एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
SEBC च्या विद्यार्थांना दिलासा, प्रवेशादरम्यान जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत वाढ
मराठा समाजातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याने त्यांना मराठा आरक्षणापासून वंचित राहावं लागत आहे.
मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. प्रवेशादरम्यान जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सक्ती नसून वाढीव मुदत दिली जाणार आहे, अशी घोषणा उच्चतंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांचा औचित्याचा मुद्दा केला. मराठा समाजातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याने त्यांना मराठा आरक्षणापासून वंचित राहावं लागत आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र मिळेपर्यंत व्हेरिफिकेशन टोकन नंबर ग्राह्य धरले जावे, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. तर
अजित पवारांनी हा मुद्दा इतरही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ग्राह्य धरला जावा अशी मागणी केली.
यानंतर विनोद तावडे यांनी प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती करणार नसून वाढीव मुदत देणार असल्याचं सांगितलं.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांची आज प्रवेश नियंत्रण समितीच्या अध्यक्षांसोबत बैठक झाली. या बैठकीला उच्च तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत ज्या एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे, त्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती केली जाणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
SEBC Students | एसईबीसीच्या विध्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी वाढीव मुदत | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
मुंबई
करमणूक
राजकारण
Advertisement