एक्स्प्लोर

शैक्षणिक संस्थांचालकांपुढे शासनाची शरणागती

महाराष्ट्र शासनाने संस्थाचालकांच्या दबावापुढे शरणागती पत्करत स्वतःचे निर्णय मागे घेत शिक्षक भरती प्रक्रियेत पुन्हा संस्थाचालकांनाच निवडीचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे शासनाच्या मूळ हेतूला हरताळ फासण्याचे काम शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

परभणी : शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता येऊन संस्थाचालकांच्या मनमानीला वेसण घालण्यासाठी शासन स्तरावर कठोर निर्णय घेण्यात आले होते, परंतु महाराष्ट्र शासनाने संस्थाचालकांच्या दबावापुढे शरणागती पत्करत स्वतःचे निर्णय मागे घेत शिक्षक भरती प्रक्रियेत पुन्हा संस्थाचालकांनाच निवडीचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे शासनाच्या मूळ हेतूला हरताळ फासण्याचे काम शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. परिणामी राज्यातील लाखो पात्र भावी शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिक्षक भरतीत होणारी संस्थाचालकांची मनमानी मोडून काढण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने आगामी भरती प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक व गुणवत्ताधारक पात्र उमेदवारांना न्याय देण्याच्या दृष्टीने 'पवित्र' प्रणालीद्वारे करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात नागपूरच्या 12 संस्थाचालकांनी न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे शिक्षकभरती रखडली. अखेर न्यायालयाने खासगी शाळांमधील निवड प्रक्रियेत राज्य शासन, खासगी व्यक्ती यांना हस्तक्षेप करता येणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर काल राज्याच्या शिक्षण विभागाने नवीन निर्णय घोषित केला आहे. शासनाने जाहीर केलेल्या नव्या निर्णयामध्ये भरती प्रक्रियेत प्रत्येक रिक्त जागेकरिता एकास 10 या गुणोत्तराप्रमाणे पात्र उमेदवारांची यादी खासगी व्यवस्थापनांच्या लॉगइन वर मुलाखतीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामधून निवडीचे संपूर्ण अधिकार पुन्हा एकदा संस्थाचालकांनाच दिल्याने संस्थाचालकांचे फावले आहे. दरम्यान शिक्षण विभाग मात्र तोंडावर पडला आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील तथाकथित भ्रष्टाचार पुन्हा जैसे थे राहण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यातच सरकारला जर विद्यार्थ्यांचे हित साधायचे असेल तर कोर्टाच्या निर्णयानुसार काम होणे अपेक्षित आहे. परंतु निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे सर्व होत आहे. कारण बिंदूनामावली तपासणे एका महिन्यात शक्य नाही. बिंदूनामावली तपासण्याचे काम सुरु झाल्यानंतर ते काम पूर्ण होण्याअगोदर आचारसंहिता लागू होते. त्यामुळे या जागा शिल्लक राहतील. यामध्ये विविध आरक्षणांचा विषयदेखील येणार आहे. या सर्व प्रक्रियेतून रिक्त जागेचा अहवाल 'पवित्र' पोर्टलवर टाकावा लागेल. असे मत संस्थाचालक संघटनेचे विभागीय अध्यक्ष रामदास पवार यांनी व्यक्त केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Vijay Wadettiwar : जो-जो मोदींच्या, चोर ज्ञानेश कुमारच्या विरोधात आंदोलन करेल, त्या सर्वांना आमचा पाठिंबा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, म्हणाले, होळीपर्यंत महायुतीचे सरकार नष्ट होईल
जो-जो मोदींच्या, चोर ज्ञानेश कुमारच्या विरोधात आंदोलन करेल, त्या सर्वांना आमचा पाठिंबा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, म्हणाले, होळीपर्यंत महायुतीचे सरकार नष्ट होईल
किलोला 500 रुपये मिळवून देणारा हुरडा यंदा करपला! संभाजीनगरच्या 2 गावातल्या 14 कोटींच्या उलाढालीवर दुष्काळ संकट
किलोला 500 रुपये मिळवून देणारा हुरडा यंदा करपला! संभाजीनगरच्या 2 गावातल्या 14 कोटींच्या उलाढालीवर दुष्काळ संकट
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Yuzvendra Chahal: 'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
Amravati Teacher Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
Pune News: पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
Malegaon Crime News : डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
Who is Manarah Al Nahyan: तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
Pradeep Purnekar Thane Crime: प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
Embed widget