वीज बिलावरुन उद्धव ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले, जे बोलतो ते करतो...
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वीज बिलावरून चांगलाच सामना रंगलाय.
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) आणि उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात वीज बिलावरून चांगलाच सामना रंगलाय. देवेंद्र फडणवीस सत्तेत नसताना त्यांची वीज बिलासंदर्भातील भूमिका आणि सत्तेत आल्यानंतरची भूमिका यावरू उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाण्यात बोलताना टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक व्हिडीओ ट्विट करून प्रत्यूत्तर दिले आहे. "काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीसांचे जुने विधान ऐकवले. त्यानंतर त्यांच्यावर टीका केली. "देवेंद्र जनाची नाही मनाची लाज बाळगा. मी आव्हान देतो तुम्ही सत्तेत आहात ना मग वीजबिल माफ करा. वर वेगळी भाषा खालती उतरले की वेगळी भाषा. पश्चिम विदर्भाचा काही भाग राहिला हे मला माहिती आहे. अतिवृष्टीचे पैसे घोषित झाले किती लोकांना मिळाले चॅनलवाल्यांनी हे दाखवावे. खोटे बोलून रेटून न्यायचे, असे सुरे आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी देखील लगेच उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडीओ ट्विट करून "काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही, असा टोला लगावला आहे.
"2019 ते 2022 या मधल्या काळातील त्यांचा शेतकऱ्यांप्रति पोकळ कळवळा महाराष्ट्राने अनुभवलाय्...जे बोलतो ते करतो, फुकाच्या हवेत गप्पा मारत नाही. महावितरणचा हा आदेश 22 नोव्हेंबर 2022 रोजीच जारी झालेला आहे. शेतकर्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही...!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 26, 2022
2019 ते 2022 या मधल्या काळातील त्यांचा शेतकऱ्यांप्रति पोकळ कळवळा महाराष्ट्राने अनुभवलाय्... pic.twitter.com/KVfRik8bRe
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. "उद्धव ठाकरेंची मघाशी झालेली सभा मी पाहिलीय. ही शिल्लक सेना आहे ती वाचवण्याची धडपड आहे. स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी काहीही केलं नाही. आता राजकारण करण्यासाठी ते शेतकऱ्यांचा वापर करत आहेत. आता त्यांना काम करावाच लागणार आहे. खोट बोल पण रेटून बोल अस म्हणणं सुरुय. शिवाजी महाराजांचा अपमान झाला हे आम्हाला मान्य आहे, त्या बाबतीत कोणालाही माफ करता येणं शक्य नाही. पण सावरकरांचा अपमान झाला तेंव्हा आदित्य का गेले भारत जोडो यात्रेत. कामाख्याच्या मंदिरात जाणं म्हणजे बळी चढवणं असं लोकांना सांगितलं जातंय. एकदोन कारखाने काय गेले त्यातही राजकारण सुरुय. शेतकरी, युवक सगळ्याच बाबतीत राजकारण सुरु आहे. तुम्ही किती खोके घेतले तेही समोर येईल. येत्या 10 दिवसात पुराव्यासह सर्व गोष्टी समोर आणू असा इशारा किरण पावसरकर यांनी दिलाय.
पावसकर म्हणाले, "वीजबिल माफ करण्यासंदर्भात प्रयत्न करू. पण तुम्ही मुख्यमंत्री असताना नेमकं काय केलात तेही सांगा. एखादी शिवी कोणी माध्यमांसमोर घातली तर राजीनामा द्या अशी मागणी होते. मात्र, स्वतःला सुसंस्कृत म्हणवणारा संपादक असं वारंवार बोलतो त्यावर काय बोलायचं? काही लोकांना महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा टिकवायचा असेल तर लांब ठेवायला हवं अशी मागणी आम्ही देवीकडे केलीय.
कामाख्या मातेचे दर्शन झाल्यानंतरच तुमची खुर्ची गेली. कदाचित देवीच्या मनातही तेच होत असणार."
महत्वाच्या बातम्या
Uddhav Thackeray: शिंदेंवर आसूड, भाजपचा समाचार; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे