एक्स्प्लोर

Coronavirus: राज्यात कोरोनाच्या हजाराहून जास्त रुग्णांची नोंद, दिल्लीत 1,527 रुग्ण आढळले

Maharashtra Coronavirus Update : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून सलग दुसऱ्या दिवशी एक हजाराहून जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. 

मुंबई: महाराष्ट्रासह देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. आज महाराष्ट्रात (Maharashtra Coronavirus Update)  1 हजार 86 कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात राज्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुंबईत गेल्या चोवीस तासांत 274 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. याचदरम्यान मुंबईत 216 रुग्ण कोरोनातून बरे झाले. त्यामुळं मुंबईतल्या कोरोना रुग्णांची संख्या आता एक हजार 635 वर पोहोचली आहे.  

दिल्लीतील रुग्णसंख्येत मोठी वाढ 

गुरुवारी राजधानी दिल्लीत कोरोनाचे 1527 नवीन रुग्ण आढळले. याशिवाय दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये ही माहिती समोर आली आहे. नवीन प्रकरणांसह, दिल्लीत कोरोनाचे सक्रिय रुग्ण 3962 वर पोहोचले आहेत, तर रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचा दर 27.77 टक्के वर गेला आहे. दिल्लीत गेल्या 24 तासांत 909 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

गेल्या पाच दिवसातील देशातील कोरोनाची रुग्णसंख्या 

  • 9 एप्रिल 5,357
  • 10 एप्रिल 5,880
  • 11 एप्रिल 5,676 
  • 12 एप्रिल 7,830
  • 13 एप्रिल 10,158 

गेल्या पाच दिवसातील राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या  

  • 9 एप्रिल 788
  • 10 एप्रिल 328
  • 11 एप्रिल 919
  • 12 एप्रिल 1,115
  • 13 एप्रिल 1,086

कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. गौतम भन्साळी यांनी केलेलं आवाहन

- कोव्हिड रुग्णांची संख्या वाढत आहे, अशात बूस्टर डोस ज्यांनी घेतले नसतील अशांनी बूस्टर डोज घेतले पाहिजे.

- लस घेतली असेल तरीही तुम्हाला कोव्हिड होऊ शकतो. मात्र आजाराची तीव्रता कमी होताना बघायला मिळते. सहव्याधी असलेल्या रुग्णांना अधिक धोका असतो. अशात त्यांनी बूस्टर डोस घेतला पाहिजे. 

- रुग्णालयात जात असाल तर मास्क घालावा. ज्या लोकांना सर्दी, खोकला, ताप आहे अशांनी मास्क घातला पाहिजे. बंदिस्त ठिकाणी जात असाल तर मास्क घालावा.

देशात सर्वत्र कोरोनाच्या लढाईसाठी सज्ज राहण्यासाठी मॉकड्रिल पार पडताना बघायला मिळाले. मात्र, अद्यापही रुग्णालयात भर्ती होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे आणि ती कमीच राहणार असल्याचा अंदाज तज्ज्ञ डॉक्टरांकडून व्यक्त केला जात आहे. 

सुरुवातीला साथीच्या महामारीत मास्क सर्वत्र बंधनकारक करण्यात आलं होतं. त्यानंतर जशी जशी रुग्णसंख्या कमी झाली तसे नियमात बदल होत गेले. त्यानंतर चेहऱ्यावरील मास्क देखील निघालेत. मात्र कोरोनावरील औषध अद्यापही बाजारात आलेलं नाही. त्यामुळे कोव्हिडच्या लढाईत मास्क हे देखील एक व्हॅक्सिन आहे. अशात रुग्णसंख्या आटोक्यात ठेवायची असेल तर मास्कदेखील लावला पाहिजे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : 6.30 AM : 09 January 2025 : माझं गाव, माझा जिल्हा : ABP MajhaSpecial Report NCP :कोणत्या खासदाराला फोन? फोडफोडीचं राजकारण किती दिवस चालणार?Special Report Amol Mitkari VS Suresh Dhas : धस हेच बीडच्या इतिहासातील आका, मिटकरींचे गंभीर आरोपSpecial Report Uddhav Thackeray : मिशन मुंबई महापालिका, ठाकरेंच्या शिवसेनेचं एकला चलो रे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक
Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक
Somnath Suryavanshi : सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
Embed widget