एक्स्प्लोर

Gram Panchayat Election 2022 : कुठे सासू-सून तर कुठे जिवलग मैत्रिणी एकमेकींविरोधात; थेट सरपंचपदासाठी सार्वत्रिक निवडणूक

Maharashtra Gram Panchayat Election 2022 : राज्यातील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या (Sarpanch Election) सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

Gram Panchayat Election 2022 Live Updates : राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी आज, 18 डिसेंबर रोजी मतदान (Gram Panchayat Voting) होणार आहे.  या निवडणुकीचा निकाल  20 डिसेंबर रोजी लागणार आहे. गावगाड्यात गेल्या काही दिवसांपासून मतदारांची प्रत्यक्ष भेट होत नसेल तर फोन, मेसेजद्वारे मतदारापर्यंत भूमिका पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू होता. सर्वच प्रकारे उमेदवारांनी मतदारांजवळ जाण्यासाठी कस लावला. आता आज प्रत्यक्ष मतदानाची रणधुमाळी असणार आहे.  

गोंदियात सासू विरोधात सून मैदानात

सासू आणि सुनेमध्ये वर्चस्वाची लढाई नेहमीच पाहायला मिळते. पण गोंदियामध्ये सरपंच बनण्यासाठी सासू-सुनेमध्ये थेट लढत होत आहे. गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील बोदरा देऊळगाव ग्रामपंचायतीमध्ये ही अनोखी लढत पाहायला मिळत आहे. सासू-सुना ग्रामपंचायत निवडणुकीत एकमेकींसमोर उभ्या ठाकल्याने ही लढत अतिशय रंगतदार झाली आहे. 

भंडाऱ्यात 'जाऊ बाई जोरात..

भंडारा जिल्ह्यात दोन जाऊबाईंमधील लढत चर्चेत आहे. भंडारा जिल्ह्यातील आमगाव दिघोरी येथे सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दोन जाऊबाई सरपंच पदाकरिता एकमेकींच्या विरोधात निवडणूक लढत आहेत. मोठी जाऊबाई वीणा नागदेवे आणि लहान जाऊबाई पायल नागदेवे या दोन जाऊबाई एकमेकींविरोधात ग्रामपंचायत निवडणूक लढवत आहेत. या दोघी एकाच घरातील सून असल्याने त्यांच्या आप्तेष्टांसह गावातील मित्र परिवारामध्येही या दोघींपैकी कुणाला मत द्यायचे हा संभ्रम आता निर्माण झाला आहे. दोन पैकी कोणतीही सून निवडून आली तरी, गावाची सरपंच ही सूनच बनणार असल्याचा विश्वास सासूने व्यक्त केला आहे.

दोघींचं नावही एकच अन् गावही एकच

राज्यभरात आज ग्रामपंचायत निवडणुकांची (Grampanchayat Election) रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यात 196 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडणार आहे. यातील सामनगाव ग्रामपंचायत (Samangaon) चर्चेत येऊ लागली आहे. एकाच नावाच्या दोन महिला उमेदवार सरपंच पदाच्या (Sarpanch) शर्यतीत आहेत. सामनगाव ग्रामपंचायत चर्चेचा विषय ठरत आहे. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी दोन महिला उभ्या असून दोघींचे नाव, आडनावे सेम टू सेम असल्याचे मतदारांचा गोंधळ तर होणार नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

दोघीही जिवलग मैत्रिणी, पतींची नावं आणि आडनावंही सारखीच

भंडारा (Bhandara Gram Panchayat Election) जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील ओपारा ग्रामपंचायतीत एक आगळीवेगळी निवडणूक होत आहे. या गावातील सरपंचपदासाठी दोन जिवलग मैत्रिणी आता एकमेकांविरोधात उभ्या ठाकल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या पतीचं नाव आणि आडनाव एकच आहे. रश्मी राहुल राऊत आणि पल्लवी राहुल राऊत असे त्या जिवलग मैत्रिणींची नावे आहेत. 

7751 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक

अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदुर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751. 

निवडणुकीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावातील मतदान केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निवडणुकीत कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून हजारो पोलीस कर्मचारी गावागावामध्ये तैनात करण्यात आले आहेत. तर संवेदनशील असलेल्या गावांमध्ये अधिक फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. हजारोंच्या संख्येने अधिकारी आणि कर्मचारी देखील मतदान यंत्रणेमध्ये आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget