलं आहे.

मुंबई : राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. अनेक ठिकाणी सत्तांतर तर काही ठिकाणी राजकीय पक्षांनी आपला गड राखला आहे. तर अनेक ठिकाणी स्थानिक युती-आघाड्यांनी वर्चस्व कायम ठेवलं आहे. या सगळ्या धामधुमीत मनसेनेही आपलं अस्तित्त्व दाखवून दिलं आहे. ठाणे, बीड, बुलढाणा, अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येकी एक ग्रामपंचायत मनसेने आपल्या ताब्यात घेतली आहे. याशिवाय रत्नागिरीच्या नवशी ग्रामपंचायतीत मनसेने खातं उघडलं आहे. तर उस्मानाबादमधील जळकोट ग्रामपंचायतीत जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांचा विजय झाला आहे.

अंबरनाथमधील काकोळी ग्रामपंचायतीत मनसेचा विजय ग्रामपंचायत निवडणुकीतील स्थानिक पातळीवर युती आघाडी बनते. त्यामुळे राज्य किंवा केंद्रीय स्तरावर एकमेकांचे विरोधक असलेले पक्ष ग्रामपंचायत निवडणुकीत एकत्र लढताना पाहायला मिळतात. अंबरनाथमधील काकोळी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने हातमिळवणी केली होती. मनसेने या युतीच्या पॅनलचा पराभव करत वर्चस्व प्रस्थापित केलं. सात जागांच्या या निवडणुकीत मनसेने चार जागांवर विजय मिळवला. नरेश गायकर, सुरेखा गायकर, रेश्मा गायकर आणि जयश्री गायकर अशी या विजयी उमेदवारांची नावं आहेत.

आपले 'मनसे' अभिनंदन! 💐✌️💐 घासून नाय, तर विरोधकांची ठासून! सरपंच मनसेचा, विकास सर्वांचा! अंबरनाथ मधील काकोळी ग्रामपंचायत मधील ०७ पैकी ०४ सदस्य विजयी! #RajThackeray #MNS #मनसेवृत्तांत Posted by मनसे वृत्तांत अधिकृत on Sunday, 17 January 2021

केजच्या नारेवाडी ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा बीडच्या केज तालुक्यातील नारेवाडी ग्रामपंचायतीवर मनसेने झेंडा फडकावला आहे. या ग्रामपंचायतीमधील सात पैकी पाच जागांवर मनसेच्या सदस्यांचा विजय झाला आहे.

पाथर्डीतील शिरसाठवाडी ग्रामपंचायत मनसेच्या ताब्यात अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गटाने खातं घडललं आहे. शिरसाठवाडी ग्रामपंचायत मनसेच्या ताब्यात गेली आहे. या ग्रामपंचायतीमध्ये एकूण 9 जागा होत्या. या सर्व जागा मनसेच्या अविनाश पालवे पॅनेलने जिंकल्या आहेत.

बुलढाण्यात 25 वर्षांच्या शिवसेनेच्या सत्तेला मनसेकडून ब्रेक बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जिगाव ग्रामपंचायतीमध्ये मनसेचा मोठा विजय झाला आहे. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी जिगाव ग्रामपंचायत मनसेच्या ताब्यात आली आहे. नऊपैकी सात जागांवर मनसेने विजय मिळवला आहे. मनसे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांडेलकर यांचा हा मोठा विजय आहे.

दापोलीतील नवशी ग्रामपंचायतीत मनसेने खातं उघडलं दुसरीकडे रत्नागिरीच्या दापोलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खातं उघडलं आहे. नवशी ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचे उपतालुकाध्यक्ष मिलिंद गोरीवले यांचा विजय झाला आहे.

