Maharashtra Corona Update : राज्यात मंगळवारी 2135 कोरोना रुग्णांची नोंद तर 2565 कोरोनामुक्त
Maharashtra Corona Update : राज्यात आज 12 कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्के इतका झाला.
मुंबई : राज्यात आज 2135 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 2565 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहे.
12 कोरोनाबाधितांचा मृत्यू
राज्यात आज 12 कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,15,444 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.98 टक्के इतकं झालं आहे.
राज्यात एकूण 14092 सक्रिय रुग्ण
राज्यात एकूण 14092 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक म्हणजे 4798 इतके रुग्ण असून त्यानंतर मुंबईमध्ये 1805 सक्रिय रुग्ण आहेत.
200 कोटी कोविड लसीकरणाचा आकडा गाठला!
कोरोना व्हायरस सोबतच्या (CoronaVirus) युद्धात भारताने नवे स्थान प्राप्त केले आहे. देशाने 200 कोटी लसीकरणाचा आकडा गाठला आहे. भारताने अवघ्या 18 महिन्यांत हा आकडा पार केला. 16 जानेवारी 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते कोरोनाचे लसीकरण सुरू करण्यात आले. देशात आता 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना बूस्टर डोस (Booster Dose) दिला जात आहे, तर 12 वर्षांखालील मुलांनाही लसीकरण केले जात आहे. केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली देशात कोरोना प्रतिबंधासाठी कोरोना लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात आली. ज्या अंतर्गत भारताने 200 कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे. महामारीशी झुंज देत 299 कोटी लसीकरणाचे यश संपादन केल्याबद्दल भारताचे जगभरातून कौतुक होत आहे