एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Maratha Reservation : मराठा आरक्षण कसं टिकवणार? नव्या महायुती सरकारपुढे सर्वात मोठं आव्हान

Maratha Reservation : देवेंद्र फडणवीस या आधी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं होतं. मात्र कायद्याच्या कसोटीवर ते टिकलं नाही आणि न्यायालयाने तो आदेश रद्द केला होता. 

मुंबई : राज्यात आता महायुतीचे सरकार स्थापन होणार आणि भाजपकडे मुख्यमंत्रिपद जाणार हे जवळपास निश्चित झालं आहे. भाजपमधून देवेंद्र फडणवीसांनाच मुख्यमंत्रिपदाची संधी मिळणार हीदेखील खात्रीलायक माहिती आहे. नव्या सरकारसमोर रोजगार निर्मिती, राज्याचा आर्थिक गाडा सुरळीत आणणे यासह अनेक आव्हानं असणार आहेत. राज्यापुढील सामाजिक आव्हानांपैकी सर्वात मोठं आव्हान असेल ते म्हणजे मराठा आरक्षण टिकवणार कसं? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना दिलेलं 10 टक्के आरक्षण टिकवण्यासाठी नव्या सरकारला आता प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण या आधीही मराठा आरक्षणाला आव्हान देण्यात आलं होतं आणि न्यायालयाने तो आदेश रद्द केला होता. 

मराठा आरक्षण कसं टिकवणार?

महायुतीच्या नव्या सरकारची सर्वाधिक कसोटी लागणार आहे ती मराठा आरक्षण टिकवण्यासाठी. कारण फेब्रुवारी 2024 मध्ये SEBC अंतर्गत मराठा समाजाला राज्य सरकारनं 10 टक्के आरक्षण दिलं. त्यानंतर लगेचच म्हणजे पाच मार्चपासून या आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या. म्हणूनच 10 टक्के आरक्षण न्यायालयात टिकवणं हे नव्या सरकारसमोर नवं चॅलेंज असणार आहे. 

आंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज

दिनांक 29 ऑगस्ट 2023... स्थळ अंतरवाली सराटी. इथं मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले. उपोषणाच्या तिसऱ्याच दिवशी म्हणजे 31 ऑगस्टला इथं एक लाठीचार्जची घटना घडते आणि त्याचे पडसाद राज्यभरात उमटतात.
 
त्यानंतर 1 सप्टेंबरपासून सुरु झालेली ही चळवळ आजही सुरु आहे. त्याच चळवळीतून मनोज जरांगे पाटील नावाचा एक मराठा नेता उदयास आला. तो मराठा तरुणांच्या गळ्यातला ताईत बनला. त्यानंतर मनोज जरांगे यांनी राज्यभर आंदोलनाचं मोहोळ उठवलं. सर्व मराठे हे कुणबी असून त्यांना सरसकट ओबीसी आरक्षण द्या अशी मागणी त्यांनी केली आणि त्यांना मोठा पाठिंबा मिळाला. जिल्ह्याजिल्ह्यांत सुरू झालेलं हे आंदोलन मुंबईकडे वळलं. 

SEBC अंतर्गत 10 टक्के आरक्षण

मनोज जरांगे यांनी आंदोलकांना घेऊन मुंबईची वाट धरली. त्यांना पदोपदी मोठा पाठिंबा मिळत गेला. लाखो मराठ्यांचं हे वादळ मुंबईत धडकण्यापूर्वीच शिंदे यांच्या सरकारने त्याला प्रतिसाद दिला आणि जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्याचं जाहीर केलं. 

त्यानंतर राज्य सरकारने फेब्रुवारी 2024 मध्ये SEBC अंतर्गत मराठा समाजाला राज्य सरकारनं 10 टक्के आरक्षण जाहीर केलं. पण त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचा मनोज जरांगे यांनी आरोप केला. या सगळ्याचा राग त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर काढला. मराठा आंदोलनात गेल्या वर्षभरात काय काय झालं ते महाराष्ट्राला माहितीय. 

सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठा आंदोलनानं राज्याच्या राजकारणावर काय काय परिणाम झालेत. हे आपण लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्षच पाहिलं आणि मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीसांवरचा रागही साऱ्या महाराष्ट्रानं पाहिलाय. त्यामुळं राज्यात देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले तर काय काय होऊ शकतं याकडेही महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहितीEKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024Ramadas kadam Sai Darshan : रामदास कदम-धनंजय मुंडे शिर्डीत साईचरणी लीन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Wardha Crime : दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
सरकारी नोकरीची संधी, विविध 234 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
सरकारी नोकरीची संधी, विविध 234 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
Embed widget