एक्स्प्लोर
Advertisement
Hingoli Rain : हिंगोलीत पावसाचा जोर वाढला, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Hingoli : हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असून सद्यस्थितीत नद्या, नाले, ओढे भरुन वाहत आहेत.
Hingoli Rain Update : मराठवाड्यासह राज्यात पावसाचे (Rain) वातावरण तयार होत आहे. दरम्यान अनेक ठिकाणी अतिवृष्टी होतांना पाहायला मिळत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी शाळांना सुट्या देण्यात आल्या आहेत. दरम्यान हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असून सद्यस्थितीत नद्या, नाले, ओढे भरुन वाहत आहेत. यामुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे यांनी हे आवाहन केले आहे.
प्रशासनाने केलेलं आवाहन...
- गावात पुरस्थिती निर्माण झाल्यास अथवा होण्याची शक्यता असल्यास घरातील घरातील उपयुक्त सामान, महत्वाची कागदपत्रे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवा, विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद करावा.
- गावात अचानक पूरस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ तहसील, पोलीस, नगरपालिका प्रशासनास कळवावे.
- गावात, घरात जंतुनाशक असतील तर ते पाण्यात विरघळणार नाहीत याची दक्षता घ्या.
- पूर स्थितीत उंच ठिकाणी जावे तसेच जाते वेळी सोबत रेडिओ, टॉर्च, सुके खाण्याचे पदार्थ, पिण्याचे पाणी सोबत ठेवावे, शक्य असल्यास घरातील वाहने उंच ठिकाणी हलवावेत. घर सोडून जाताना दारे, खिडक्या सर्व घट्ट बंद करुन जावे.
- पूर स्थिती असेपर्यंत पाळीव प्राणी, जनावरे उंच ठिकाणी बांधण्यात यावीत. चुकूनही पाळीव प्राणी , इतर जनावरे यांना नदी काठी, ओढ्या काठी बांधू नये.
- कुटुंबातील सर्व व्यक्तींकडे ओळखपत्र राहील याची काळजी घ्या.
- पुरामध्ये अडचणीत सापडला असाल तर आजूबाजूच्या साधनांचा वापर करा. (उदा. पाण्यावर तरंगणारे मोठे लाकूड, प्लास्टिकचे ड्रम याचा वापर करा), कोणी व्यक्ती वाहत जात असेल तर दोरीच्या सहाय्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा, पूर स्थितीत घाबरून जाऊ नका, प्रशासनांच्या सुचनांचे पालन करा.
काय करु नये :
- पूर असलेल्या भागात, नदीच्या पुलावर विनाकारण भटकू नका.
- पुराच्या पाण्यात चुकुनही जावू नका, तसेच पुर आल्यानंतर पुलावरुन गाडी घालण्याचा, अथवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करु नका.
- दुषित,उघड्यावरील अन्न-पाणी टाळा. शक्यतो उकळलेले पाणी व सुरक्षित अन्न सेवन करा.
- सुरक्षित ठिकाणी रहा व विद्युत् तारांना स्पर्श करु नका.
- पोहता येत असेल तरच बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवा परंतु अपरीचीत व खोल पाण्यात जाऊ नका.
- पूर परिस्थितीत नदी, नाले, पूल, धरण इत्यादी ठिकाणी विनाकारण गर्दी करु नका, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे यांनी केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Hingoli Rain Update : हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 71.30 मिमी पावसाची नोंद; पहिल्यांदाच कयाधू नदीला पूर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
छत्रपती संभाजी नगर
Advertisement