एक्स्प्लोर

हिंदी संदर्भातील शासनाचे दोन्ही निर्णय रद्द, राज्य सरकारची मोठी घोषणा, डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. 

Mumbai: राज्यभरात  हिंदी सक्तीवरून आणि त्रिभाषा सुत्रावरून वाद उफाळलेला असताना हिंदी सक्ती बाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात आले आहेत . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हिंदी सक्ती बाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याचा  आम्ही निर्णय घेतला आहे. 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 हे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत सांगितलं . यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एक नव्याने समिती तयार करण्यात येईल .  त्रिभाषा सूत्रसंदर्भातील सगळं सूत्र माशेलकर समिती अभ्यासेल .त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हिताचं जे असेल ते सूत्र राज्य सरकार स्वीकारेल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले . आमच्याकरता मराठी आणि मराठी विद्यार्थी  महत्त्वाचा .आमची नीतीही विद्यार्थी केंद्रित असेल .यात आम्हाला कोणत्याही प्रकारचा राजकारण करायचं नाही . असेही त्यांनी सांगितले .

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

आजच्या अधिवेशनाच्या या पूर्वसंध्येला आम्ही विरोधी पक्षाला चहापानासाठी बोलवलं होतं. परंतु नेहमीच्या पद्धतीने विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकला आहे.  हा बहिष्कार टाकताना त्यांनी एक भलं मोठं पत्र दिलं आहे. पत्र मोठा असला तरी मजकूर फार नाही .मागच्या पत्रातीलच मुद्दे मोठ्या अक्षरात दिले आहेत .एक दोन नवीन विषय आहेत . मराठीचा विषय अत्यंत महत्त्वाचा असल्याने विरोधकांच्या पत्रामध्ये व्याकरणाच्या 24 चुका आहेत . आजच्या पत्रावर भास्कर जाधव यांचे सही दिसत नाही . सह्यांमध्ये पाच तीन दोन झालं वडेट्टीवार आज पत्रकार परिषदेत असं म्हणाले की आमच्या कामांना स्थगिती मिळाली .त्यांना अजूनही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत असं वाटतंय .  

हिंदी विषयावरून काय काय झालं?

काल राज्यामध्ये आम्ही मराठी अनिवार्य केलं .हिंदी ऑप्शनल केलं . कोणतीही भारतीय भाषा शिकता येईल हा निर्णय आम्ही घेतला आहे .पण झोपलेल्याला उठवता येतं झोपेचा सोंग घेणाऱ्याला उठवता येत नाही . 
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आधी कर्नाटकन लागू केलं . मध्यप्रदेश तेलंगणा नंतर उत्तर प्रदेशनं . 21 सप्टेंबर 2020 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे शैक्षणिक धोरण कशाप्रकारे लागू करायचं याविषयीची तज्ञ समिती नियुक्त केली होती . 16 ऑक्टोबरला त्याचा जीआर  निघाला . नामवंत शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर  यांच्या अध्यक्षतेखाली 18 लोकांची समिती नेमण्यात आली . यात अनेक विद्यापीठांचे कुलगुरू तसेच माजी कुलगुरू होते . 14 सप्टेंबर 2021 ला या समितीने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना 101 पानांचा अहवाल सादर केला . हा अहवाल स्वीकारताना उद्धवजी दिसतात .या अहवालाच्या आठव्या प्रकरणात भाषेचा मुद्दा आला आहे . 

उद्धव ठाकरेंची अहवालावर सही

इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्गापासून लागू करण्यात यावी अशी शिफारस यात करण्यात आली होती .पहिली ते बारावी विद्यार्थी इंग्रजी शिकतील तर त्यांना इंग्रजी भाषेची जाण येईल .आवश्यक पुस्तके वाचता येतील .यामुळे वैद्यकीय व अन्य तांत्रिक व्यवसायिक अभ्यासक्रमांसाठी ते सज्ज असतील . मराठी शिकवण्याला प्राधान्य द्यावेच लागेल पण त्याचवेळी इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासून बारावीपर्यंत सक्तीची करण्यात यावी. .गरजेचे असल्यास पदवी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या व चौथ्या वर्षातही या भाषा सक्तीच्या करण्यात याव्यात अशी शिफारस करण्यात आली .उद्धवजींनी नेमलेल्या समितीत जे उबाठा  सेनेचे उपनेते आहेत त्यांनी केलेली ही शिफारस. 

या अहवालावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सही आहे .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सहीचा कागदही दाखवला . यात कुठेही हा अहवाल स्वीकारताना त्रिअहवाल सूत्र बाजूला ठेवा . हे आम्हाला मान्य नाही .असे काहीही म्हटलेले नाही .  माशेलकर समितीच्या अहवालांवर एक समिती नेमली ती अंमलबजावणीसाठी .यातून येणाऱ्या अहवालांवरून नवे जीआर आले .16 एप्रिल 2025 ला पहिला जीआर काढला . यात मराठी सक्तीची आहे .दुसरी भाषा इंग्रजी आणि तिसरी भाषा हिंदी म्हटली आहे . त्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर हजी यार बदलून कोणतीही भारतीय भाषा ही तिसरी भाषा म्हणून निवडता येईल असे नमूद केले . असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

 

 

महत्त्वाच्या बातम्या

पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget