Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यातील कोरोनाची जिल्हानिहाय आकडेवारी
Maharashtra Covid-19 cases Live Updates 20 January 2022 : राज्यातील आजची जिल्हानिहाय कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
राज्यात बुधवारी बाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक
राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. बुधवारी राज्यात कोरोनाच्या 43 हजार 697 नव्या रुग्णांची भर झाली असून 49 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 46, 591 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात बुधवारी 214 ओमायक्रॉनबाधितांची नोंद नाही
राज्यात बुधवारी 214 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत 2074 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 1091 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात बुधवारी 49 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.93 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 69 लाख 15 हजार 407 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.04टक्के आहे. सध्या राज्यात 23 लाख 93 हजार 704 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3200 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 25 लाख 31 हजार 814 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत नवे 6 हजार 32 कोरोनाबाधित
मुंबईतील कोरोना (Corona) रुग्णांची संख्या कमी होत असल्याने आता मुंबईतील रुग्णसंख्या स्थिरावल्याचं दिसून येत आहे. मुंबईत बुधवारी 6 हजार 32 नवे रुग्ण आढळले असून 12 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 488 झाली आहे. तर नव्या बाधितांच्या तुलनेत जवळपास तिप्पट रुग्ण म्हणजेच 18 हजार 241 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट वाढून 95 टक्के इतका आहे.
पुणे शहरात आज 7264 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
पुणे शहरात आज एका दिवसात 7264 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. ही पुणे शहरात एका दिवसात आढळून आलेली कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. यापैकी सात रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर पुणे जिल्ह्यात एकूण 14,424 रुग्णांची नोंद झाली असून एकूण 11 जणांचा मृ्त्यू झाला आहे.
औरंगाबादमध्ये आजही कोरोना रुग्णांची संख्या एक हजारावर
औरंगाबादमध्ये आजही कोरोना रुग्णांची संख्या एक हजारावर सापडली आहे. आज 1 हजार 90 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले असून त्यापैकी शहरात 735 तर ग्रामीण भागात 355 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
#CoronavirusUpdates : मुंबईत गुरुवारी 5,708 रुग्णांची नोंद
Mumbai Coronavirus Cases : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे चित्र आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी मुंबईमध्ये नव्या रुग्णांची संख्या घटली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, नव्या रुग्णांपेक्षा तीनपट रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मुंबईत 5,708 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 15 हजार 440 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मागील २४ तासांत मुंबईत 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरात अकोल्यात आढळले 469 नवे कोरोनारूग्ण
आज दिवसभरात अकोल्यात आढळलेत 469 नवे कोरोनारूग्ण. सध्या जिल्ह्यात 2152 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू. आज एका 36 वर्षीय रूग्णाचा मृत्यू. आतापर्यंत 1146 रूग्णांचा कोरोनाने मृत्यू. आज होम आयसोलेशनमधील 284 जण झालेत कोरोनामुक्त.
अमरावती जिल्ह्यात 470 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार अमरावती जिल्ह्यात 470 नवे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे..एकूण रूग्णांची संख्या 99 हजार 344 झाली..