Maharashtra Corona Update : राज्यात शुक्रवारी 130 रुग्णांची नोंद तर चार जणांचा मृत्यू
Maharashtra Corona Update : राज्यात शुक्रवारी 130 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 142 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या (Corona Update) आटोक्यात येत असल्याचं चित्र असून आज देखील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 812 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. आज राज्यात 130 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 142 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज चार कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज सात कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,26, 326 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 96, 38, 701 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
राज्यात सध्या 812 अॅक्टिव्ह रुग्ण
राज्यात सध्या 812 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 299 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 102 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.
गेल्या 24 तासात देशात 1 हजार 109 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
देशात कोरोनाचा धोका कमी झाला आहे. गेल्या 24 तासात देशात 1 हजार 109 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 43 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर गेल्या 24 तासात 1 हजार 213 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. काल देशात 1 हजार 33 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर काल कोरोनामुळं 43 जणांचा मृत्यू झाला होता.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 492 वर आली आहे. कोरोना रुग्ण रिकव्हर होण्याचा दर हा 98.76 टक्के आहे. कोरोना रुग्ण रिकव्हर होण्याचा दर हा 98.76 टक्के आहे. काल दिवसभरात कोरोनातून 1213 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या पॉझिटिव्हीटी रेट हा 0.24 टक्के आहे.