शासकीय भरती परीक्षा आता टीसीएस, आयबीपीएस, एमकेसीएलकडूनच घेतल्या जाणार, शासन निर्णय जारी
शासकीय पद भरती साठी परीक्षा देणाऱ्या कंपन्यांचे पॅनल डिसेंबर 2020 रोजी उच्चाधिकार समितीची मंजुरी घेऊन मार्च 2021 मध्ये शासन निर्णय निर्गमित करुन कंपन्यांची निवड करण्यात आली होती.

मुंबई : शासकीय पद भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी याआधी निवडण्यात आलेल्या कंपन्यांच्या पॅनलला स्थगित देण्याबाबतचा शासन निर्णय आज सामान्य प्रशासन विभागाकडून जारी करण्यात आला आहे. शासकीय पद भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी सध्या असलेल्या कंपन्यांचे पॅनल स्थगित करण्यात आले असून पुढील पद भरतीसाठी होणाऱ्या परीक्षा टीसीएस ,आयबीपीएस एमकेसीएल यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत आणि त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना शासन निर्णयात देण्यात आले आहेत.
शासकीय पद भरती साठी परीक्षा देणाऱ्या कंपन्यांचे पॅनल डिसेंबर 2020 रोजी उच्चाधिकार समितीची मंजुरी घेऊन मार्च 2021 मध्ये शासन निर्णय निर्गमित करुन कंपन्यांची निवड करण्यात आली होती. परंतु निवडलेल्या कंपन्यांमार्फत सुरू असलेल्या परीक्षा पद्धतीबाबत विविध तक्रारी प्राप्त झाल्यामुळे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात या कंपन्यांविरोधात तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या होत्या. तसेच पेपर फुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर निवडलेल्या कंपन्यांबाबत राज्य सरकारने बैठक घेऊन फेरविचार केला त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला
राज्यात शासकीय भरतीसाठी विविध विभागाच्या परीक्षा याआधी निवडलेल्या पाच कंपनीमार्फत घेतल्या जात होत्या. त्यामध्ये टीईटी ,एमआयडीसी ,आरोग्यभरती, म्हाडा सारख्या परीक्षांमध्ये गैरप्रकार समोर येत असताना आता या कंपन्यांना स्थगिती देऊन टीसीएस, आयबीपीएस एमकेसीएल च्या माध्यमातून पुढील परीक्षा घेण्यात येणार आहेत.
हे देखील वाचा-
- Infosys Recruitment 2022 : IT इंडस्ट्रीमध्ये नोकरी शोधताय? मग 'ही' संधी सोडू नका, इन्फोसिसमध्ये 55 हजार लोकांची भरती
- SEBI Recruitment 2022 : सेबीमध्ये मोठी भरती; लगेचच अर्ज करा, संधी सोडू नका
-
Job Majha : पुणे महानगरपालिका आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी येथे नोकरीची संधी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
