एक्स्प्लोर

मोठी बातमी : राज्य सरकारी कर्मचारी मालामाल, महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ, कधीपासून लागू होणार? तारीख ठरली!

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ (DA Hike) केली आहे.

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ (DA Hike) केली आहे. राज्य सरकारने चार टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महागाई भत्ता आता 42 टक्क्यावरुन आता 46 टक्के करण्यात आला आहे. एक जुलै 2023 पासुनची महागाई भत्त्याची थकबाकीही मिळणार आहे.  राज्य सरकारकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय.

मागील अनेक दिवसांपासून महागाई भत्ता वाढवण्याची मागणी करण्यात येत होती. वर्षातून दोन वेळा महागाई भत्ता वाढवला जातो. आज अर्थ विभागाने शासन निर्णय काढून महागाई भत्ता वाढवण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. याआधी 30 जून 2023 रोजी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली होती. 

राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णायात नेमकं काय म्हटलेय ?

राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. शासन असे आदेश देत आहे की, दिनांक 1 जुलै, 2023 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 42 % वरुन 46 % करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 जुलै, 2023 ते दिनांक 31 ऑक्टोबर, 2023 या कालावधीतील थकबाकीसह नोव्हेंबर, 2023 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.

महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदात्रातून भागविण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार? अंमलबजावणी कधीपासून?
केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार?
Saif Ali Khan Attacker First Footage: हाच 'तो', यानंच सैफ अली खानला भोसकलं; सैफिनाच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्याचा VIDEO समोर!
हाच 'तो', यानंच सैफ अली खानला भोसकलं; सैफिनाच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्याचा VIDEO समोर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 17 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सKolhapur Crime CCTV : कोल्हापुरात मद्यधुंद तरुणांची दहशत, चालत्या बसवर फेकला मोठा दगडNigerian Arrested: टीप मिळताच पोलिसांनी सापळा रचला, MD ड्रग्जसह नायजेरियनला अटकABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 17 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार? अंमलबजावणी कधीपासून?
केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार?
Saif Ali Khan Attacker First Footage: हाच 'तो', यानंच सैफ अली खानला भोसकलं; सैफिनाच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्याचा VIDEO समोर!
हाच 'तो', यानंच सैफ अली खानला भोसकलं; सैफिनाच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्याचा VIDEO समोर!
RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Saif Ali Khan Stabbing Incident:
"आपको क्या चाहीये?... 1 करोड... जेहच्या रुममध्ये घुसून त्यानं पैसे मागितले"; सैफवर हल्ला झाला 'त्या' रात्री काय-काय घडलं?
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
Embed widget