एक्स्प्लोर
'नीट'विरोधात सरकार सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार

मुंबई : मेडिकल प्रवेशासाठी राज्यस्तरीय सीईटी रद्द करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. देशभरातील सर्व मेडिकल कॉलेजमधील प्रवेशासाठी फक्त एकच 'नीट' परीक्षा घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. मात्र, 5 मेला महाराष्ट्रात होणारी सीईटीची परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं शिक्षण विभागानं स्पष्ट केलं आहे. नीट परीक्षेच्या बंधनातून महाराष्ट्राला कायमचं वगळण्यात यावं किंवा किमान पुढील 2 वर्षांसाठी सीईटी घेण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी राज्य सरकार सुप्रीम कोर्टाला करणार आहे. तयारी नसताना ऐनवेळी राज्यातील विद्यार्थ्यांना नीटची परीक्षा द्यावी लागू नये, म्हणून राज्य सरकारनं ही भूमिका घेतल्याचं समजतं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग























