Maharashtra Corona : आता तरी काळजी घ्या! कोरोना पुन्हा वाढतोय...राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण वाढले
Maharashtra Corona Update : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनही करण्यात आला आहे. अशातच राज्यात काल एका दिवसात 15 हजार 602 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे.
मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनही करण्यात आला आहे. अशातच राज्यात काल एका दिवसात 15 हजार 602 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच काल दिवसभरात 7 हजार 467 कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण 21 लाख 25 हजार 211 रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. राज्यात एकूण 11 लाख 8 हजार 525 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.49 टक्क्यांवर पोहोचले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील रुग्णांची संख्या ही पंधराशेच्यावर आहे तर नागपुरातही रुग्णांची संख्या तब्बल 2000 हजारांच्या पार गेली आहे. नाशिक शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनले असून देशातील सर्वाधिक 10 कोरोना बाधित शहरांच्या यादीत नाशिक जाऊन पोहोचले आहे. अशातच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागपूर, नाशिकसह राज्यातील काही शहरांमध्ये वीकेंड लॉकडाऊन करण्यात आला आहे.
Coronavirus | राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव! आज दिवसभरात 15 हजार 602 कोरोनाबाधितांची नोंद
औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 720 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. तर 849 जणांना (मनपा 802, ग्रामीण47) डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत 51017 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 56678 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1334 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4327 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
नंदुरबार: 24 तासात जिल्ह्यात नवीन 214 कोरोना रुग्ण तर तिघांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वात जास्त रुग्ण नंदुरबार शहरातील आहेत. एकट्या नंदुरबार शहर आणि तालुक्यात 132 रुग्ण समोर आले आहेत. प्रशासनाने गर्दी न करण्याचे केलं आवाहन नागरिकांना केलं आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण वाढले