एक्स्प्लोर

राज्यातील होमगार्ड्सची दिवाळी गोड, मानधनात जवळपास दुप्पटीने वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय!

राज्य सरकारने होमगार्डसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने होमगार्डच्या मानधनात जवळपास दुप्पट वाढ केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा 40 हजार होमगार्ड्सना फायदा होणार आहे.

मुंबई :  राज्य सरकारकडून अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. सरकारन कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरण करण्यास सुरुवात केली आहे. राज्य मंत्रिमंडळात यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी सरकारने पहिल्या टप्प्यात सुमारे 2 हजार 399 कोटी रुपयांच्या वाटपाला मंजुरी दिली आहे. त्यानंतर आता राज्याची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या होमगार्ड्संदर्भातही सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने होमगार्डच्या मानधानात जवळपास थेट दुप्पट वाढ केली आहे. म्हणजेच होमगार्ड्सना मिळणारा पगार आता थेट दुप्पट झाला आहे. त्यासाठी सरकारने 795 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. 

सरकारने नेमका काय निर्णय घेतला आहे? 

मिळालेल्या ताज्या माहितीनुसार राज्यातील होमगार्ड्सच्या भत्त्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय आज (1 ऑक्टोबर) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयाचा लाभ जवळपास चाळीस हजार होमगार्ड्सना होणार आहे. सध्या या होमगार्ड्सना कर्तव्य भत्ता म्हणून दररोज 570 रुपये मिळतात. सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता हाच कर्तव्यभत्ता आता तेट 1 हजार 83 रुपये करण्यात येईल. याशिवाय उपहार भत्ता दोनशे रुपये, कवायत भत्ता 180 रुपये, खिसा भत्ता शंभर रुपये, भोजन भत्ता 250 रुपये अशी जवळपास दुपटीने वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने 795 कोटी रुपयांची मान्यता दिली आहे. 

अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड, सरकारकडून मानधनात भरीव वाढ

राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांचीही दिवाळी गोड केली आहे. सरकारने अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांच्या मानधानत भरगोस वाढ केली आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांच्या मानधात जवळपास 50 टक्क्यांनी वाढ केलेली आहे. या निर्णयानंतर आता अंगणवाडी मदतनीस यांना प्रतिमहिना 3000 हजार रुपये अतिरिक्त मानधन मिळणार आहे. अंगणवाडी सेविकांना मानधनाच्या रुपात 10 हजार रुपये मिळायचे. आता या मानधनात 5000 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. याआधी सरकारने मानधनात 3000 रुपयांची वाढ केली होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या सेविकांना इन्सेंटिव्हदेखील मिळणार आहे. 

हेही वाचा :

Anganwadi Workers : अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मानधनाबाबत मोठा निर्णय

राज्यात शिक्षक पदांची निर्मित्ती, कोतवालांचं मानधन वाढवलं; मंत्रिमंडळ बैठकीत 38 मोठे निर्णय

उदयनराजे भोसले यांच्या सरंजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंशपरंपरेने त्यांच्या वारसांना, मंत्रिमंडळ बैठकीत 15 मोठे निर्णय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 9 PM : 23 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 23 December 2024 ABP MajhaVinod Kambli Health : विनोद कांबळी भिवंडीतल्या आकृती रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरूMaharashtra : लाडकी बहीण योजनेबाबत चिंता; राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आढावा अहवाल RBI कडून प्रसिद्ध

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
Kalyan : बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
Mhada Lottery 2024: मुंबईकरांना गुडन्यूज! म्हाडाच्या 2264 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आणखी एक संधी
मुंबईकरांना गुडन्यूज! म्हाडाच्या 2264 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आणखी एक संधी
Shukra Gochar : 2025 मध्ये शुक्राचा उच्च राशीत प्रवेश; 3 राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
2025 मध्ये शुक्राचा उच्च राशीत प्रवेश; 3 राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Embed widget