उस्मानाबादमध्ये मनसेच्या तीन पैकी दोन जिल्हाध्यक्षांना मतदारांनी नाकारलं उस्मानाबादमध्ये मनसेचे तीन जिल्हाध्यक्ष ग्रामपंचायत निवडणुकीत उभे होते. त्यापैकी दोन जणांना ग्रामस्थांनी नाकारलं आहे. इंदापुरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट, तांदुळवाडीतील आबासाहेब ढवळे यांचा पराभव झाला. तर जळकोटमध्ये जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांचा विजय झाला.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक 15 तारखेला मतदान झालेल्या ग्रामपंचायतींच्या 1 लाख 25 हजार 709 जागांसाठी एकूण 3 लाख 56 हजार 221 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. छाननी आणि माघारीनंतर 2 लाख 41 हजार 598 उमेदवार शिल्लक होते. त्यापैकी 26 हजार 718 उमेदवार बिनिविरोध विजयी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अंतिमत: 2 लाख 14 हजार 880 उमेदवार आज प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात होते. त्यासाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळत मतदान झाले.

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 143, पालघर- 3, रायगड- 78, रत्नागिरी- 360, सिंधुदुर्ग- 66, नाशिक- 565, धुळे- 182, जळगाव- 687, नंदुरबार- 64, अहमनगर- 705, पुणे- 649, सोलापूर- 593, सातारा- 652, सांगली- 142, कोल्हापूर- 386, औरंगाबाद- 579, बीड- 111, नांदेड- 1013, परभणी- 498, उस्मानाबाद- 382, जालना- 446, लातूर- 383, हिंगोली- 421, अमरावती- 537, अकोला- 214, यवतमाळ- 925, वाशीम- 152, बुलडाणा- 498, नागपूर- 127, वर्धा- 50, चंद्रपूर- 604, भंडारा- 145, गोंदिया- 181 आणि गडचिरोली- 170. एकूण- 12,711.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Arshdeep Singh : ना बुमराह, ना हार्दिक पांड्या, ICC चा मोठा निर्णय,टी 20 प्लेअर ऑफ द इयर पुरस्कारासाठी अर्शदीपला मानांकन
टी 20 प्लेअर ऑफ द इयरसाठी बुमराह, हार्दिक पांड्या यांना मानांकन न देता अर्शदीपचं नाव, सर्वजण थक्क
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
WTC 2025 Final:दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Meet CM Devendra Fadnavis : प्राजक्ता माळीनं घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेटNavi Mumbai Airport :  काय आहेत नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्ये ?Ethiopian Airlines Accidents : इथिओपियात विमान दुर्घटनाग्रस्त, 157 ठारABP Majha Marathi News Headlines 10PM TOP Headlines 10 PM 29 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arshdeep Singh : ना बुमराह, ना हार्दिक पांड्या, ICC चा मोठा निर्णय,टी 20 प्लेअर ऑफ द इयर पुरस्कारासाठी अर्शदीपला मानांकन
टी 20 प्लेअर ऑफ द इयरसाठी बुमराह, हार्दिक पांड्या यांना मानांकन न देता अर्शदीपचं नाव, सर्वजण थक्क
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
WTC 2025 Final:दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
सेबीनं 15000 वेबसाइटस अन् सोशल मीडिया स्टार्सवर बंदी घालत दिला दणका, शेअर मार्केट गुतवणुकीबाबत चुकीचा सल्ला देणं भोवलं
शेअर मार्केट गुंतवणूक सल्ला देणाऱ्या वेबसाइट अन् सोशल मीडिया स्टार्सवर सेबीची बंदी, नेमकं काय घडलं?
ना भारत, ना ऑस्ट्रेलिया, अशी एक शक्यता तिसराच संघ WTC फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार? जाणून घ्या समीकरण
ना भारत, ना ऑस्ट्रेलिया, अशी एक शक्यता तिसराच संघ WTC फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार? जाणून घ्या समीकरण
5 लाखात बांगलादेशी नागरिकास बनवायचा भारतीय, बनावट पासपोर्टद्वारे पाठवायचा परदेशात; कसं फुटलं बिंग?
5 लाखात बांगलादेशी नागरिकास बनवायचा भारतीय, बनावट पासपोर्टद्वारे पाठवायचा परदेशात; कसं फुटलं बिंग?
Kalyan Crime : कल्याण अत्याचार व हत्या प्रकरणात सरकारकडून नियुक्ती होताच उज्वल निकम म्हणाले, ताबडतोब शिक्षा होणं...
कल्याणच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार व हत्या प्रकरणात उज्वल निकम बाजू मांडणार, मुख्यमंत्र्यांकडून नियुक्तीचा फोन
Embed widget