मोठी बातमी! ओबीसी आणि EWS मधील मुलींची संपूर्ण फी सरकार भरणार, मराठा उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
आता ओबीसी आणि EWS प्रवर्गातील मुलींची शैक्षणिक फी आता राज्य सरकार भरणार असल्याचा निर्णय मराठा उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
मुंबई : मराठा उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. आता ओबीसी (OBC) आणि ईडब्लूएस (EWS) प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांची संपूर्ण फी आता राज्य सरकारच भरणार आहे. आतापर्यंत एससी आणि एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांची फी सरकारतर्फे भरण्यात येत होती. पण आता ओबीसी आणि EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांची फि देखील सरकार भरणार आहे. मराठा उपसमितीच्या बैठकित महत्वाचा निर्णय झाला. दरम्यान हा निर्णय पुढे राज्यमंत्री मंडळाकडे पाठवणार असल्याची माहिती उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
नांदेडमधील विद्यार्थिनीने फी भरण्यासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे आत्महत्या केली. त्यानंतर ही बाब सरकारच्या निर्दशनास आल्याचं सांगण्यात आलं आहे. या मुलीकजे 50 टक्के फी भरण्यासाठी देखील पैसे नव्हते. त्यामुळे उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील याबाबत सूचना केली. दरम्यान 642 कोर्सेससाठी एक हजार कोटीची नव्याने तरतूद देखील करण्यात येणार आहे.
फक्त मुलींची फी सरकार भरणार
सध्या तरी ओबीसी आणि EWS प्रवर्गातील मुलींची फी भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांची फी सरकार भरणार नाही. दरम्यान यामुळे मुलींच्या शिक्षणाला देखील चालना मिळण्यास मदत होणार असल्याचं सागंण्यात येत आहे. त्यामुळे या निर्णयामुळे या प्रवर्गातील मुलींना कितपत फायदा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
विद्यार्थिनीची आत्महत्या
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यात सोमेश्वर गावातील 9 वीत विध्यार्थीने आत्महत्या केली आहे. कोमल तुकाराम बोकारे असे तरुणीचे नाव आहे. इयत्ता 9 शिकणाऱ्या कोमल हिने स्वतःचा घरात चिठ्ठी लिहून गळफास घेत आत्महत्या केली आहे. मराठा समाजाला आरक्षण लवकर द्यावे, माझा बलिदान व्यर्थ जाऊ नये, आई अण्णा मला माफ करा, असे कोमलने सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले आहे. नांदेड जिल्ह्यातील मराठा आरक्षणासाठी ही पाचवी आत्महत्या आहे.
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या कोमलचे वडील हे अल्पभूधारक शेतकरी आहे. फक्त एक एकर शेती आहे. घरात एकुण पाच मुली आहे. दरम्यान, शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कोमलचे वडील करत आहे. अशात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोमलने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याने बोकारे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळला आहे.