एक्स्प्लोर
Advertisement
पेढ्यांची ऑर्डर दिली आहे, लवकरच गोड बातमी मिळेल : संजय राऊत
सत्तास्थापनेसंबंधीचे दोन महत्त्वाचे टप्पे पार पडल्यानंतर माध्यमांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी बातचित केली. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी राऊत यांना विचारले की, राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा कधीपर्यंत सुटेल? राज्याला गोड बातमी कधी मिळेल? यावर राऊत यांनी खुमासदार उत्तर दिले.
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा आता सुटेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण गेल्या काही तासांत सत्तास्थापनेसंबंधीचे महत्त्वाचे टप्पे पार झाल्याची माहिती मिळाली आहे. महाशिवआघाडीला सुरुवातीपासून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचा विरोध होता. परंतु सोनिया गांधींनी महाशिवआघाडीला हिरवा कंदील दिल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान गेल्या तीन तासांपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये एक महत्त्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत एकमत झाल्याचे बोलले जात आहे.
या दोन महत्त्वाच्या बातम्या समोर आल्यानंतर माध्यमांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी बातचित केली. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी राऊत यांना विचारले की, राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा कधीपर्यंत सुटेल? राज्याला गोड बातमी कधी मिळेल? त्यावर संजय राऊत म्हणाले की, पेढ्यांची ऑर्डर दिली आहे असं समजा, लवकरच गोड बातमी मिळेल.
संजय राऊत म्हणाले की, राज्यात सत्तास्थापनेचा कोणताही तिढा नाही. तिढा तेव्हा असतो जेव्हा काहीही हालचाली घडत नाहीत, कोणालाही परिस्थिती सुधारण्याची इच्छा नसते. परंतु राज्यातील राष्ट्रपती राजवट दूर व्हावी, राज्याला एक चांगलं सरकार मिळावं, यासाठी आम्ही सगळेच जण प्रयत्न करत आहोत.
संजय राऊत म्हणाले की, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते की, राज्याला गोड बातमी देऊ. परंतु ते गोड बातमी देऊ शकले नाहीत. त्यामुळे राज्याला गोड बातमी देण्याची जबाबदारी शिवसेनेवर येऊन पडली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच ती गोड बातमी देतील. आम्ही पेढ्यांची ऑर्डर दिली आहे, असं समजा.
पाहा काय म्हणाले संजय राऊत?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement